5.0 KiB
5.0 KiB
ख्रिस्तामध्ये, येशुमध्ये, प्रभूमध्ये, त्याच्याठायी
व्याख्या:
“ख्रिस्तामध्ये” हा वाक्प्रचार आणि संबंधित संज्ञा येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे त्याच्याशी नातेसंबंधात असण्याची स्थिती किंवा परीस्थिती दर्शवतात.
- इतर संबंधित संज्ञांमध्ये "ख्रिस्त येशूमध्ये, येशू ख्रिस्तामध्ये, प्रभु येशूमध्ये, प्रभु येशू ख्रिस्तामध्ये" यांचा समावेश आहे.
- "ख्रिस्तामध्ये" या संज्ञेच्या संभाव्य अर्थांमध्ये "तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून" किंवा "ख्रिस्ताशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधाद्वारे" किंवा "ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासावर आधारित" या वाक्यांचा समावेश असू शकतो.
- या संबंधित सर्व शब्दांचा येशूवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्याचे शिष्य असण्याच्या स्थितीचा समान अर्थ आहेत.
- टीप: काहीवेळा "मध्ये" हा शब्द क्रियापदासह असतो. उदाहरणार्थ, "ख्रिस्तामध्ये सहभागी" म्हणजे ख्रिस्त जाणून घेतल्याचे फायदे "सामायिक करा." ख्रिस्तामध्ये "गौरव" म्हणजे येशू कोण आहे आणि त्याने जे केले आहे त्याबद्दल आनंदित होणे आणि देवाची स्तुती करणे होय. ख्रिस्तामध्ये "विश्वास" ठेवणे ह्याचा अर्थ तारणारा म्हणून त्याच्यावर भाव ठेवणे आणि त्याला ओळखणे असा होतो.
भाषांतर सूचना:
- संदर्भानुसार, "ख्रिस्तामध्ये" आणि "प्रभूमध्ये" (आणि संबंधित वाक्ये) या वाक्याचे भाषांतर करण्याच्या विविध मार्गांमध्ये हे समाविष्ट असू शकते:
- "जे ख्रिस्ताचे आहेत"
- "कारण तुमचा ख्रिस्तावर विश्वास आहे"
- “कारण ख्रिस्ताने आपले तारण केले आहे”
- “प्रभूच्या सेवेत”
- “परमेश्वरावर विसंबून राहणे”
- “परमेश्वराने जे केले आहे त्यामुळे.”
- जे लोक ख्रिस्तावर "विश्वास ठेवतात" किंवा ज्यांचा ख्रिस्तावर "विश्वास आहे" ते येशूने शिकवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्याच्या वधस्तंभावरील बलिदानामुळे त्यांचे तारण करण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवतात. संदर्भावर आधारित, "
(हे देखील पाहा: ख्रिस्त, प्रभु, येशू, विश्वास, विश्वास)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 योहान 2:5
- 2 करिंथकरांस पत्र 2:17
- 2 तीमथ्य 1:1
- गलतीकरांस पत्र 1:22
- गलतीकरांस पत्र 2:17
- फिलमोन 1:6
- प्रगटीकरण 1:10
- रोमकरास पत्र 9:1
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: जी15190, जी29620, जी55470