mr_tw/bible/kt/fear.md

31 lines
3.7 KiB
Markdown

# भय, घाबरणे, भयभीत
## व्याख्या:
"भय" या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी किंवा आरोग्यासाठी संभाव्य धोका अनुभवताना जाणवणाऱ्या अप्रिय भावनांना सूचित करते. तथापि, बायबलमध्ये, “भय” या शब्दाचा अर्थ देव किंवा राजा यांसारख्या सामर्थ्यशाली व्यक्तीबद्दल, उपासनेचा, आदर, विस्मय किंवा इतर व्यक्तीबद्दल आज्ञाधारकता याची वृत्ती असा देखील होतो.
## भाषांतर सूचना :
* संदर्भावर आधारित, "भय" या शब्दाचे भाषांतर "घाबरणे" किंवा "प्रचंड आदर" किंवा "आदर" किंवा "सन्मान" बहुधा "विस्मित होणे" असे केले जाऊ शकते.
* “भिऊ नका” या वाक्यांशाचे भाषांतर “घाबरू नको” किंवा “घाबरणे थांबवा” असे देखील केले जाऊ शकते.
* “देवाचे भय त्या सर्वांवर पडले” या वाक्याचे विविध प्रकारे भाषांतर केले जाऊ शकते. काही शक्यतांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: “अचानक त्या सर्वांना देवाबद्दल खूप भय आणि आदर वाटला;” किंवा “लगेच, त्या सर्वांना खूप आश्‍चर्य वाटले आणि देवाचा मनापासून आदर वाटला;” किंवा “तेव्हा, त्या सर्वांना देवाची खुप भीती वाटली (त्याच्या महान सामर्थ्यामुळे).”
(हे देखील पाहा: [दरारा](../other/awe.md), [यहोवा](../kt/yahweh.md), [परमेश्वर](../kt/lord.md), [आश्चर्य](../other/amazed.md), [शक्ती](../kt/power.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 योहान 4:18](rc://*/tn/help/1jn/04/17)
* [प्रेषितांची कृत्ये 2:43](rc://*/tn/help/act/02/43)
* [प्रेषितांची कृत्ये 19:15-17](rc://*/tn/help/act/19/15)
* [उत्पत्ति 50:21](rc://*/tn/help/gen/50/18)
* [यशया 11:3-5](rc://*/tn/help/isa/11/03)
* [ईयोब 6:14](rc://*/tn/help/job/06/14)
* [योना 1:9](rc://*/tn/help/jon/01/09)
* [लुक 12:5](rc://*/tn/help/luk/12/04)
* [मत्तय 10:28](rc://*/tn/help/mat/10/28)
* [नीतिसूत्रे 10:24-25](rc://*/tn/help/pro/10/24)
## शब्द समूह
* स्ट्रोंग : H0367, H0926, H1204, H1481, H1672, H1674, H1763, H2119, H2296, H2727, H2729, H2730, H2731, H2844, H2849, H2865, H3016, H3025, H3068, H3372, H3373, H3374, H4032, H4034, H4035, H4116, H4172, H6206, H6342, H6343, H6345, H6427, H7264, H7267, H7297, H7374, H7461, H7493, H8175, G08700, G11670, G11680, G11690, G16300, G17190, G21240, G21250, G29620, G53980, G53990, G54000, G54010