mr_tw/bible/kt/call.md

7.4 KiB

बोलविणे , आरोळी मारणे

व्याख्या:

"बोलविणे" आणि "आरोळी मारणे" या शब्दांचा अर्थ सहसा मोठ्याने बोलणे असा होतो, परंतु "बोलविणे" या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला नाव देणे किंवा बोलावणे असा देखील असू शकतो. त्याचे इतर काही अर्थ देखील आहेत.

  • एखाद्याला “पुकारणे” म्हणजे ओरडणे, घोषणा करणे किंवा जाहीर करणे. ह्याचा अर्थ एखाद्याला मदत करण्यासाठी विचारणे असा देखील होतो, विशेषतः देवाला.
  • पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा, "बोलविणे" ह्याचा अर्थ "फर्मावने" किंवा "येण्याची आज्ञा देणे" किंवा "येण्याची विनंती करणे" असा होतो.
  • देव लोकांना त्याच्याकडे येण्यास आणि त्याचे लोक बनण्यास बोलवितो. हे त्यांचे "पाचारण" आहे.
  • जेव्हा देव लोकांना "बोलवितो," ह्याचा अर्थ देवाने लोकांना त्याची मुले होण्याकरिता, त्याचे सेवक होण्याकरिता आणि येशूद्वारे तारणाच्या संदेशाची घोषणा करण्याकरिता नियुक्त केले किंवा निवडले आहे.
  • या शब्दाचा उपयोग एखाद्याचे नाव संदर्भित करण्यासाठी देखील केला जातो. उदाहरणार्थ, "त्याचे नाव योहान असे आहे," म्हणडे "त्याचे नाव योहान असे ठेवण्यात आले" किंवा "त्याचे नाव योहान आहे."
  • "या नावाने बोलवले जाणे" ह्याचा अर्थ एखाद्याने कोणा एकाला नाव दिले आहे. देव म्हणतो की त्याने त्याच्या नावाने लोकांना बोलविले आहे.
  • एक वेगळी अभिव्यक्ती, मी तुला तुझ्या नावाने बोलावले आहे" ह्याचा अर्थ देवाने त्या व्यक्तीला विशिष्ठ पद्धतीने निवडले आहे.

भाषांतर सूचना

  • "बोलविणे" या शब्दाचे भाषांतर, "फर्मावने" या अर्थाच्या शब्दाद्वारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये हेतुपुरस्सर असल्याची कल्पना किंवा हेतुपूर्ण बोलविणे याचा समावेश आहे.
  • "तुला आरोळी मारली आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुला मदतीसाठी विचारले आहे" किंवा "तुला त्वरित प्रार्थना करतो" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, देवाने तुला त्याचा सेवक होण्यासाठी "बोलविले" आहे, ह्याचे भाषांतर "आपल्याला विशेषरित्या निवडले आहे" किंवा " त्याचे सेवक होण्यासाठी आपल्याला "नियुक्त केले" आहे असे केले जाऊ शकते.
  • "आपण त्याच्या नावाने बोलविणे आवश्यक आहे" ह्याचे भाषांतर "आपण त्याचे नाव घेणे आवश्यक आहे" असेही केले जाऊ शकते.
  • "त्याला नावाने बोलविण्यात येते" ह्याचे भाषांतर "त्याचे नाव आहे" किंवा "त्याचे नाव घेतले आहे" असेही केले जाऊ शकते.
  • “परमेश्वराच्या नावाने हाक मारणे” या वाक्याचे भाषांतर “परमेश्वराला शोध घ्या आणि त्याच्यावर अवलंबून राहा” किंवा “प्रभूवर विश्वास ठेवा आणि त्याचे पालन करा” असे केले जाऊ शकते.
  • कश्यासाठी तरी “बोलविणे” किंवा “मागणी करणे” किंवा “साठी विचारणे” किंवा "आज्ञा करणे" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "तुम्हाला माझ्या नावाने बोलविले आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुम्ही माझे आहात हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला माझे नाव दिले आहे" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा देव म्हणतो "मी तुला तुझ्या नावाने बोलविले आहे" ह्याचे भाषांतर "मी तुला ओळखतो आणि मी तुला निवडले आहे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा : प्रार्थना, ओरडणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समूह

  • स्ट्रोंग : H0559, H2199, H4744, H6817, H7121, H7123, H7769, H7773, G01540, G03630, G14580, G15280, G19410, G19510, G20280, G20460, G25640, G28210, G28220, G28400, G29190, G30040, G31060, G33330, G33430, G36030, G36860, G36870, G43160, G43410, G43770, G47790, G48670, G54550, G55370, G55810