mr_tq/mat/04/01.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून कोणी येशूला अरण्यांत नेले?
सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने येशूला अरण्यांत नेले [४:१].
# अरण्यामध्ये येशूने किती वेळ उपास केल?
अरण्यामध्ये येशूने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला [४:२].
# सैतानाने येशूला टाकलेली पहिली परीक्षा कोणती होती?
धोंड्याची भाकर करावी ही पहिली परीक्षा सैतानाने येशूला टाकली [४:३].
# पहिल्या परीक्षेचे येशूने कोणे उत्तर दिले?
येशूने म्हटले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणा-या प्रत्येक वचनाने जगेल [४:४].