mr_tw/bible/kt/adultery.md

4.4 KiB

व्यभिचार, व्यभिचारी, जारकर्मी, व्याभिचारिणी

व्याख्या:

"व्यभिचार" या शब्दाचा संदर्भ अशा पापाचा आहे जो विवाहित व्यक्तीने त्या व्यक्तीचा जोडीदार नसलेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवल्यास होतो. ते दोघेही व्यभिचाराचे दोषी आहेत. “व्यभिचार” हा शब्द या प्रकारच्या वर्तनाचे किंवा हे पाप करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे वर्णन करतो.

  • "व्यभिचारी" ही संज्ञा व्यभिचार करणा-या कोणत्याही व्यक्तीला संदर्भित करतो.
  • कधीकधी "व्यभिचारिणी" हा शब्द व्यभिचार करणारी एक स्त्री होती हे दर्शविण्यासाठी वापरला जातो.
  • पती-पत्नीने लग्नाच्या करारामध्ये एकमेकांबद्दल केलेल्या आश्वासनांना व्याभिचार तोडून टाकतो.
  • तुम्ही व्यभिचार करू नये अशी इस्राएलांना परमेश्वराने आज्ञा दिली आहे.

भाषांतर सूचना:

  • लक्ष्यित भाषेमध्ये "व्यभिचार" असा अर्थ असलेला एकही शब्द नसल्यास या संज्ञेचा "दुसऱ्या कोणाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे" किंवा "दुसऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराशी निकटचा संबंध असणे" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • काही भाषेत व्यभिचाराबद्दल बोलण्याचा एक अप्रत्यक्ष मार्ग असू शकतो, जसे की "कोणाच्यातरी पतीबरोबर निजणे" किंवा "आपल्या बायकोशी विश्वासघात करणे". (पाहा: शिष्टोक्ती)

(हे देखील पाहा: करणे, करार, लैंगिक अनैतिकता, दुसऱ्याबरोबर झोपणे, विश्वासू)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 13:06 व्यभिचार करू नकोस.
  • 28:02 व्यभिचार करु नकोस.
  • 34:07 धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, ‘‘हे देवा, मी तुला धन्यवाद देतो की मी अन्य मनुष्यांसारखा पापी नाही, जसे दरोडेखोर, अन्यायी पुरुष, जारकर्मी त्यांच्याप्रमाणे मी नाही, व हया जकातदारासारखाही नाही.”

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H5003, H5004, G34280, G34290, G34300, G34310, G34320