mr_tw/bible/kt/promisedland.md

34 lines
5.5 KiB
Markdown

# वचनदत्त भूमी
## तथ्य:
"वचनदत्त भूमी" हा शब्द फक्त पवित्र शास्त्राच्या कथामध्येच आढळतो, पवित्र शास्त्राच्या माजकुरांमध्ये येत नाही. हा कनानच्या भूमीला संदर्भित करण्याचा एक पर्यायी मार्ग आहे, ज्याला देवाने अब्राहमला आणि त्याच्या वंशजांना देण्याचे वचन दिले होते.
* जेंव्हा अब्राहम ऊर शहरात राहत होता, तेंव्हा देवाने त्याला कनानमध्ये जाऊन राहण्याची आज्ञा दिली. तो आणि त्याचे वंशज, इस्राएली लोक, तेथे बऱ्याच वर्षापर्यंत राहिले.
* जेंव्हा कडाक्याच्या दुष्काळामुळे कनानमध्ये काहीच अन्न शिल्लक राहिले नाही, तेंव्हा इस्राएली लोक मिसरला गेले.
* चारशे वर्षानंतर, देवाने इस्राएल लोकांना मिसरच्या गुलामगिरीतून मुक्त केले, आणि त्यांना परत कनानला घेऊन आला, जी भूमी देवाने त्यांना देण्याचे वचन दिले होते.
## भाषांतर सूचना
* "वचनदत्त भूमी" या शब्दाचे भाषांतर "अशी भूमी जीला देवाने अब्राहामास देतो असे सांगितले होते" किंवा "अशी भूमी जीला देण्याचे वचन देवाने अब्राहमला दिले होते" किंवा "अशी भूमी जिचे वचन देवाने त्याच्या लोकांना दिले होते" किंवा "कनानची भूमी" असे केले जाऊ शकते.
* पवित्र शास्त्रातील मजकुरात, हा शब्द "देवाने वचन दिलेली भूमी" या प्रकारच्या स्वरुपात देखील आढळतो.
(हे सुद्धा पहा: [कनान](../names/canaan.md), [वचन](../kt/promise.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [अनुवाद 08:1-2](rc://*/tn/help/deu/08/01)
* [यहेज्केल 07:26-27](rc://*/tn/help/ezk/07/26)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[12:01](rc://*/tn/help/obs/12/01)__ आता ते गुलाम नव्हते, ते आता __वचनदत्त भूमीकडे__ वाटचाल करत होते!
* __[14:01](rc://*/tn/help/obs/14/01)__ देवाने इस्राएल लोकांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम त्यांना पाळण्यासाठी दिले होते ते सांगून झाल्यानंतर त्यांनी सीनाय पर्वत सोडला. देव त्यांना __वचनदत्त देशाकडे__, ज्याला कनान देश सुदधा म्हटले जायचे त्याकडे त्यांना घेऊन जात होता.
* __[14:02](rc://*/tn/help/obs/14/02)__ देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते की त्यांच्या वंशजांना तो __वचनदत्त देश__ देईल, पण आता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक राहत होते.
* __[14:14](rc://*/tn/help/obs/14/14)__ मग देवाने लोकांस पुन्हा त्या __वचनदत्त देशाकडे__ येण्यास त्यांचे मार्गदर्शन केले.
* __[15:02](rc://*/tn/help/obs/15/02)__ इस्राएलांना __वचनदत्त देशामध्ये__ प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते.
* __[15:12](rc://*/tn/help/obs/15/12)__ या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास __वचनदत्त देशाची__ वाटणी करुन दिली.
* __[20:09](rc://*/tn/help/obs/20/09)__ हयाच कालावधित जेंव्हा देवाच्या लोकांस __वचनदत्त देश__ सोडून जाण्यास सक्ति करण्यात आली, त्यास पाडाव- हद्दपारी असे म्हणतात.
Strong's: H776, H3068, H3423, H5159, H5414, H7650