mr_ta/translate/writing-newevent/01.md

18 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

जेव्हा लोक एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा ते एका घटनेबद्दल किंवा घटनेच्या मालिकेविषयी सांगतात. बऱ्याचदा ते कथेच्या सुरवातीस काही माहिती ठेवतात, जसे की कथा कोणाबद्दल आहे, ते केव्हा घडली, व कोठे घडली. कथेतील घटना सुरू होण्यापूर्वी लेखक जी माहिती देतात त्याला कथेचा देखावा म्हणतात. कथेतील काही नवीन घटनांमध्ये देखील देखावे असतात कारण त्यामध्ये कदाचित नवीन लोक, नवीन वेळ आणि नवीन ठिकाणे यांचा समाविष्ट असू शकतो. काही भाषांमध्ये, त्यांनी ही घटना पाहिली आहे किंवा दुसर्‍याकडून ऐकली आहे असे लोक सांगतात.

जेव्हा आपले लोक घटनांबद्दल सांगतात, तेव्हा सुरुवातीला कोणती माहिती ते देतात? ते त्यामध्ये काही विशिष्ट क्रम ठेवतात का? आपल्या भाषांतरात, कथेच्या सुरुवातीला आपली भाषा ज्या पध्दतीने नविन माहीतीचा परिचय करून देते किंवा स्त्रोत भाषेने ज्या पद्धतीने केले त्याऐवजी नवीन घटनेचा परीचय देते यांच्या पध्दतीचे अनुसरण करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपले भाषांतर नैसर्गिक वाटतील आणि आपल्या भाषेत स्पष्टपणे संवाद साधतील.

बायबलमधील उदाहरणे

यहुदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसात, अबीयाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा एक याजक होता. आणि त्याचे पत्नी अहरोनाच्या कुळातील होती, व तिचे नाव अलीशिबा होते. (लुक १:५ युएलटी)

वरील वचने जखऱ्याच्या कथेचा परिचय देतात. पहीला ठळक अक्षरातील वाक्यांस सांगतो की ती केव्हा घडली, व पुढील दोन ठळक अक्षरातील वाक्यांश मुख्य लोकांचा परीचय देतात. पुढील दोन वचने असे स्पष्ट करतात की जखऱ्या आणि अलीशिबा वृद्ध होते आणि त्यांना काहीच मूलबाळ नव्हते. हा सर्व देखावा आहे. मग लूक १: ८ मधील “आणि असे घडले की” हा वाक्यांश या कथेतील पहिली घटना ओळखण्यास मदत करतो:

आणि असे घडले की तो आपल्या वर्गाप्रमाणे देवापुढे याजकाचे काम करत असता , याजकांच्या प्रथेनुसार, मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे धुप जाळण्याचे कम करण्यास त्याची चिठ्ठी निघाली. (लूक १:८-९ युएलटी)

येशू ख्रिस्ताचा जन्म पुढील मार्गाने झाला. त्याची आई, मरीया, योसेफाशी लग्न करण्यास वाग्दत्त झाली होती, परंतू ते एकत्र येण्यापुर्वी, ती पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झालेली दिसली. (मत्तय १:१८ युएलटी)

वरील ठळक वाक्यांमुळे हे स्पष्ट होते की येशूविषयीची एक कथा सादर केली जात आहे. कथा येशूचा जन्म कसा झाला याविषयी सांगेल.

आता हेरोदाच्या काळात यहुदीयाच्या बेथेलहेमात येशुचा जन्म झाल्यानंतर, पाहा, पुर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस आले. (मत्तय २:१ युएलटी)

वरील ठळक वाक्यांशातून असे दिसून येते की मागी लोकांविषयीची घटना येशूचा जन्म झाल्यानंतर घडल्या.

आता त्या दिवसांमध्ये योहान बाप्तिस्मा करणारा यहुदीयाच्या रानात येऊन घोषणा करू लागला. (मत्तय ३:१-२२ युएलटी)

वरील ठळक वाक्यांशातून हे दिसून येते की बाप्तिस्मा करणारा योहान मागील घटनांच्या वेळी प्रचार करीत आला होता. हे बहुधा सामान्य आहे आणि येशू केव्हा नासरेथमध्ये राहत होता त्यास संदर्भित करते.

तेव्हा येशू गालीलाहून यार्देनेस योहानाकडे, त्याच्या हातून बाप्तीस्मा घेण्यास आला. (मत्तय ३:१३ युएलटी)

“तेव्हा” हा शब्द दर्शवितो की मागील वचनांमधील घटना घडल्याच्या काही वेळेनंतर येशू यार्देन नदीवर आला.

