mr_ta/translate/writing-poetry/01.md

123 lines
14 KiB
Markdown

**वर्णन**
काव्य हा एक अशा मार्गांपैकी एक आहे ज्यामध्ये लोक आपले भाषण व लिखाण अधिक सुंदर बनविण्यासाठी आणि तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या भाषेचे शब्द आणि आवाजा याचा उपयोग करतात. कवितेच्या माध्यमातून, लोक साध्या काव्यात्मक नसलेल्या स्वरुपापेक्षा सखोल भावना व्यक्त करू शकतात.नीतिसूत्रेसारख्या सत्याच्या विधानांना कविता अधिक महत्व आणि सुरेखपणा देते आणि सामान्य भाषणापेक्षा लक्षात ठेवणे देखील सोपे असते.
#### सामान्यतः काव्यामध्ये काही गोष्टी आढळतात
* [अपोस्ट्रोफी](../figs-अपोस्ट्रोफी/01.md) यासारखे अनेक अलंकार.
* समांतर रेषा (पाहा [समांतरता](../figs-समांतरता/01.md))
* काही किंवा सर्व ओळींची पुनरावृत्ती
> सर्व देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा. सूर्य - चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. आकाशातील चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा. (स्तोत्र १४८:२-३ युएलटी)
* समान लांबीच्या ओळी.
> तुला मारलेली माझी हाक ऐक,
>
> परमेश्वरा; माझ्या विव्हळण्याबद्दल विचार कर.
>
> हे माझ्या राजा व माझ्या देवा, माझ्या हाकेची वाणी ऐक
>
> कारण मी तुलाच प्रार्थना करीत आहे. (स्तोत्र ५:१-२ युएलटी)
* शेवटी किंवा दोन किंवा अधिक ओळींच्या सुरूवातीस वापरलेला तोच आवाज
> "चम चम, चमकणारे छोटी **चांदणी**. तु काय **आहे** याबद्दल मला कसे आश्चर्य वाटेल. " (इंग्रजी यमकातून)
* समान ध्वनी बर्‍याच वेळा पुनरावृत्ती झाला आहे
> "पीटर, पीटर, भोपळा खाणारा" (इंग्रजी यमकातून)
>
> आपल्याला देखील आढळतात:
>
> * जुने शब्द आणि अविर्भाव
> * नाट्यमय प्रतिमा
> * व्याकरणाचा भिन्न वापर - यासह:
> * अपूर्ण वाक्ये
> * संयोजी शब्दांचा अभाव
#### आपल्या भाषेत काव्याचा शोध घेण्याची काही ठिकाणे
१. गाणे, विशेषतः जुनी गाणी किंवा मुलांच्या खेळांमध्ये वापरलेली गाणी
२. धार्मिक सोहळा किंवा पुजाऱ्याचे तंत्रमंत्र किंवा जादूगरणींचे तंत्रमंत्र
३. प्रार्थना, आशीर्वाद आणि शाप
४. जुने अख्यायक
#### मोहक किंवा कल्पनारम्य भाषण
मोहक किंवा काल्पनिक भाषण कवितेसारखेच आहे त्यामध्ये ते सुंदर भाषेचा उपयोग करतात, परंतु यात कवितांच्या भाषेची सर्व वैशिष्ट्ये वापरली जात नाहीत, आणि कवितेमध्ये उपयोग केला जातो तितका त्याचा उपयोग होत नाही. भाषेतील लोकप्रिय वक्ते बहुधा मोहक भाषणाचा उपयोग करतात, आणि आपल्या भाषेमध्ये भाषण कशामुळे मोहक बनते हे शोधण्यासाठी कदाचित हा मजकूराचा सर्वात सोपा स्त्रोत आहे.
#### कारण ही भाषांतरातील समस्या आहे.
* वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या गोष्टींसाठी कव्याचा उपयोग करतात. जर एखादा काव्यात्मक स्वरुपाचा आपल्या भाषेत समान अर्थ होत नसेल तर आपल्याला त्यास काव्याशिवाय लिहिण्याची आवश्यकता असू शकते.
* काही भाषांमध्ये, बायबलच्या विशिष्ट भागासाठी काव्याचा उपयोग करणे त्यास अधिक बळकट करेल.
### बायबलमधील उदाहरणे
बायबलमध्ये गाणी, शिकवण आणि भविष्यवाणीसाठी कव्याचा उपयोग केला जातो. जुन्या कराराच्या जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये कविता आहेत आणि बरीच पुस्तके पूर्णपणे काव्याने बनलेली आहेत.
> … तू माझे कष्ट पाहिले आहेस; तुला माझ्या जीवावरच्या संकटाची जाणीव आहे. (स्तोत्र ३१:७ युएलटी)
हे [समांतरता](../figs-समांतरता/01.md) याचे उदाहण आहेत, त्यामध्ये दोन ओळी आहेत ज्याचा अर्थ एकच आहे.
