5.8 KiB
5.8 KiB
इस्राएल, इस्राएली
तथ्य:
"इस्राएल" ही संज्ञा, देवाने याकोबाला दिलेले एक नाव आहे. बऱ्याचदा ते त्याच्यापासून आलेल्या राष्ट्राला सूचित करते.
- इस्राएल नावाचा अर्थ कदाचित "तो देवाशी संघर्ष करतो" असा असावा.
- याकोबाचे वंशज "इस्राएलचे पुत्र" किंवा "इस्रायलचे लोक" किंवा "इस्रायल राष्ट्र" किंवा "इस्राएली" म्हणून ओळखले जाऊ लागले.
- देवाने इस्राएल लोकांशी आपला करार केला. ते त्याचे निवडलेले लोक होते.
- इस्रायल राष्ट्रात बारा कुळांचा समावेश होता.
- राजा शलमोनाच्या मृत्यूनंतर, इस्राएलाचे दोन साम्राज्यांमध्ये विभाजन झाले: दक्षिणेकडील राज्य, ज्याला "यहूदा" असे म्हणतात आणि उत्तरेकडील राज्य, ज्यास "इस्त्राएल" असे म्हणतात.
- बऱ्याचदा संदर्भानुसार, "इस्राएल" या संज्ञेचे भाषांतर "इस्त्राएलाचे लोक" किंवा "इस्राएल राष्ट्र" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: याकोब, इस्त्राएलाचे राज्य, यहुदा, राष्ट्र, इस्त्राएलांचे बारा वंश)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 इतिहास 10:1
- 1 राजे 8:2
- प्रेषितांची कृत्ये 2:36
- प्रेषितांची कृत्ये 7:24
- प्रेषितांची कृत्ये 13:23
- योहान 1:49-51
- लुक 24:21
- मार्क 12:29
- मत्तय 2:6
- मत्तय 27:9
- फिलीप्पेकरास पत्र 3:4-5
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 8:15 या बारा पुत्रांची संतती ही इस्राएलाचे बारा वंश झाले.
- 9:3 मिस-यांनी इस्राएलांस अनेक इमारतींचे बांधकाम करण्यास व मोठमोठ्या शहरांचे निर्माण करण्यास सक्ती केली.
- 9:5 एका इस्राएली स्त्रीने एका मुलास जन्म दिला.
- 10:1 ते म्हणाले, "इस्राएलाचा देव असे म्हणतो, 'माझ्या लोकांना जाऊ द्या!'"
- 14:12 पण तरीही इस्राएल लोकांनी देवाविरूद्ध व मोशेविरूद्ध कुरकुर केली.
- 15:09 त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक अमोरी मरण पावले.
- 15:12 या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली. त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.
- 16:16 मग देवाने इस्त्राएलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती.
- 43:6 "अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्ये केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला ती माहीत आहेत.
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: एच3478, एच3479, एच3481, एच3482, जी935, जी2474, जी2475