mr_ta/translate/writing-pronouns/01.md

57 lines
15 KiB
Markdown

**वर्णन**
जेव्हा आपण बोलतो किंवा लिहितो, तेव्हा आम्ही नेहमी नाम किंवा नावाला पुन्हा न वापरता लोक किंवा गोष्टींना संदर्भित करण्यासाठी सर्वनामांचा वापर करतो. ससहसा, आपण पहिल्यांदा एका कथेमध्ये एखाद्याला संदर्भित करतो तेव्हा आम्ही वर्णनात्मक वाक्यांश किंवा नावाचा वापर करतो. पुढील वेळी आपण सामान्य व्यक्ती किंवा नावाने त्या व्यक्तीचा उल्लेख करू. जोपर्यंत आपल्याला वाटते की आपले प्रेक्षक सहज समजतील की सर्वनाम कोणास संदर्भित करते, तोपर्यंत आपण त्याच्या नावाला सर्वनामासह संदर्भित करू शकतो.
> **निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुशी लोकांपैकी एक असून, यहूदी लोकांचा एक पुढारी होता**. **हा मनुष्य** रात्रीच्यासमयी येशूकडे आला. येशूने उत्तर दिले व **त्याला** म्हणाला … (योहान ३:१, २अ, ३अ युएलटी)
योहान ३ मध्ये, निकदेमाचा प्रथम संज्ञा आणि त्याच्या नावासह उल्लेख केला गेला आहे. मग त्याचा उल्लेख "हा मनुष्य" या संज्ञेसह केला जातो. मग त्यास “त्याला” या सर्वनामाने संबोधले जाते.
प्रत्येक भाषेत नेहमीच्या पध्दतीने लोक आणि गोष्टींना संदर्भित करण्यासाठी नियम व अपवाद आहेत.
* काही भाषांमध्ये, एखादा परिच्छेद किंवा अध्यायामध्ये पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यास सर्वनामऐवजी संज्ञेसह संदर्भित केले जाते.
* काही भाषांमध्ये, कथेत मुख्य पात्राची ओळख झाल्यानंतर, त्यास सहसा सर्वनामासह संबोधले जाते. काही भाषांमध्ये विशिष्ट सर्वनामे असतात जे फक्त मुख्य पात्राला संदर्भित करतात.
* काही भाषांमध्ये, क्रियापदाला चिन्हांकित केल्यामुळे लोकांना कर्ता कोण आहे हे जाणून घेण्यास मदत होते. (पाहा [क्रियापद](../figs-verbs/01.md).) यापैकी काही भाषांमध्ये, प्रेक्षक कर्ता कोण आहे हे समजण्यासाठी मदत व्हावे म्हणून या चिन्हावर अवलंबून असतात. वक्ते सर्वनाम, संज्ञा वाक्यांश किंवा योग्य नावाचा वापर तेव्हाच करतात जेव्हा त्यांना कर्ता कोण आहे यावर एकतर भर द्यायाचा असतो किंवा स्पष्ट करायचे असते
#### कारण हा भाषांतर मुद्दा आहे
* भाषांतरकारांनी त्यांच्या भाषेसाठी चुकीच्या वेळी सर्वनामाचा वापर केल्यास लेखक कोणाविषयी बोलत आहेत हे वाचकांना कदाचित समजणार नाही
* भाषांतरकारांनी वारंवार मुख्य पात्राचा नावाने उल्लेख केला, तर काही भाषांचे प्रेक्षक ती व्यक्ती मुख्य पात्र आहे हे समजू शकणार नाहीत, किंवा त्यांना असे वाटेल की त्याच नावाचे एक नवीन पात्र आहे.
* जर भाषांतरकार चुकीच्या वेळी सर्वनाम, संज्ञा किंवा नावांचा वापर करत असतील, तर लोक कदाचित असा विचार करतील की संदर्भित करत असलेली व्यक्ती किंवा वस्तू यावर काही विशेष भर दिला जात आहे.
### बायबलमधील उदाहरणे
खालील उदाहरण अध्यायाच्या सुरुवातील आढळते. काही भाषांमध्ये सर्वनाम कोणाला संदर्भित करत आहे हे स्पष्ट होत नाही.
> मग येशू पुन्हा सभास्थानात आला, आणि तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. **तो** शब्बाथ दिवशी **त्याला** बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक **त्याला** बारकाईने पाहात होते. (मार्क ३:१-२ युएलटी)
खालील उदाहरणामध्ये, पहिल्या वाक्यात दोन पुरुषांची नावे आहेत. दुसऱ्या वाक्यात कोणास "तो" म्हटले आहे हे कदाचित स्पष्ट नाही.
