mr_tw/bible/kt/amen.md

33 lines
4.8 KiB
Markdown

# आमेन, खरोखर
## व्याख्या:
"आमेन" ही संज्ञा एखाद्या व्यक्तीने काय सांगितले आहे त्यावर विशेष जोर देण्यासाठी किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरला जाणारा एक शब्द आहे. हा सहसा प्रार्थनेच्या शेवटी वापरला जातो. काहीवेळा तो खरोखर असाही भाषांतरित केला जातो.
* जेव्हा प्रार्थनेच्या शेवटी वापरला जातो, तेव्हा "आमेन'' प्रार्थना सह कराराचा संवाद दर्शवितो किंवा अशी इच्छा व्यक्त करातो की प्रार्थना पूर्ण व्हावी.
* त्याच्या शिकवणुकीमध्ये, येशूने त्याच्या बोलण्यातील सत्यतेवर जोर देण्यासाठी "आमेन" या शब्दाचा वापर केला. पूर्वीच्या शिकवणीशी संबंधित असलेल्या दुसर्‍या शिकवणीचा परिचय करून देण्यासाठी तो अनेकदा “आणि मी तुम्हाला सांगतो” या शब्दाचे अनुसरण करत असे.
* जेव्हा येशू या पध्दतीने "आमेन" या शब्दाचा वापर करतो, तेव्हा काही इंग्रजी आवृत्ती (आणि युएलटी) "खरे" किंवा "सत्य" म्हणून भाषांतरित करतात.
* आणखी एक शब्द ज्याचा अर्थ "खरोखर" असा आहे तो "खात्रीने" किंवा "नक्कीच" म्हणून कधीकधी भाषांतरित केला जातो आणि वक्ता काय म्हणत आहे यावर जोर देण्यासाठी देखील वापरला जातो.
## भाषांतर सूचना
* लक्ष्‍य भाषेमध्‍ये विशेष शब्द किंवा वाक्प्रचार आहे की नाही याचा विचार करा जे बोलण्‍यात आलेल्‍या एखाद्या गोष्टीवर जोर देण्‍यासाठी वापरले जाते.
* जेव्हा प्रार्थनेच्या शेवटी किंवा एखाद्या गोष्टीची पुष्टी करताना आमेन वापरतात, तेव्हा हा शब्द "असेच होवो" किंवा "असे होऊ शकते" किंवा "हे सत्य आहे" असेही भाषांतरित करतात.
* जेव्हा येशू म्हणतो, "मी तुम्हाला खरे सांगतो," तर याचे भाषांतर "होय, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो" किंवा "ते खरे आहे आणि मी तुम्हालाही सांगतो" असे करता येऊ शकते.
* "मी तुम्हाला खचित खचित सांगतो" या वाक्यांशाचे भाषांतर, "मी तुम्हाला हे अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो" किंवा "मी तुम्हाला अत्यंत कळकळीने सांगतो" किंवा "मी तुम्हाला काय सांगतो ते सत्य आहे" असे देखील केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [पूर्ण](../kt/fulfill.md), [खरे](../kt/true.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [अनुवाद 27:15](rc://*/tn/help/deu/27/15)
* [योहान 5:19](rc://*/tn/help/jhn/05/19)
* [यहूदाचे पत्र 1:24-25](rc://*/tn/help/jud/01/24)
* [मत्तय 26:33-35](rc://*/tn/help/mat/26/33)
* [फिलेमोन 1:23-25](rc://*/tn/help/phm/01/23)
* [प्रकटीकरण 22:20-21](rc://*/tn/help/rev/22/20)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग:एच0543, जी02810