mr_tw/bible/kt/hypocrite.md

3.2 KiB

ढोंगी, ढोंगीपणा

व्याख्या:

"ढोंगी" हा शब्द अशा व्यक्तीला सूचित करतो जो नीतिमान दिसण्यासाठी गोष्टी करतो, परंतु गुप्तपणे वाईट मार्गाने वागत असतो. "ढोंगी" या शब्दाचा अर्थ अशा वर्तनाचा आहे जो एखादा व्यक्ती योग्य आहे अशा समजमध्ये लोकांना फसवतो.

  • ढोंगी लोकांना चांगले काम करताना दिसावे असे वाटते जेणेकरून ते चांगले लोक असे लोक समजतील.
  • बर्‍याचदा ढोंगी इतर लोकांवर तो स्वतः करत असलेल्या त्याच पापी गोष्टीविषयी टिका करतो.
  • येशूने परुश्यांना ढोंगी म्हटले कारण जरी ते विशिष्ट कपडे घालणे आणि विशिष्ट पदार्थ खाणे यासारखे धार्मिक वर्तन करत असले तरी ते लोकांशी दयाळू किंवा न्यायी नव्हते.
  • ढोंगी इतर लोकांमधील दोष दाखवितो, परंतु स्वतःचे दोष कबूल करत नाही.

भाषांतर सूचना:

  • काही भाषांमध्ये “दोतोंडी” यासारखी अभिव्यक्ती असते जी ढोंगी किंवा ढोंगी व्यक्तीच्या कृतींना सूचित करते.
  • "ढोंगी" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "फसवणूक" किंवा "दांभिक" किंवा "अभिमानी, कपटी व्यक्ती" यांचा समावेश असू शकतो.
  • "ढोंगीपणा" या शब्दाचे भाषांतर, "फसवणूक" किंवा "बनावट कृती" किंवा "ढोंग करणे" या शब्दांद्वारे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0120, एच2611, एच2612, जी05050, जी52720, जी52730