mr_tw/bible/kt/confess.md

4.0 KiB

कबूल करणे, कबूली

व्याख्या:

कबूल करणे ह्याचा अर्थ एखादी गोष्ट सत्य आहे हे मान्य करणे किंवा निश्चय करणे असा होतो. "कबूली" ही एखादी गोष्ट सत्य आहे ह्याचे एक विधान किंवा मान्यता आहे.

  • "कबूल करणे" ही संज्ञा देवाच्या सत्याबद्दल धाडसाने सांगण्याला संदर्भित करते. आपण पाप केले आहे हे मान्य करण्याला देखील संदर्भित करते.
  • पवित्र शास्त्र असे सांगते की, जर लोकांनी त्यांची पापे देवाजवळ कबूल केली तर, तो त्यांना क्षमा करेल.
  • प्रेषित याकोब, त्याच्या पत्रामध्ये असे लिहितो की, जेव्हा विश्वासणारे त्यांचे पाप एकमेकांजवळ कबूल करतात, तेव्हा त्यामुळे आत्म्यामध्ये आरोग्य येत.
  • प्रेषित पौल फिलीप्पैकरांस लिहितो की एके दिवशी प्रत्येकजण कबूल किंवा घोषित करेल की येशू प्रभु आहे.
  • पौलाने असे देखील म्हटले की जर लोक आपल्या मुखाने येशु प्रभू आहे असे कबूल करतील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास धरतील, तर त्यांना तारणप्राप्ती होईल.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "कबूल करणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "मान्य करणे" किंवा "साक्ष देणे" किंवा "घोषणा करणे" किंवा "सत्य स्वीकारणे" किंवा "जाहीर करणे" या वाक्यांशांचा समावेश होतो.
  • "कबूली" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "घोषणा" किंवा "साक्ष" किंवा "आम्ही जो विश्वास धरतो ह्यावर विधान करणे" किंवा "पाप मान्य करणे" या वाक्यांशाचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: विश्वास, साक्ष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग : एच3034, एच8426, जी1843, जी3670, जी3671