mr_tq/2co/12/20.md

1.5 KiB

पौल जेंव्हा परत करिंथ येथील पवित्र जनांकडे जाईल तेंव्हा त्याला काय आढळेल अशी भीती होती?

पौलाला अशी भीती होती की त्याला त्यांच्यामध्ये भांडणतंटे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणेफुगणे, अव्यवस्था आढळून येईल [१२:२०].

देव त्याला काय करील अशी पौलाला भीती होती?

देव करिंथ येथील पवित्रजनांपुढे पौलाला खाली पाहावयास लावील अशी त्याला भीती होती [१२"२१].

करिंथ येथील कांही पवित्र जनांनी अगोदर केलेल्या पापांसाठी पौलाला शोक करावा लागेल त्याचे कारण काय?

पौलाला अशी भीती होती की त्यांनी त्यांचा अशुद्धपणा, जारकर्में, आणि कामातुरपणा ह्याबद्दल पश्चात्ताप केला नसावा [१२:२१].