43 lines
6.4 KiB
Markdown
43 lines
6.4 KiB
Markdown
# महायाजक
|
||
|
||
## व्याख्या:
|
||
|
||
"महायाजक" या शब्दाचा संदर्भ एक विशेष याजाकाशी आहे, ज्याला एक वर्षाच्या काळासाठी इतर इस्राएली याजाकांवर नेता म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते.
|
||
|
||
* महायाजकाला विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. वर्षातून एकदा विशेष बलिदान अर्पण करण्यासाठी फक्त त्यालाच मंदिरातील अतिपवित्र स्थानात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
|
||
* इस्राएल लोकांना अनेक याजक असायचे, पण एका वेळी एकच महायाजक असायचा.
|
||
* जेंव्हा येशूला अटक केली तेंव्हा कयफा हा अधिकृत महायाजक होता. * कायफाचा सासरा हन्ना ह्याचा देखील काहीवेळा उल्लेख करण्यात आला आहे, कारण तो पूर्वीच्या काळातील महायाजक होता, ज्याला अजूनही लोकांवर ताकद आणि अधिकार होता.
|
||
|
||
## भाषांतर सूचना
|
||
|
||
* "महायाजक" याचे भाषांतर "सर्वोच्च याजक" किंवा "महान श्रेणीतील याजक" असे केले जाऊ शकते.
|
||
* "मुख्ययाजक" या शब्दापासून याचे भाषांतर वेगळे असेल याची खात्री करा.
|
||
|
||
(हे सुद्धा पहा: [हन्ना](../names/annas.md), [कयफा](../names/caiaphas.md), [मुख्ययाजक](../other/chiefpriests.md), [याजक](../kt/priest.md), [मंदिर](../kt/temple.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 5:27](rc://*/tn/help/act/05/27)
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 7:1](rc://*/tn/help/act/07/01)
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 9:1](rc://*/tn/help/act/09/01)
|
||
* [निर्गम 30:10](rc://*/tn/help/exo/30/10)
|
||
* [इब्री 06:19-20](rc://*/tn/help/heb/06/19)
|
||
* [लेवीय 16:32](rc://*/tn/help/lev/16/32)
|
||
* [लुक 03:2](rc://*/tn/help/luk/03/01)
|
||
* [मार्क 2:25-26](rc://*/tn/help/mrk/02/25)
|
||
* [मत्तय 26:3-5](rc://*/tn/help/mat/26/03)
|
||
* [मत्तय 26:51-54](rc://*/tn/help/mat/26/51)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* **[13:08](rc://*/tn/help/obs/13/08)** पडद्याच्या पाठीमागे असणा-या खोलीमध्ये केवळ **महायाजकासच** जाण्याची परवानगी होती कारण तेथे देवाचा निवास होता.
|
||
* **[21:07](rc://*/tn/help/obs/21/07)** मसिहा हा एक परिपूर्ण **महायाजक** असणार होता जो देवाला स्वत:चे परिपूर्ण बलिदान करणार होता.
|
||
* **[38:03](rc://*/tn/help/obs/38/03)** तेंव्हा **महायाजक** व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.
|
||
* **[39:01](rc://*/tn/help/obs/39/01)** सैनिकांनी येशूची चौकशी करण्यासाठी त्याला **महायाजकाच्या** घरी घेऊन गेले.
|
||
* **[39:03](rc://*/tn/help/obs/39/03)** शेवटी, **महायाजकाने** येशूकडे पाहून विचारले, ‘‘आम्हास सांग, की तू मसिहा, जिवंत देवाचा पुत्र आहेस?’’
|
||
* **[44:07](rc://*/tn/help/obs/44/07)** दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर **धर्मपुढा-यांसमोर** उभे केले.
|
||
* **[45:02](rc://*/tn/help/obs/45/02)** तेव्हा धार्मिक पुढा-यांनी स्तेफनास अटक केले व त्यास **महायाजक** व इतर पुढा-यांसमोर आणले, तेथे त्याच्याविरुदध आणखी खोटे साक्षीदार उभे केले व त्यांनी स्तेफनावर खोटे आरोप लाविले.
|
||
* **[46:01](rc://*/tn/help/obs/46/01)** **महायाजकाने** शौलास दिमिष्क शहरातील ख्रिस्ती लोकांस पकडून यरूशलेमेस आणण्यासाठी परवाना दिला होता.
|
||
* **[48:06](rc://*/tn/help/obs/48/06)** येशू हा एक थोर **महायाजक** आहे. इतर याजकांनी केले नाही असे येशूने केले, संपूर्ण जगातील लोकांसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा व्हावी. येशू हा एक परिपूर्ण **महायाजक** होता, कारण त्याने, प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा स्वत:वर घेतली.
|
||
* Strong's: H7218, H1419, H3548, G748, G749
|