mr_ta/translate/writing-participants/01.md

16 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

पहिल्यांदा जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये लोक किंवा गोष्टींचा उल्लेख केला जातो, तेव्हा ते नवीन सहभागी असतात. त्यानंतर, जेव्हा जेव्हा त्यांना नमूद केले जाते, तेव्हा ते जुने सहभागी असतात.

आता तेथे परुशांपैकी मनुष्य होता ज्यांचे नाव निकदेम असे होते ... हा मनुष्य. रात्रीच्या वेळी येशूकडे आला ... येशूने त्याला उत्तर दिले व म्हणाला ... (योहान ३:१, २अ , ३अ)

प्रथम ठळक अक्षरातील वाक्यांश नवीन भागीदार म्हणून निकदेम याचा परिचय देते. परिचय दिल्यानंतर, जेव्हा तो एक जुना भागीदार होतो, तेव्हा त्याला "हा मनुष्य" आणि "त्याला" असे म्हणून संबोधले जाते.

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

तुमचे भाषांतर स्पष्ट आणि नैसर्गिक करण्याकरिता, सहभागींना अशा प्रकारे संदर्भित करणे आवश्यक आहे की लोकांना ते सहभागी नवीन आहे किंवा त्यांच्याबद्दल आधीच वाचलेले आहे असे सहभागी आहे हे समजेल. वेगवेगळ्या भाषांमध्ये असे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. स्त्रोत भाषा यास करते तसे नाही तर आपल्या भाषेत यास कसे केले जाते याचे आपण अनुसरण करायला हवे.

बायबलमधील उदाहरणे

नवीन सहभागी

खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच पुष्कळदा अति महत्वाचा नवीन सहभागी “तो अस्तित्वात आहे”, जसे की “एक मनुष्य होता” अशा वाक्यांशासह परिचित केला जातो. “होता” हा शब्द आपल्याला सांगते की हा मनुष्य अस्तित्वात होता. “मनुष्य” मधील “एक” हा शब्द आपल्याला सांगतो की लेखक त्याच्याबद्दल प्रथमच बोलत आहे. बाकीचे वाक्य सांगतात की हा माणूस कोठून होता, त्याचे कुटूंब कोणते आहे आणि त्याचे नाव काय आहे.

सरा गावच, दान वंशातला एक मनुष्य होता , आणि त्याचे नाव मानोहा असे होते . (शास्ते १३:२अ युएलटी)

एक नवीन सहभागी जो सर्वात महत्वाचा सहभागी नसतो अशा व्यक्तीची ओळख आधीच ओळखल्या जाणार्‍या अधिक महत्वाच्या व्यक्तीच्या संबंधात केली जाते. खालील उदाहरणात, मानोहाच्या पत्नीचा उल्लेख फक्त “त्याची पत्नी” असे म्हणून केला आहे. हा वाक्यांश तिचा त्याच्याशी असलेल्या नात्यास दर्शवितो.

तेव्हा सरा गावचा, दान वंशातला एक मनुष्य होता, आणि त्याचे नाव मानोह असे होते. त्याची पत्नी वांझ होती तीने कधीच मुलास जन्म दिलेला नव्हता. (शास्ते १३:२ युएलटी)

कधीकधी नवीन सहभागीचा साधारणपणे नावानेपरिचय दिला जातो कारण लेखक गृहित धरतात की वाचकांना ती व्यक्ती कोण आहे हे माहित असावे. १ राजे या पुस्तकाच्या पहिल्या वचनात, लेखक गृहीत धरतो त्याच्या वाचकांना दावीद राजा कोण आहे हे माहीत असावे, म्हणून तो कोण आहे हे स्पष्ट करण्याची गरज नाही.

आता दावीद राजा वृध्द झाला, तो म्हातारा झाला होता, व ते त्याला वस्त्रांनी झाकत असे, परंतू ते त्याला ऊब देत नसत. (१ राजे १:१ युएलटी)

जुने सहभागी

जो व्यक्ती आधीपासूनच कथेत असतो, त्यानंतर त्याला सर्वनामासह संदर्भित केले जाऊ शकते. खालील उदाहरणात, मानोहास “त्याची” या सर्वनामासह संदर्भित केले जाते, आणि आहे, आणि त्याच्या पत्नीस “ती” या सर्वनामसह संदर्भित केले जाते.

त्याची पत्नी वांझ होती तीने कधीच मुलास जन्म दिलेला नव्हता. (शास्ते १३:२ युएलटी)

कथेत काय घडत आहे यावर अवलंबून जुन्या सहभागींचा इतर मार्गांनी उल्लेखही केला जाऊ शकतो. खाली दिलेल्या उदाहरणात, कथा एका मुलास जन्म देण्याच्या बाबतीत आहे, आणि मानोहाच्या पत्नीचा उल्लेख "स्त्री" या संज्ञेद्वारे केला जातो.

परमेश्वराच्या दुताने स्त्रीला दर्शन दिले व तो तिला म्हणाला … (शास्ते १३:३अ युएलटी)

जुन्या सहभागीचा काही काळासाठी उल्लेख केला गेला नसेल, किंवा सहभागींमध्ये संभ्रम निर्माण झाला असेल, तर लेखक पुन्हा सहभागीच्या नावाचा वापर करु शकतो. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये, मानोहाचा उल्लेख त्याच्या नावाने केला आहे, जो लेखकाने पद्य २ पासून वापरला नाही.