> काही दिवसांनंतर **अग्रिप्पा राजा** आणि बर्णीका **फेस्तास** आदर देण्यासाठी कैसरीयाला आले. नंतर **तो** तेथे बरेच दिवस राहिल्यावर, फेस्ताने पौला संबंधीत गोष्टी राजाला सादर केल्या…. (प्रेषितांची कृत्ये: २५:१३-१४)
येशू मत्तयच्या पुस्तकाचे मुख्य पात्र आहे, परंतु खाली दिलेल्या वचनांत त्याला चार वेळा नावाने संबोधले आहे.यामुळे काही भाषांतील भाषकांना असे वाटेल की येशू मुख्य पात्र नाही. किंवा ते असा विचार करू लागले की कथेत येशू नाव असलेल्या एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत. किंवा कदाचित असे विचार करत असतील की कोणताही भर दिलेला नसतानाही, त्याच्यावर काही प्रमाणात भर दिला जात आहे.
> त्या वेळी **येशू** शब्बाथदिवशी धान्याच्या शेतातून गेला. **त्याच्या** शिष्यांना भुक लागली व त्यांनी कणसे तोडण्यास सुरुवात केली व ते खाऊ लागले.परंतु जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते **येशूला** म्हणाले, “पाहा, तुझे शिष्य शब्बाथ दिवशी करणे जे बेकायदेशील आहे त्या गोष्टी ते करतात.” तेव्हा **येशू** त्यांना म्हणाला, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले नाही काय?"
> नंतर **येशू** ते ठिकाण सोडून त्यांच्या सभास्थानात गेला. (मत्तय १२:१-९ युएलटी)
### भाषांतर रणनीती
(१) कोणास किंवा कशासाठी सर्वनाम संदर्भि केले जात आहे हे तुमच्या वाचकांना स्पष्ट नसेल तर नाव किंवा एक नामाचा वापर करा.
(२) एखादी संज्ञा किंवा नावाची पुनरावृत्ती केल्यास लोक हे विचार करतात की मुख्य पात्र हे मुख्य पात्र नाही, किंवा लेखक त्या नावाने एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल बोलत आहे, किंवा तेथे भर नसतानाही, कोणावरतरी भर दिला जातो,तेव्हा त्याऐवजी सर्वनामाचा वापर करा.
### भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण
(१) कोणास किंवा कशासाठी सर्वनाम संदर्भि केले जात आहे हे तुमच्या वाचकांना स्पष्ट नसेल तर नाव किंवा एक नामाचा वापर करा.
> पुन्हा **तो** सभास्थानात गेला, आणि तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. काही परूशी **तो** शब्बाथदिवशी त्या मनुष्याला बरे करतो का हे पाण्यासाठी **त्याला** बारकाईने पाहत होते. (मार्क ३:१-२)
>
> > पुन्हा **येशू** सभास्थानात गेला, आणि तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. काही परूशी **तो** शब्बाथदिवशी त्या मनुष्याला बरे करतो का हे पाण्यासाठी **येशुला** बारकाईने पाहत होते.
(२) एखादी संज्ञा किंवा नावाची पुनरावृत्ती केल्यास लोक हे विचार करतात की मुख्य पात्र हे मुख्य पात्र नाही, किंवा लेखक त्या नावाने एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल बोलत आहे, किंवा तेथे भर नसतानाही, कोणावरतरी भर दिला जातो,तेव्हा त्याऐवजी सर्वनामाचा वापर करा.
> त्या समयी **येशू** शब्बाथदिवशी धान्याच्या शेतातून गेला. **त्याचे** शिष्य भुकेले होते, आणि त्यांनी कणसे तोडण्यास सुरुवात केली व ते खाऊ लागले. परंतू जेव्हा परुशांनी हे पाहीले, तेव्हा ते **येशुला** म्हणाले, "पाहा, तुझे शिष्य शब्बाथ दिवशी करणे जे बेकायदेशील त्या गोष्टी नते करतात.” तेव्हा **येशू** त्यांना म्हणाला, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले नाही काय?" नंतर **येशू** ते ठिकाण सोडून त्यांच्या सभास्थानात गेला. (मत्तय १२:१-९ युएलटी)
याचे भाषांतर असे केले जाऊ शकते:
> > त्या समयी **येशू** शब्बाथदिवशी धान्याच्या शेतातून गेला. **त्याचे** शिष्ट भुकेले होते आणि त्यांनी कणसे तोडण्यास सुरुवात केली व ते खाऊ लागले. परंतू जेव्हा परुशांनी हे पाहीले, ते **त्यास** म्हणाले, “पाहा, तुझे शिष्य शब्बाथदिवशी करणे जे बेकायदेशील आहे त्या गोष्टी ते करतात.” परंतू **तो** त्यांना म्हणाला, “जेव्हा दाविद व त्याच्याबरोबर असलेले माणसे भुकेले होते, तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले नाही काय?” मग **तो** ते स्थान सोडून त्यांच्या सभास्थानात गेला.