mr_tw/bible/kt/falsegod.md

61 lines
8.7 KiB
Markdown

# देव, खोटे देव, देवी, प्रतिमा, मूर्तिपूजक, मूर्तीपूजा, मूर्तीपुजन
## व्याख्या:
एक खऱ्या देवाला सोडून ज्याची लोक उपासना करतात त्यांना खोटे देव म्हटले जाते. "देवी" ही संज्ञा विशेषकरून खोट्या स्त्री देवासाठी वापरली जाते.
* हे खोटे देव किंवा देवी अस्तित्वात नाहीत. यहोवा हाच एक परमेश्वर आहे.
* काहीवेळा लोक उपासना करण्यासाठी, त्यांच्या खोट्या देवाचे प्रतिक म्हणून वस्तूंची मूर्ती बनवतात.
* पवित्र शास्त्रामध्ये, देवाचे लोक वारंवार खोट्या देवांची उपासना करू नये या देवाच्या आज्ञेत राहण्यापासून मागे फिरले.
* खोटे देव आणि मूर्ती ज्यांची लोक उपासना करतात, त्यांना सामर्थ्य आहे ह्यावर विश्वास ठेवायला लावून सैतान सहसा लोकांना फसवतो.
* पवित्र शास्त्राच्या काळात, अनेक खोट्या देवतांपैकी बआव, दागोन, आणि मोलख या तीन खोट्या देवांची उपासना लोकांनी केली.
* अशेरा आणि अर्तमी (दीआना) या दोन देवींची पूर्वीच्या लोकांनी उपासना केली.
मूर्ती एक वस्तू आहे जी लोक बनवतात, म्हणजे ते त्याची उपासना करू शकतात. जर त्यात खऱ्या देवाशिवाय इतर गोष्टींना सन्मान देण्याचे समाविष्ट असेल, तर एखाद्या गोष्टीचे "मूर्तिपूजक" असे वर्णन केले जाते.
* ज्या खोट्या देवाची लोक उपासना करतात, त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते मूर्तींना बनवतात.
* हे खोटे देव अस्तित्वात नाहीत; याहोवास सोडून दुसरा कोणी देव नाही.
* काहीवेळा सैतान मूर्तींच्याद्वारे जरी त्याला सामर्थ्य नाही, तरी ते आहे, हे दाखवण्यासाठी कार्य करतो.
* मुर्त्या या नेहमी मौल्यवान साहित्यांनी, जसे की, सोने, चांदी, कांस्य, किंवा मौल्यवान लाकूड यांनी बनविल्या जातात.
* "मूर्तिपूजक साम्राज्य" म्हणजे "लोकांचे राज्य जे मूर्तींची उपासना करतात" किंवा "लोकांचे राज्य जे पृथ्वीवरील गोष्टींची उपासना करतात."
* "मूर्तिपूजक प्रतिमा" ही संज्ञा "कोरीव मुर्ती" किंवा "मूर्ती" यासाठी दुसरा शब्द आहे.
## भाषांतर सूचना
* भाषेत किंवा जवळच्या भाषेत आधीच "देव" किंवा "खोटा देव" असा शब्द असू शकतो.
* “मूर्ती” हा शब्द खोट्या देवांना सूचित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
* *इंग्रजीमध्ये, खोट्या देवांचा संदर्भ देण्यासाठी लहान लिपी "g" वापरला जाता आणि मोठी लिपी "G" हा एका खऱ्या देवाचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो.
* इतर पर्यायामध्ये, खोट्या देवतांचा संदर्भ देण्यासाठी पूर्णपणे भिन्न शब्द वापरण्यात येतील.
* वर्णन केलेले खोटे देव पुरुष किंवा स्त्री आहेत हे स्पष्ट करण्यासाठी, काही भाषा एखादा शब्द अधिक जोडू शकतात.
(हे देखील पाहा: [देव](../kt/god.md), [आशेरा](../names/asherim.md), [बआल](../names/baal.md), [मोलेख](../names/molech.md), [सैतान](../kt/demon.md), [प्रतिमा](../other/image.md), [राज्य](../other/kingdom.md), [उपासना](../kt/worship.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 35:2](rc://*/tn/help/gen/35/01)
* [निर्गम 32:1](rc://*/tn/help/exo/32/01)
* [स्त्रोत 31:6](rc://*/tn/help/psa/031/005)
* [स्त्रोत 81:8-10](rc://*/tn/help/psa/081/008)
* [यशया 44:20](rc://*/tn/help/isa/44/20)
* [प्रेषितांची कृत्ये 7:41](rc://*/tn/help/act/07/41)
* [प्रेषितांची कृत्ये 7:43](rc://*/tn/help/act/07/43)
* [प्रेषितांची कृत्ये 15:20](rc://*/tn/help/act/15/19)
* [प्रेषितांची कृत्ये 19:27](rc://*/tn/help/act/19/26)
* [रोमकरास पत्र 2:22](rc://*/tn/help/rom/02/21)
* [गलतीकरांस पत्र 4:8-9](rc://*/tn/help/gal/04/08)
* [गलतीकरांस पत्र 5:19-21](rc://*/tn/help/gal/05/19)
* [कलस्से. 3:5](rc://*/tn/help/col/03/05)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 1:9](rc://*/tn/help/1th/01/08)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[10:2](rc://*/tn/help/obs/10/02)__ या मरीद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील __देवतांपेक्षा__ अधिक सामर्थ्यशाली आहे.
* __[13:4](rc://*/tn/help/obs/13/04)__ मग देवाने त्यांच्याशी करार केला व म्हणाला, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडविले. तुम्ही अन्य __देवतांची__ उपासना करू नका."
* __[14:2](rc://*/tn/help/obs/14/02)__ ते (कनान लोक) खोट्या __देवदवतांची__ उपासना करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करत होते.
* __[16:1](rc://*/tn/help/obs/16/01)__ इस्राएली लोक खरा देव, यहोवा ऐवजी कनानी __देवतांची__ उपासना करू लागले.
* __[18:13](rc://*/tn/help/obs/18/13)__ पण यहुदाचे बहुतेक राजे दुष्ट, भ्रष्ट होते आणि ते मूर्तींची पूजा करत असे. काही राजांनी तर खोट्या __देवतांना__ आपल्या मुलांचा बळी दिला.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H0205, H0367, H0410, H0426, H0430, H0457, H1322, H1544, H1892, H2553, H3649, H4656, H4906, H5236, H5566, H6089, H6090, H6091, H6456, H6459, H6673, H6736, H6754, H7723, H8163, H8251, H8267, H8441, H8655, G14930, G14940, G14950, G14960, G14970, G22990, G27120