mr_tw/bible/kt/favor.md

29 lines
4.4 KiB
Markdown

# कृपा, अनुकूल, पक्षपात
## व्याख्या:
"कृपा करणे" सामान्यत: म्हणजे प्राधान्य देणे. जो कोणी दुसऱ्या व्यक्तीची बाजू घेतो तेव्हा तो त्या व्यक्तीला सकारात्मक मानतो आणि त्याला मान्यता देतो.
* येशू मनुष्याच्या आणि देवाच्या "कृपेत" वाढत गेला.याचा अर्थ असा की देव आणि इतर या दोघांनीही त्याच्या चारित्र्याला आणि वर्तनाला मान्यता दिली.
* एखाद्या व्यक्तीवर "कृपा होणे" या अभिव्यक्तीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीने मान्यता दिली आहे.
* जेव्हा एखादा राजा एखाद्यावर कृपा दर्शवितो, तेव्हा अनेकदा याचा अर्थ असा होतो की तो त्या व्यक्तीची विनंती मान्य करतो आणि ती मंजूर करतो.
* "कृपा" ही दुसऱ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी केलेला एक हावभाव किंवा कृती देखील असु शकते.
* "पक्षपात" या शब्दाचा अर्थ काही लोकांसाठी अनुकूल वागण्याची वृत्ती आहे परंतु इतरांसाठी नाही. याचा अर्थ एका व्यक्तीला दुसऱ्याऐवजी किंवा एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीऐवजी निवडण्याची प्रवृत्ती असा आहे कारण ती व्यक्ती किंवा वस्तू पसंत केली जाते. सामान्यतः पक्षपात हा अन्यायकारक मानला जातो.
## भाषांतर सूचना
* "कृपा" या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या इतर पध्दतीमध्ये "प्राधान्य" किंवा "आशीर्वाद" किंवा "लाभ" या संज्ञांचा समावेश असु शकतो.
* "परमेश्वराच्या कृपेचे वर्ष" याचे "वर्ष (किंवा समय) जेव्हा परमेश्वर मोठा आशीर्वाद देईल." असे म्हणून भाषांतर केले जाऊ शकते.
* "पक्षपात" हा शब्द "पक्षपातीपणा" किंवा "पूर्वग्रहदूषित" किंवा "अन्यायकारक वागणूक" असे म्हणून भाषांतरीत केला जाऊ शकतो. हा शब्द "आवडता" या शब्दाशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ इतर सर्वांपेक्षा प्राधान्य देणे आहे.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 शमुवेल 2:25-26](rc://*/tn/help/1sa/02/25)
* [2 इतिहास 19:7](rc://*/tn/help/2ch/19/06)
* [2 करिंथ. 1:11](rc://*/tn/help/2co/01/11)
* [प्रेषितांची कृत्ये 24:27](rc://*/tn/help/act/24/26)
* [उत्पत्ति 41:16](rc://*/tn/help/gen/41/14)
* [उत्पत्ति 47:25](rc://*/tn/help/gen/47/25)
* [उत्पत्ति 50:5](rc://*/tn/help/gen/50/04)
* स्ट्रोंग: एच995, एच1156, एच1293, एच1779,एच1921, एच2580, एच2603, एच2896, एच5278, एच5375, एच5414, एच5922, एच6213,एच6437, एच6440, एच7521, एच7522, एच7965, जी1184, जी3685, जी4380, जी4382, जी5485, जी5486