mr_tw/bible/kt/honor.md

3.9 KiB

सन्मान

व्याख्या:

"आदर" आणि "सन्मान करणे" या शब्दांचा संदर्भ एखाद्याला आदर, प्रशंसा किंवा परम आदर देण्याशी आहे.

  • सन्मान सामान्यतः उच्च दर्जा आणि महत्त्व असलेल्या व्यक्तीला दिला जातो, जसे की राजा किंवा देव.
  • देवाने ख्रिस्ती लोकांनी एकमेकांचा आदर करावा अशी सूचना दिली.
  • मुलांनी त्यांच्या आई आणी वडिलांचा मान राखावा त्या मार्गामध्ये त्यांचा आदर करणे आणि त्यांच्या आज्ञा पाळणे ह्यांचा समावेश होतो.
  • "सन्मान" आणि "गौरव" हे शब्द सहसा एकत्र वापरले जातात, विशेषत: येशूचा संदर्भ देताना. हे एकाच गोष्टीला संदर्भित करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग असू शकतात.
  • देवाचा सन्मान करण्याच्या पद्धतींमध्ये, त्याला धन्यवाद देणे आणि त्याची स्तुती करणे, आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे आणि तो किती महान आहे हे दर्शवेल अशा पद्धतीने जीवन जगुन त्याला आदर देण्याचा समावेश होतो.

भाषांतर सूचना:

  • “सन्मान” या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये “आदर” किंवा “सन्मान” किंवा “उच्च आदर” यांचा समावेश असू शकतो.
  • “सन्मान करणे” या संज्ञेचे भाषांतर “विशेष आदर दाखवणे” किंवा “स्तुती करण्यास कारण” किंवा “उच्च आदर दाखवणे” किंवा “अत्यंत मूल्य” असे केले जाऊ शकतो

(हे देखील पाहा: अनादर, वैभव, गौरव, स्तुती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1420, एच1921, एच1922, एच1923, एच1926, एच1927, एच1935, एच2082, एच2142, एच3366, एच3367, एच3368, एच3372, एच3373, एच3374, एच3444, एच3513, एच3519, एच3655, एच3678, एच5081, एच5375, एच5457, एच6213, एच6286, एच6437, एच6942, एच6944, एच6965, एच7236, एच7613, एच7812, एच8597, एच8416, एच08200, जी13910, जी13920, जी17840, जी21510, जी25700, जी31700, जी44110, जी45860, जी50910 जी50920, जी50930, जी53990