mr_tw/bible/kt/cornerstone.md

4.0 KiB

कोनशीला

व्याख्या:

""कोनशिला" ही संज्ञा एका मोठ्या दगडाला संदर्भित करतो ज्यास विशेषतः कापले जाते आणि इमारतीच्या पायाच्या कोपऱ्यात बसविला जातो.

  • इमारतीच्या इतर सर्व दगडांना मोजमाप करून कोनशिलेच्या संबंधात बसवण्यात येते.
  • हे संपूर्ण रचनेचा भक्कमपणा आणि स्थिरता ह्यासाठी खूप महत्वाचे आहे.
  • नवीन करारामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या मंडळीची रूपकदृष्ट्या एका इमारतीशी तुलना केली जाते ज्यामध्ये येशू ख्रिस्त तीचा "कोनशिला" आहे.
  • ज्याप्रकारे एखाद्या इमारतीची कोनशिला संपूर्ण इमारतीचे स्थानास आधार देते आणि त्यास निर्धारित करते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त हा कोनशिला आहे ज्यावर विश्वासणाऱ्यांच्या मंडळीची स्थापना केली जाते आणि आधार दिला जातो.

भाषांतर सूचना:

  • "कोनशीला" या शब्दाचे भाषांतर "इमारतीचा मुख्य दगड" किंवा "पायाचा दगड" असे देखील केले जाऊ शकते.
  • प्रकल्पित भाषेत इमारतीच्या पायाचा भाग, जो मुख्य आधार आहे, त्यासाठी एखादा शब्द आहे काय, याचा विचार करा. तसे असल्यास, त्या शब्दाचा वापर केला जाऊ शकतो.
  • ह्याचे भाषांतर करण्याचा इतर मार्ग "इमारतीच्या कोपऱ्यासाठी वापरण्यात येणारा पायाचा दगड" असा असू शकतो.
  • तो एक मोठा दगड आहे, ज्याचा उपयोग इमारतीची भक्कम आणि सुरक्षितसामग्री म्हणून करतात, हे तथ्य तसेच ठेवणे हे महत्वाचे आहे. जर इमारतींच्या बांधकामामध्ये दगडाचा वापर करत नसतील, तर तिथे कदाचित दुसरा शब्द, ज्याचा अर्थ "मोठा दगड" (जसे की "धोंडा") ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये तो व्यवस्थित रचलेला आणि घट्ट बसण्यासाठी बनविला याची कल्पना असावी.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0068, एच6438, एच7218, जी204, जी1137, जी2776, जी3037