mr_tq/2co/09/03.md

1.5 KiB

पौलाने बांधवांना करिंथ येथे का पाठविले होते?

करिंथ येथील पवित्र जनांविषयीचा त्याचा अभिमान व्यर्थ जाऊ नये आणि पौलाने जसे सांगितले होते तसे ते तयार होतील ह्यासाठी त्याने बांधवांना पाठविले होते [९:३]

करिंथकरांनी जे दान देऊ करण्याचे वचन दिले होते त्याविषयी अगाऊ तयारी करण्यासाठी बंधुजनांना करिंथ येथील पवित्र जनांकडे पाठविणे आवश्यक होते असा पौलाने का विचार केला होता?

जर कदाचित मासेदोनियाचा कोणी एक पौल आणि त्याच्या सोबत्यांबरोबर आला आणि त्यांनी जर पाहिले की करिंथकर दान देण्यास तयार नव्हते तर त्यांची फजिती होऊ नये, व त्यांनी जबरदस्तीने नव्हे तर स्वेच्छेने दान द्यावे अशी पौलाची इच्छा होती [९:४,५].