3.4 KiB
3.4 KiB
उंच करणे, महान, उदात्तीकरण
व्याख्या:
उंच करणे म्हणजे एखाद्याची अत्यंत स्तुती किंवा सन्मान करणे. ह्याचा अर्थ एखाद्याला उंच स्थानावर ठेवण्याशी देखील येतो.
- पवित्र शास्त्रामध्ये, "उंचवणे" या शब्दाचा सहसा उपयोग देवाला उंचवण्यासाठी केला गेला आहे.
- जेंव्हा एखादी व्यक्ती स्वतःला उंचवतो, म्हणजे तो व्यक्ती स्वतःबद्दल गर्विष्ठ आणि अहंकारी पद्धतीने विचार करतो.
भाषांतर सूचना:
- "उंचवणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "अत्यंत स्तुती करणे" किंवा "भरपूर सन्मान करणे" किंवा "प्रशंसा करणे" किंवा च्या बद्दल अत्यंत बोलणे" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
- काही संदर्भामध्ये ह्याचे भाषांतर, "उंच स्थानावर ठेवणे" किंवा "एखाद्याला अधिक सन्मान देणे" किंवा "च्या बद्दल गर्वाने बोलणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
- "स्वतःला उंच करू नका" या शब्दाचे भाषांतर, "स्वतःबद्दल खूप मोठ्यापणाचे विचार करू नका" किंवा "स्वतःबद्दल बढाई मारू नका" असे केले जाऊ शकते.
- "जे स्वतःला उंच करतात" ह्याचे भाषांतर, "जे स्वतःबद्दल अभिमानास्पद विचार करतात" किंवा "जे स्वतःबद्दल बढाई मारतात" असे देखील केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: स्तुती, उपासना, गौरव, बढाई मारणे, गर्व)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H1361, H4984, H5375, H5549, H5927, H7311, H7426, H7682, G18690, G52290, G52510, G53110, G53120