mr_tw/bible/kt/flesh.md

5.7 KiB

देह

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये "देह" ही संज्ञा शब्दशः मनुष्याच्या किंवा प्राण्यांच्या भौतिक शरीरातील मऊ पेशींना संदर्भित करते.

  • पवित्र शास्त्रामध्ये देखील, "देह" हा शब्द सर्व मानव किंवा सर्व जिवंत प्राण्यांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे.
  • नवीन करारामध्ये, "देह" हा शब्द मानवजातीच्या पापमय स्वभावाला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. ह्याचा उपयोग सहसा त्यांच्या आत्मिक स्वभावाच्या विरोधाभासात केला जातो.
  • "स्वतःचा देह आणि रक्त" या अभिव्यक्तीचा संदर्भ जैविकदृष्ट्या संबंधित असलेल्या मनुष्याशी आहे, जसे की, पालक, भावंडे, मूल, किंवा नातू.
  • "मांस आणि रक्त" ही अभिव्यक्ती त्या मनुष्याच्या पूर्वजांना किंवा वंशाजांना संदर्भित करते.
  • "एकदेह" ही अभिव्यक्ती वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुषाच्या शारीरिक एकत्रीकरणाला संदर्भित करते.

भाषांतर सूचना:

  • प्राण्यांच्या शरीराच्या संदर्भात, "देह" ह्याचे भाषांतर "शरीर" किंवा "कातडी" किंवा "मांस" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा ह्याचा उपयोग सर्व जिवंत प्राण्यांना संदर्भित करण्यासाठी सामान्यपणे केला जातो, तेव्हा ह्याचे भाषांतर "जिवंत प्राणी" किंवा "जिवंत असणारी प्रत्येक गोष्ट" असे केले जाऊ शकते.
  • साधारणपणे सर्व लोकांचा संदर्भ देताना, या संज्ञेचे भाषांतार "लोक" किंवा "मनुष्य प्राणी" किंवा "जिवंत असणारा प्रत्येकजण" असे केले जाऊ शकते.
  • "मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचे भाषांतर "नातेवाईक" किंवा "कुटुंब" किंवा "नात्यातील लोक" किंवा "कुटुंब वंश" असे केले जाऊ शकते. तेथे असे संदर्भ असू शकतात ज्याचे भाषांतर "पूर्वज" किंवा "वंशज" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांमध्ये अशी अभिव्यक्ती असू शकते, ज्याचा "मांस आणि रक्त" ह्याच्या समान अर्थ असू शकतो.
  • "एकदेह होतील" या अभिव्यक्तीचे भाषांतर "लैंगिकरित्या एकत्र येणे" किंवा "एका शरीराप्रमाणे होणे" किंवा "शरीर आणि आत्म्यामध्ये एक व्यक्ती होणे" असे केले जाऊ शकते. या अभिव्यक्तीचे भाषांतर, प्रकल्पित भाषेमध्ये आणि संस्कृतीमध्ये ग्रहणीय आहे की नाही हे निश्चत करण्यासाठी तपासावे. (पाहा: शोभनभाषित). हे देखील समजले पाहिजे की हे लाक्षणिक आहे आणि ह्याचा अर्थ असा होतो की पुरुष आणि स्त्री जे "एकदेह होतात" ते प्रत्यक्षात एक मनुष्य होतात.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0829, एच1320, एच1321, एच2878, एच3894, एच4207, एच7607, एच7683, जी29070, जी45590, जी45600, जी45610