mr_tw/bible/kt/circumcise.md

63 lines
8.9 KiB
Markdown

# सुंता करणे, सुंता केलेले, सुंता, सुंता न झालेला, बेसुनत,
## व्याख्या:
“सुंता” या शब्दाचा अर्थ पुरुष किंवा पुरुष मुलाची कातडी कापणे होय. यासंदर्भात सुंता करण्याचे कार्यक्रम केला जाऊ शकतो.
* देवाने अब्राहामास त्यांच्याबरोबर केलेल्या कराराची साक्ष म्हणून आपल्या कुटुंबातील प्रत्येक पुरुषांची आणि सेवकांची सुंता करुन घेण्याची आज्ञा दिली.
* देवाने अब्राहामाच्या वंशजांना त्यांच्या घरात जन्मलेल्या प्रत्येक मुलांचे असे करण्याचे चालू ठेवण्याची आज्ञा दिली.
* “अंतःकरणाची सुंता” हे वाक्यांश लाक्षणिक अर्थाने एखाद्या व्यक्तीपासून पाप कापून टाकणे किंवा काढून टाकणे याला संदर्भित करते.
* आध्यात्मिक अर्थाने, “सुंता झालेले” ज्यांना देवाने येशुच्या रक्ताद्वारे पापापासून शुध्द केले आणि जे त्याचे लोक आहेत अश्या लोकांना संदर्भित करते
* “सुंता न झालेली” हा शब्द म्हणजे ज्यांची शारीरिक सुंता झाली नाही त्यांना सूचित करते. हे आध्यात्मिकदृष्ट्या सुंता न झालेल्या व देवासोबत संबंध नसलेल्यांनाही लाक्षणिक अर्थाने सूचित करते.
“सुंता न झालेले” आणि “बेसुनत” या शब्दाचा अर्थ एखाद्या पुरुषाबद्दल आहे ज्याची शारीरिक सुंता झाली नाही. या संज्ञा देखील लाक्षणिक पद्धतीने वापरल्या जातात.
* मिसर हे एक असे राष्ट्र होते तेथे देखिल सुंता करण्याची गरज होती. तर, “सुंता न झालेल्या” लोकांद्वारे मिसराला पराभूत करण्याविषयी जेव्हा देव बोलतो तेव्हा तो अशा लोकांबद्दल बोलत आहे ज्यांची सुंता न झाल्याबद्दल मिसरी लोकांनी तुच्छ लेखिले.
* पवित्र शास्त्र अशा लोकांचा उल्लेख करते ज्यांचे “सुंता न झालेले हृदय” किंवा “अंत: करणाची सुंता न झालेले” आहेत. हे असे लोक म्हणण्याचा हा अलंकारिक मार्ग आहे
* जर सुंता यासाठी एखादा शब्द भाषेत वापरला किंवा ओळखला गेला तर “बेसुनत” हे “सुंता झालेली नाही” असे भाषांतरीत केले जाऊ शकते.
* “बेसुनत” ही अभिव्यक्ती भाषांतर संदर्भानुसार “सुंता न झालेले लोक” किंवा “देवाचे नाही असे लोक” असे केले जाऊ शकते, संदर्भावर अवलंबून आहे
* या शब्दाच्या अलंकारिक अर्थ अनुवाद करण्याच्या इतर मार्गांमध्ये “देवाचे लोक नाहीत” किंवा “जे देवाचे नाहीत असे बंडखोर” किंवा “देवाचे लोक आहेत हे चिन्ह नसणारे लोक” समावेश असू शकतो.
* जर सुंता यासाठी एखादा शब्द भाषेत वापरला किंवा ओळखला गेला तर “बेसुनत” हे “सुंता झालेली नाही” असे भाषांतरीत केले जाऊ शकते.
## भाषांतरातील सुचना:
* जर लक्ष्य भाषेची संस्कृती पुरुषांची सुंता करते, तर याचा संदर्भ घेण्यासाठी वापरलेला शब्द या संज्ञेसाठी वापरला जावा.
* हा शब्द भाषांतरित करण्याचे इतर मार्ग म्हणजे, “सर्वत्र कापणे” किंवा “वर्तुळात कापून टाकणे” किंवा “पुढचा भाग कापून टाकणे.”
* ज्या संस्कृतीत सुंता होत नाही अशा संस्कृतींमध्ये तळटीप किंवा शब्दकोशात त्याचे स्पष्टीकरण असणे आवश्यक असू शकते.
* याची खात्री करा की याचा अनुवाद करण्यासाठी वापरलेली संज्ञा महिलांना संदर्भित करत नाही. पुरुषाचा समावेश असलेल्या शब्दाने किंवा वाक्यांशासह भाषांतरित करणे आवश्यक असू शकते
(हे देखील पहा: [अज्ञातांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-unknown))
(हे देखील पहा: [अब्राहम](../names/abraham.md), [करार](../kt/covenant.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति १७:११](rc://*/tn/help/gen/17/11)
* [उत्पत्ति १७:१४](rc://*/tn/help/gen/17/14)
* [निर्गम १२:४८](rc://*/tn/help/exo/12/48)
* [लेवीय 26:41](rc://*/tn/help/lev/26/41)
* [जोशुआ ५:३](rc://*/tn/help/jos/05/03)
* [न्यायाधीश १५:१८](rc://*/tn/help/jdg/15/18)
* [२ शमुवेल १:२०](rc://*/tn/help/2sa/01/20)
* [यिर्मया 9:26](rc://*/tn/help/jer/09/26)
* [यहेज्केल ३२:२५](rc://*/tn/help/ezk/32/25)
* [प्रेषितांची कृत्ये 10:44-45](rc://*/tn/help/act/10/44)
* [प्रेषितांची कृत्ये 11:3](rc://*/tn/help/act/11/03)
* [प्रेषितांची कृत्ये १५:१](rc://*/tn/help/act/15/01)
* [प्रेषितांची कृत्ये 11:3](rc://*/tn/help/act/11/03)
* [रोमन्स 2:27](rc://*/tn/help/rom/02/27)
* [गलती 5:3](rc://*/tn/help/gal/05/03)
* [इफिस 2:11](rc://*/tn/help/eph/02/11)
* [फिलिप्पैकर ३:३](rc://*/tn/help/php/03/03)
* [कलस्सैकर 2:11](rc://*/tn/help/col/02/11)
* [कलस्सैकर 2:13](rc://*/tn/help/col/02/13)
## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहणे:
* __[5:3](rc://*/tn/help/obs/05/03)__ "तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक पुरुषाची __सुंता__ करणे आवश्यक आहे."
* __[5:5](rc://*/tn/help/obs/05/05)__ त्या दिवशी अब्राहामाने आपल्या घरातील सर्व पुरुषांची सुंता केली.
## शब्द संख्या:
* स्ट्रॉन्गचे: एच4135, एच4139, एच5243, एच6188, एच6189, एच6190, जी203, जी564, जी1986, जी4059, जी4061