mr_tw/bible/kt/body.md

5.9 KiB

शरीर

व्याख्या:

"शरीर" या संज्ञा शब्दशः एखाद्या मनुष्याच्या किंवा प्राण्याच्या भौतिक शरीराला संदर्भित करते. ही संज्ञा लाक्षणिक अर्थाने एखाद्या वस्तूला किंवा संपूर्ण गट ज्याचे वैयक्तिक सदस्य आहेत यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • बऱ्याचदा "शरीर" हा शब्द मेलेल्या मनुष्याला किंवा प्राण्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. काहीवेळा ह्याला "मृत शरीर" किंवा "प्रेत" म्हणून संदर्भित केले जाते.
  • जेव्हा येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या शेवटच्या वल्हांडण सणाच्या जेवनावेळी बोलला की, ही (भाकर) माझे शरीर आहे," तेव्हा तो त्याच्या भौतिक शरीराला संदर्भित करत होता जे त्यांच्या पापासाठी "मोडले" (मारले) जाणार होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, ख्रिस्ती लोकांच्या समूहाला "ख्रिस्ताचे शरीर" म्हणून संदर्भित केले आहे.
  • जसे भौतिक शरीरामध्ये अनेक भाग असतात, तसेच "ख्रिस्ताच्या शरीर" यामध्ये अनेक सदस्य आहेत.
  • प्रत्येक विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या शरीरात एक विशेष कार्य आहे, जेणेकरून संपूर्ण गटाने एकत्र येऊन देवाची सेवा करण्यास आणि त्याला गौरव प्राप्त होण्यास मदत होईल.
  • येशूला त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या “शरीराचे” “मस्तक” (पुढारी) असेही संबोधले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे मस्तक त्याच्या शरीराला काय करावे हे सांगते, त्याचप्रमाणे येशू हा ख्रिस्ती लोकांना त्याच्या “शरीराचे” अवयव म्हणून मार्गदर्शन व निर्देशन करतो.

भाषांतर सूचना:

  • या संज्ञेचे भाषांतर करण्यासाठी लक्षित भाषेतील भौतिक शरीरासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा सामान्यपणे उपयोग करणे हे सर्वोत्तम राहील. वापरलेला शब्द आक्षेपार्ह शब्द नाही याची खात्री करा.
  • विश्वासनाऱ्यांसाठी सामुहिकपणे संदर्भ देताना, काही भाषांसाठी "ख्रिस्ताचे आत्मिक शरीर" असे बोलणे अधिक नैसर्गिक आणि अचूक असू शकते.
  • जेव्हा येशू म्हणाला, "हे माझे शरीर आहे," हे जसेच्या तसे गरज पडल्यास एखाद्या टिपणाच्या स्पष्टीकरणासाहित भाषांतरित करणे सर्वोत्तम राहील.
  • काही भाषांमध्ये मृत शरीराला संदर्भित करण्यासाठी वेगळा शब्द असू शकतो, जसे की मनुष्यासाठी "प्रेत" किंवा प्राण्यांसाठी "शव." हे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द संदर्भामध्ये अर्थपूर्ण आहे आणि स्वीकार्य आहे याची खात्री करा.

(हे देखील पाहा: प्रमुख, हात; मुख; कंबर; उजवा हात; जीभ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समूह:

  • स्ट्रोंग : H0990, H1320, H1460, H1465, H1472, H1480, H1655, H3409, H4191, H5038, H5085, H5315, H6106, H6297, H7607, G44300, G49540, G49830, G55590