mr_tw/bible/kt/lordssupper.md

25 lines
3.1 KiB
Markdown

# प्रभुभोजन
## व्याख्या:
"प्रभूभोजन" हा शब्द प्रेषित पौलाने वल्हांडणाच्या जेवणाच्या संदर्भात वापरला, जे येशूने, ज्या रात्री तो यहुदी पुढाऱ्यांच्या द्वारे पकडला गेला त्या रात्री, शिष्यांच्यासोबत खाल्ले.
* या जेवणादरम्यान, येशूने वल्हांडणाच्या भाकरीचे तुकडे केले आणि त्याला त्याचे शरीर असे म्हंटले, ज्याला लवकरच फटके मारण्यात आणि ठार मारण्यात येणार होते.
* त्याने द्राक्षरसाच्या प्याल्याला त्याचे रक्त म्हंटले, जे, जसा तो पापासाठी बलिदान म्हणून मारला जाणार होता, तसे ते लवकरच बाहेर सांडले जाणार होते.
* येशूने त्यांना आज्ञा दिली की, जितक्यांदा तुम्ही हे प्रभूभोजन एकत्रित येऊन कराल, तितक्यांदा तुम्ही त्याच्या मरणाचे आणि पुनरुत्थानाचे स्मरण करावे.
* करिंथकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात, प्रेषित पौलाने पुढे प्रभूच्या विश्वासणाऱ्यांसाठी, प्रभूभोजन नियमित सराव म्हणून स्थापित केले.
* आजच्या मंडळ्या, प्रभूभोजनाला संदर्भित करताना, बऱ्याचदा "सह्भागीता" या शब्दाचा उपयोग करतात. काहीवेळा "शेवटचे भोजन" या शब्दाचा सुद्धा उपयोग केला जातो.
## भाषांतर सूचना
* या शब्दाचे भाषांतर, "प्रभूचे भोजन" किंवा "आपल्या प्रभु येशूचे जेवण" किंवा "प्रभू येशूच्या स्मरणार्थ जेवण" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [वल्हांडण](../kt/passover.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 11:20-22](rc://*/tn/help/1co/11/20)
* [1 करिंथकरांस पत्र 11:25-26](rc://*/tn/help/1co/11/25)
Strong's: G1173, G2960