mr_tw/bible/kt/antichrist.md

4.2 KiB

ख्रिस्तविरोधी

व्याख्या:

"ख्रिस्तविरोधी" या संज्ञा एखाद्या व्यक्तीला किंवा शिकवणुकीला जी येशू ख्रिस्ताविरुद्ध आणि त्याच्या कार्याविरुद्ध आहे त्यास संदर्भित करते. जगामध्ये अनेक ख्रिस्त विरोधक आहेत.

  • प्रेषित योहान आपल्यास असे म्हणतो की जर एखादी व्यक्ती असे म्हणून लोकांना फसवत असेल की येशू हा मसिहा नव्हे किंवा येशू हा देव आणि मानव दोघेही नाही तर तो ख्रिस्तविरोधी आहे.
  • पवित्रशास्त्र असेही शिकवते की येशूच्या कार्याचा विरोध करणारा ख्रिस्तविरोधीचा सामान्य आत्मा या जगात कार्यरत आहे.
  • नवीन करारातील प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 13 अध्यात असे म्हटले आहे की "ख्रिस्तविरोधी" म्हटलेला एक मनुष्य आहे जो शेवटल्या काळात प्रकट होईल. हा मनुष्य देवाच्या लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न करेल, पण येशू त्याचा पराभव करील.
  • प्रेषित पौल या व्यक्तीला “अधर्माचा माणूस” (2 थेस्सलनी 2:3) आणि जगातील ख्रिस्तविरोधीच्या सामान्य आत्म्याला “अधर्माची गुप्त शक्ती” म्हणून संबोधतो (2 थेस्सलनी 2:7).

भाषांतर सूचना:

  • या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "ख्रिस्त-विरोधक" किंवा "ख्रिस्ताचा शत्रू" किंवा "ख्रिस्ताच्या विरुद्ध असणारा व्यक्ती" अशा शब्दांचा किंवा वाक्याचा समावेश होतो.
  • "ख्रिस्तविरोधकाचा आत्मा" या वाक्यांशाचे भाषांतर "ख्रिस्ताच्या विरोधात असलेला आत्मा" किंवा "ख्रिस्ताच्या विरोधात असत्य पसरविण्याची प्रवृत्ती" किंवा "ख्रिस्ताबद्दल खोटी शिकवण देणारा आत्मा" असे केले जाऊ शकते.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या अनुवादामध्ये याचे भाषांतर कसे केले जाते याचा विचार करा. (पाहा: अज्ञाताचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: ख्रिस्त, यातना)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी05000