मग मानोहाने परमेश्वराला प्रार्थना केली. (शास्ते १३:८अ युएलटी)

काही भाषा क्रिया विषयावर एक पुर्वप्रत्यय ठेवतात जो त्या विषयाबद्दल काहीतरी सांगतो. त्यापैकी काही भाषांमध्ये, जेव्हा ते वाक्याचे कर्ता असतात तेव्हा जुन्या सहभागींसाठी नेहमीच संज्ञा वाक्यांश किंवा सर्वनामांचा वापर करत नाहीत.क्रियापदावरील चिन्ह ऐकणार्‍याला कर्ता कोण आहे हे समजण्यासाठी पुरेशी माहिती देते. (पाहा क्रियापद.)

भाषांतर पध्दती

(१) जर सहभागी नवीन असेल, तर नविन सहभागीचा परीचय देण्यासाठी आपल्या भाषेतील पध्दतींचा उपयोग करा.

(२) जर सर्वनाम कोणाला संदर्भित करत आहे हे स्पष्ट नसेल, तर नाम वाक्यांश किंवा नावाचा उपयोग करा.

(३) जर एखाद्या जुन्या सहभागीला नाव किंवा नाम वाक्यांशाने संदर्भित केले जाते असेल, आणि हा दुसरा नवीन सहभागी आहे याचे लोकांना आश्चर्य वाटत असेल, तर त्याऐवजी सर्वनाम वापरुन पाहा. जर सर्वनाम आवश्यक नसेल कारण लोकांना संदर्भातून ते स्पष्टपणे समजत असेल, तर सर्वनामास सोडून द्या.

भाषांतर पध्दतीच्या उदाहणांचे लागूकरण

(१) जर सहभागी नवीन असेल, तर नविन सहभागीचा परीचय देण्यासाठी आपल्या भाषेतील पध्दतींचा उपयोग करा.

मग योसेफ, ज्याला प्रेषित बर्णबा असे म्हणत,( ज्याचे भाषांतर बोधपुत्र म्हणून केले जाते), तो कुप्र बेटात जन्मलेला लेवी होता… (प्रेषित ४:३६-३७ युएलटी) जेव्हा त्याची ओळख झाली नव्हती तेव्हा वाक्याची सुरुवात योसेफाच्या नावाने करून, कदाचित तो काही भाषांमध्ये गोंधळात टाकणारा होईल.

कुप्र बेटातील एक मनुष्य होता जो एक लेवी होता. त्याचे नाव योसेफ असे होते, आणि त्याला प्रेषितांनी बर्णबा असे नाव दिले. तेथे कुप्रचा एक लेवी होता ज्याचे नाव योसेफ होते. (याचा अर्थ बोधपुत्र असा आहे). कुप्र बेटातील एक लेवी होता ज्याचे नाव योसेफ होते. प्रेषितांनी त्याला बर्णबा असे नाव दिले, ज्याचा अर्थ बोधपुत्र असा होतो.

(२) जर सर्वनाम कोणाला संदर्भित करत आहे हे स्पष्ट नसेल, तर नाम वाक्यांश किंवा नावाचा उपयोग करा.

मग असे घडले की जेव्हा तो एका विशिष्ट ठिकाणी प्रार्थना करीत होता, त्यांने समाप्त केली, त्याच्या शिष्यांपैकी एकाने म्हटले, "प्रभु, जशी योहानाने आपल्या शिष्यांना शिकवल्याप्रमाणे आम्हाला प्रार्थना करायला शिकवा." (लूक ११:१ युएलटी) -हे अध्यायातील पहिले वचन असल्यामुळे, वाचकांना "तो" कोणासाठी संदर्भित आहे याचे आश्चर्य वाटेल.

मग असे घडले जेव्हा येशुने एका विशिष्ट ठिकाणी प्रार्थना करण्याचे समाप्त केले, तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी एकाने म्हटले, "प्रभु, जशी योहानाने आपल्या शिष्यांना शिकवल्याप्रमाणे आम्हाला प्रार्थना करायला शिकवा."

(३) जर एखाद्या जुन्या सहभागीला नाव किंवा नाम वाक्यांशाने संदर्भित केले जाते असेल, आणि हा दुसरा नवीन सहभागी आहे याचे लोकांना आश्चर्य वाटत असेल, तर त्याऐवजी सर्वनाम वापरुन पाहा. जर सर्वनाम आवश्यक नसेल कारण लोकांना संदर्भातून ते स्पष्टपणे समजत असेल, तर सर्वनामास सोडून द्या.

योसेफाच्या मालकाने योसेफला पकडले, आणि त्याला तुरुंगात टाकले, जेथे राजाच्या सर्व बंदिवानांना ठेवले होते, आणि योसेफ तेथे राहिला. (उत्पत्ती ३९:२०) - योसेफ हा या कथेमधील मुख्य व्यक्ति असल्यामुळे, काही भाषा कदाचित सर्वनामाला प्राधान्य देऊ शकतात.

योसेफाच्या मालकाने त्याला पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले, जेथे राजाच्या सर्व बंदिवानांना ठेवले होते, आणि तो तेथे राहिला.