> परमेश्वर, राष्ट्रांचा न्याय करतो; परमेश्वरा परात्परा, माझा न्याय, कारण मी नीतिमान व सात्विक आहे. (स्तोत्र ७:८ युएलटी)
समांतरतेच्या या उदाहरणामध्ये देवाने दावीदासाठी जे करावे आणि अनीतिमान राष्ट्राबरोबर देवाने जे करावे त्याची तो अपेक्षा करतो याबद्दलचा विरोधाभास दर्शविला जातो. (पाहा [समांतरता](../figs-समांतरता/01.md).)
> गर्विष्टतेने केलेल्या पापापासून आपल्या सेवकाला राख; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो. (स्तोत्र १९:१३अ युएलटी)
मानवीकरणाचे हे उदाहरण पापांबद्दल असे बोलते की जणू ते एखाद्या व्यक्तीवर राज्य करू शकतात. (पाहा [मानवीकरण](../figs-मानवीकरम/01.md).)
> परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.
>
> कारण त्याच्या कराराचा विश्वासुपणा सनातन आहे.
>
>
> देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा,
>
> कारण त्याच्या कराराचा विश्वासुपणा सनातन आहे.
>
> प्रभुंच्या प्रभुचे उपकारस्मरण करा,
>
>
> कारण त्याच्या कराराचा विश्वासुपणा सनातन आहे.
>
> (स्तोत्र १३६:१-३ युएलटी)
या उदाहरणात “धन्यवाद द्या” आणि “त्याच्या कराराचा विश्वासुपणा सनातन आहे” या वाक्यांशाची पुनरावृत्ती केली जाते."
### भाषांतर पध्दती
जर स्त्रोत मजकूरामध्ये वापरल्या जाणार्‍या कवितांची शैली नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ देत असेल तर त्याचा वापर करण्याचा विचार करा. जर नाही, तर येथे त्यास भाषांतरीत करण्याचे इतर मार्ग आहेत.
(१) आपल्या कवितांच्या शैलीपैकी एक वापरून काव्याचे भाषांतर करा.
(२) आपल्या शैलीतील मोहक भाषणाचा वापर करुन कवितांचे भाषांतर करा.
(३) आपल्या सामान्य भाषणाची शैली वापरुन कवितांचे भाषांतर करा.
जर तुम्ही काव्याचा उपयोग करता तर ते अधिक सुंदर होईल.
जर तुम्ही सामान्य भाषेचा उपयोग करता तर ते अधिक स्पष्ट होईल.
### भाषांतर पध्दतीच्या उदारणांचे लागुकरण
> जो पुरुष दुष्टाच्या मसलतीप्रमाणे चालत नाही, किंवा पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही, किंवा निंदा करणाऱ्यांच्या बैठकीत बसत नाही. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात आनंत मानतो, व त्याच्या नियमाचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. (स्तोत्र १:१-२ युएलटी)
स्तोत्र १:१-२ याचे लोक कसे भाषांतर करतात याचे काही उदारणे खाली दिलेले आहेत.
(१) आपल्या कवितांच्या शैलीपैकी एक वापरून काव्याचे भाषांतर करा. (या उदाहरणातील शैलीमध्ये प्रत्येक ओळीच्या शेवटी समान शब्द आहेत.)
> > “ **पापासाठी** प्रवृत्त होत नाही, देवासाठी अपमानास्पत असलेल्या गोष्टींची तो **सुरुवात** करत नाही, जे देवावर हसतात त्यांच्याशी तो **नाते ठेवणार नाही.** देवच त्याचा सततचा **आनंद** आहे,जे देव **योग्य** आहे असे सांगतो ते तो करतो, तो त्याबद्दल दिवस **व रात्र** विचार करतो. तो व्यक्ती धन्य”
(२) आपल्या शैलीतील मोहक भाषणाचा वापर करुन कवितांचे भाषांतर करा.
> > अशाप्रकारचा व्यक्ती आहे जो खरोखरच धन्य आहे: जो दुष्ट लोकांच्या मसलतीचा स्विकार करत नाही पाप्यांसोबत बोलण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबत नाही जे देवावर हसतात त्यांच्या मेळाव्यात सामील होत नाही. त्याऐवजी, त्याला परमेश्वराच्या नियमांमध्ये खूप आनंद होतो, आणि तो रात्रंदिवस त्यावर मनन करतो.
(३) आपल्या सामान्य भाषणाची शैली वापरुन कवितांचे भाषांतर करा.
> > जे लोक वाईट लोकांचा सल्ला ऐकत नाहीत त्यांना खरोखर आनंदात असतात. जे लोक नेहमी वाईट गोष्टी करत असतात त्यांच्याबरोबर ते वेळ घालवत नाहीत किंवा जे लोक देवाचा आदर करीत नाहीत त्यांच्यात सामील होत नाहीत. त्याऐवजी, त्यांना परमेश्वराचा नियम पाळणे फार आवडते आणि ते त्याबद्दल नेहमी विचार करत असतात.