mr_tq/2co/10/11.md

1.2 KiB

पौलाचे व्यक्तिमत्व त्याच्या पत्रांद्वारे सूचित केल्यापेक्षा वेगळे होते असे म्हणणा-याना त्याने काय म्हटले?

पौलाने असे म्हटले की तो दूर असतांना जसे त्याचे शब्द होते तशाचप्रकारची त्याची कृतीहि तो करिंथ येथील पवित्र जनासोबत असतांना असणार होती [१०:११].

जे स्वत:ची प्रशंसा करतात ते शहाणे नाहीत हे दाखविण्यासाठी काय करतात?

त्यांनी स्वत:च एकमेकांशी स्वत:चे मोजमाप केले आणि स्वत:च एकमेकांशी स्वत:ची तुलना केली आणि ह्याद्वारे ते शहाणे नाहीत हे दाखविले [१०:१२].