mr_tw/bible/kt/manna.md

31 lines
3.1 KiB
Markdown

# मन्ना
## व्याख्या:
मन्ना हे पांढरे, धन्यासारखे अन्न होते, जे देवाने इस्राएल लोकांना त्यांनी मिसर सोडल्यानंतर, वाळवंटामध्ये राहत असताना 40 वर्षापर्यंत खाण्यासाठी पुरविले.
* मन्ना हे पांढऱ्या फ्लेक्ससारखे दिसत होते, जे रोज सकाळी दहीवरासारखे जमिनीवर पडत होते. त्याची चव मधासारखी गोड होती.
* इस्राएली लोक शब्बाथ वगळता, दररोज मन्ना गोळा करत.
शब्बाथाच्या आदल्या दिवशी, देवाने इस्राएली लोकांना दररोज लागतो त्यापेक्षा दुप्पट मन्ना गोळा करण्याची आज्ञा दिली होती, जेणेकरून त्यांना विश्रामाच्या दिवशी मन्ना गोळा करावा लागणार नाही.
* "मन्ना" या शब्दाचा अर्थ "हे काय" असा होतो.
* पवित्र शास्त्रामध्ये, मन्ना या शब्दाला "स्वर्गातील भाकर" आणि "स्वर्गातील धान्य" असे संदर्भित केले आहे.
## भाषांतर सूचना
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "अन्नाचे पातळ पांढरे कण" किंवा "स्वर्गातील धान्य" ह्यांचा समावेश होतो.
* या शब्दाचे भाषांतर स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरामध्ये कसे केले गेले आहे, हेदेखील विचारात घ्या. (पहा: [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://*/ta/man/translate/translate-unknown))
(हे सुद्धा पहा: [भाकर](../other/bread.md), [वाळवंट](../other/desert.md), [धान्य](../other/grain.md), [स्वर्ग](../kt/heaven.md), [शब्बाथ](../kt/sabbath.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [अनुवाद 08:3](rc://*/tn/help/deu/08/03)
* [निर्गम 16:26-27](rc://*/tn/help/exo/16/26)
* [इब्री 09:3-5](rc://*/tn/help/heb/09/03)
* [योहान 06:30-31](rc://*/tn/help/jhn/06/30)
* [यहोशवा 05:12](rc://*/tn/help/jos/05/12)
Strong's: H4478, G3131