mr_tw/bible/kt/anoint.md

5.1 KiB

अभिषेक करणे, अभिषिक्त, अभिषेक

व्याख्या:

"अभिषेक" या संज्ञेचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर तेल ओतणे किंवा चोळणे असा होता. कधीकधी तेलाला एक गोड, सुगंधी, वास देण्यासाठी त्यास मसाल्यांच्या मिश्रणात मिसळले जायचे. बायबलसंबंधी काळात, एखाद्याला तेलाने अभिषेक करण्याची अनेक कारणे होती.

  • जुना करारामध्ये, याजक, राजे आणि संदेष्टे यांना देवाच्या खास सेवेसाठी वेगळे करण्याकरिता तेलाने अभिषेक करण्यात येई.
  • देवाच्या उपासनेसाठी व गौरवासाठी उपयोगात येणार आहे हे दर्शविण्यासाठी वेदी किंवा निवासमंडप यासारख्या वस्तूंना तेलाचा अभिषेक करण्यात येत असे.
  • नवीन करारात, आजारी लोकांना बरे करण्यासाठी तेलाचा अभिषेक केला गेला.
  • नवा करार दोन वेळा नोंदवितो की उपासना म्हणून येशूला एका स्त्रीने सुगंधी तेलाने अभिषेक केला होता. एकदा येशू म्हणाला की हे करत असताना ती त्याच्या भावी अंत्यविधीची तयारी करत होती.
  • येशूचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मित्रांनी त्याचे शरीर तेल आणि मसाल्यांच्या अभिषेकाद्वारे दफन करण्यासाठी तयार केले.
  • "मसिहा" (इब्री) आणि "ख्रिस्त" (ग्रीक) या शीर्षकाचा अर्थ "अभिषिक्त (एक)" असा होतो.
  • येशू हाच मसिहा आहे जो संदेष्टा, महायाजक, आणि राजा म्हणून निवडला आणि अभिषिक्त केला गेला.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "अभिषेक" या संज्ञेचे भाषांतर "तेल ओतणे" किंवा "तेल लावणे" किंवा "सुगंधी तेल ओतून समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
  • "अभिषिक्त" या संज्ञेचे भाषांतर "तेलाने अभिषेक करून समर्पित होणे" किंवा "नियुक्त होणे" किंवा "समर्पित होणे" असे केले जाऊ शकते.
  • काही संदर्भांमध्ये "अभिषेक" या संज्ञेचे "नियुक्ती" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते.
  • "अभिषिक्त याजक" या शब्दाचे भाषांतर "तेलाने समर्पित केलेला याजक" किंवा "तेल ओतून वेगळा केलेला याजक" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: ख्रिस्त, समर्पित, महायाजक, यहूद्यांचा राजा, याजक, संदेष्टा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच0047, एच0430, एच1101, एच1878, एच3323, एच4397, एच4398, एच4473, एच4886, एच4888, एच4899, एच5480, एच8136, जी00320, जी02180, जी07430, जी14720, जी20250, जी34620, जी55450, जी55480