3.0 KiB
3.0 KiB
दोष लावणे, दोषी, दंडाज्ञा
व्याख्या:
"दोष लावणे" आणि "दंडाज्ञा" या शब्दाचा संदर्भ एखाद्या व्यक्तीने चुकीचे केल्याबद्दल त्याचा न्याय करण्याशी आहे.
- बऱ्याचदा "दोष लावणे" या शब्दामध्ये, ज्या व्यक्तीने चूक केली आहे त्याला त्याबद्दल शिक्षा देण्याचा समावेश असतो.
- काहीवेळा "दोष देणे" म्हणजे खोट्या रीतीने एखाद्याला दोष देणे किंवा एखाद्याचा निष्ठुरपणे न्याय करणे.
- "दंडाज्ञा" या शब्दाचा संदर्भ एखाद्याला दोष लावण्याच्या किंवा दोष देण्याच्या कृत्याशी येतो.
भाषांतर सूचना:
- संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "निष्ठुरपणे न्याय करणे" किंवा "खोट्या रीतीने टीका करणे" असे केले जाऊ शकते.
- "त्याला दोष लावला" या वाक्यांशाचे भाषांतर, "तो दोषी आहे असा त्याचा न्याय करणे" किंवा "त्याला त्याच्या पापाबद्दल शिक्षा झाली पाहिजे असे सांगणे" असे केले जाऊ शकते.
- "दंडाज्ञा" या शब्दाचे भाषांतर, "निष्ठुर न्याय" किंवा "दोषी असल्याचे घोषित करणे" किंवा "दोषाची शिक्षा देणे" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: न्यायाधीश, शिक्षा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 योहान 3:20
- ईयोब 9:29
- योहान 5:24
- लुक 6:37
- मत्तय 12:7
- नीतिसूत्रे 17:15-16
- स्तोत्र 34:22
- रोमकरास पत्र 5:16
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H6064, H7034, H7561, H8199, G176, G843, G2607, G2613, G2631, G2632, G2633, G2917, G2919, G2920, G5272, G6048