mr_tw/bible/kt/compassion.md

27 lines
2.2 KiB
Markdown

# करुणा, दयाळू
## व्याख्या:
"करुणा" ही संज्ञा लोकांसाठी , विशेषत: ज्यांना त्रास होत आहे त्यांच्यासाठी असलेल्या काळजीच्या भावनेला संदर्भित करते. एक "दयाळू" व्यक्ती इतर लोकांची काळजी घेतो आणि त्यांना मदत करतो.
* "करुणा" हा शब्द गरजवंत लोकांची काळजी घेणे, तसेच त्यांना मदत करण्यासाठी कार्य करणे यास सदर्भित करतो.
* पवित्र शास्त्र सांगते की, देव दयाळू आहे, म्हणजेच, तो प्रेमाने आणि दयेने भरलेला आहे.
## भाषांतर सूचना:
* "करुणा" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "खोल काळजी घेणे" किंवा "दया" किंवा "मदतीची दया करणे" यांचा समावेश असु शकतो.
* "दयाळू" या संज्ञेचे भाषांतर "काळजी घेणारा आणि मदत कराणारा" किंवा "अत्यंत प्रेमळ आणि कृपाळू" असे केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानीएल 1:8-10](rc://*/tn/help/dan/01/08)
* [होशे 13:14](rc://*/tn/help/hos/13/14)
* [याकोबाचे पत्र 5:9-11](rc://*/tn/help/jas/05/09)
* [योना 4:1-3](rc://*/tn/help/jon/04/01)
* [मार्क 1:41](rc://*/tn/help/mrk/01/40)
* [रोमकरास पत्र 9:14-15](rc://*/tn/help/rom/09/14)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: एच2550, एच7349, एच7355, एच7356, जी16530, जी33560, जी36270, जी46970, जी48340, जी48350