mr_tw/bible/kt/houseofgod.md

28 lines
3.1 KiB
Markdown

# देवाचे घर, यहोवाचे घर
## व्याख्या:
पवित्र शास्त्रामध्ये, "देवाचे घर" आणि यहोवाचे घर" या वाक्यांशाचा संदर्भ जिथे देवाची उपासना केली जाते, अशा ठिकाणाशी येतो.
* या शब्दाचा उपयोग अधिक विशिष्ठ रूपाने निवासमंडप किंवा मंदिर ह्यांच्या संदर्भात केला जातो.
* काहीवेळा "देवाचे घर" ह्याचा उपयोग देवाच्या लोकांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.
## भाषांतर सूचना'
* जेंव्हा उपासनेच्या जागेच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो, तेंव्हा त्याचे भाषांतर, "देवाची उपासना करण्याचे घर" किंवा "देवाची उपासना करण्याची जागा" असे केले जाऊ शकते.
* जर ह्याचा संदर्भ मंदिर किंवा निवासमंडपाशी येतो, तर या शब्दाचे भाषांतर, "मंदिर (किंवा निवासमंडप) जिथे देवाची उपासना केली जाते (किंवा "जिथे देवाची उपस्थिती आहे" किंवा "जिथे देव त्याच्या लोकांना भेटतो") असे केले जाऊ शकते.
* तिथे देव "राहतो" हे दर्शविण्यासाठी, कदाचित "घर" या शब्दाचा उपयोग भाषांतरामध्ये करणे महत्वाचे आहे, म्हणजेच त्या जागेमध्ये त्याचा आत्मा त्याच्या लोकांना भेटतो आणि त्यांच्याद्वारे देवाची उपासना केली जाते.
(हे सुद्धा पहा: [देवाचे लोक](../kt/peopleofgod.md), [निवासमंडप](../kt/tabernacle.md), [मंदिर](../kt/temple.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 तीमथ्य 03:14-15](rc://*/tn/help/1ti/03/14)
* [2 इतिहास 23:8-9](rc://*/tn/help/2ch/23/08)
* [एज्रा 05:12-13](rc://*/tn/help/ezr/05/12)
* [उत्पत्ति 28:16-17](rc://*/tn/help/gen/28/16)
* [शास्ते 18:30-31](rc://*/tn/help/jdg/18/30)
* [मार्क 02:25-26](rc://*/tn/help/mrk/02/25)
* [मत्तय 12:3-4](rc://*/tn/help/mat/12/03)
* Strong's: H426, H430, H1004, H1005, H3068, G2316, G3624