आता परुशांमधील एक मनुष्य होता ज्याचे नाव निकदेमस असे होते, तो यहुदीयाचा अधिकारी होता. हा मनुष्य रात्री येशुकडे आला. (योहान ३:१-२अ युएलटी)

लेखकाने प्रथम नवीन व्यक्तीची ओळख करून दिली आणि मग त्याने काय केले आणि केव्हा केले याबद्दल सांगितले. काही भाषांमध्ये, प्रथम त्या वेळेबद्दल सांगणे अधिक नैसर्गिक असेल.

६ जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला तेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता. ७ प्रलयाच्या पाण्यामुळे, नोहा, त्याचे मुलगे, त्याची बायको, व त्याच्या मुलांच्या बायका, हे एकत्र तारवामध्ये गेले. (उत्पत्ती ७:६-७ युएलटी)

६ वा अध्याय उर्वरित ७ व्या अध्यायात घडणाऱ्या घटनांचे विधान आहे. ६ व्या अध्यायात देवाने नोहाला पुर येईल याबद्दल कसे सांगितले आणि नोहाने त्यासाठी कशी तयारी केली याबद्दल अगोदरच सांगितले गेले आहे. ७ व्या अध्यायातील ६ व्या वचनात नोहा आणि त्याचे कुटुंब आणि जहाजात जाणारे प्राणी, पाऊस सुरू होणे, आणि पृथ्वीवर पावसामुळे पुर येणे याबद्दल सांगणाऱ्या कथेच्या भागाचा परिचय दिला आहे. काही भाषांमध्ये हे स्पष्ट करण्याची आवश्यकता असू शकते की हे वचन फक्त घटनेचा परिचय देते किंवा हे वचन ७ व्या वचनांतर हलवितो. ६ वे वचन हे कथेच्या घटनांपैकी नाही. पूर येण्यापूर्वी लोक तारवात गेले.

भाषांतर पध्दती

नवीन घटनेच्या सुरूवातीस दिलेली माहिती आपल्या वाचकांसाठी स्पष्ट आणि नैसर्गिक असले तर ती यूएलटी किंवा यूएसटीमध्ये आहे तशी भाषांतरीत करण्याचा विचार करा. नसल्यास, यापैकी एक पध्दती विचारात घ्या:

(१) आपले लोक ठेवतात तशी घटनेचा परीचय करून देणारी माहीती क्रमाने ठेवा.

(२) जर वाचकांना विशिष्ट माहितीची अपेक्षा असेल परंतु ती बायबलमध्ये नसल्यास, ती माहिती भरण्यासाठी एखादा अनिश्चित शब्द किंवा वाक्प्रचार वापरण्याचा विचार करा जसे की: “दुसर्‍या वेळी” किंवा “कोणीतरी.”

(३) जर परिचय संपूर्ण घटनेचा सारांश असेल तर, सारांश आहे असे दर्शविण्याच्या आपल्या भाषेतील पद्धतीचा वापर करा.

(४) सुरुवातील घटनेचा सारांश देणे लक्ष्यित भाषेत नविन असेल तर, घटना कथेमध्ये नंतर खरोखर घडतील असे निर्देशित करा.

भाषांतर पध्दतीच्या उदाहणाचे लागुकरण

(१) आपले लोक ठेवतात तशी घटनेचा परीचय करून देणारी माहीती क्रमाने ठेवा.

आता परुशांमधील एक मनुष्य होता ज्याचे नाव निकदेम असे होते, तो यहुदीयाचा अधिकारी होता. हा मनुष्य रात्रीच्या समयी येशुकडे आला. (योहान ३:१-२अ युएलटी)

एक मनुष्य होता ज्याचे नाव निकदेम असे होते. तो परुशी होता व यहुदी परिषदेचा सदस्य होता. एका रात्री तो येशुकडे याला.

एका रात्री निकदेम नावाचा मनुष्य, जो परुशी व यहुदी परिषदेचा सदस्य होता, येशूकडे आला.

तो तेथून जात असता, त्याने अल्फीचा मुलाग लेवी ह्याला, जकात नाक्यावर बसलेल पाहीले… (मार्क २:१४अ युएलटी)

तो तेथून जात असता, अल्फीचा मुलगा लेवी जकात नाक्यावर बसलेला होता. येशुने त्याला पाहीले व त्याला म्हणाला …

तो तेथून जात असता, जकात नाक्यावर एक मनुष्य बसलेला होता. त्याचे नाव लेवी होते, व तो अल्फीचा मुलगा होता, येशुने त्याला पाहीले व त्याला म्हणाला …

तो तेथून जात असता, जकात नाक्यावर बसलेला, एक जकातदार होता. त्याचे नाव लेवी होते, व तो अल्फीचा मुलगा होता. येशुने त्याला पाहीले व त्याला म्हणाला …

(२) जर वाचकांना विशिष्ट माहितीची अपेक्षा असेल परंतु ती बायबलमध्ये नसल्यास, ती माहिती भरण्यासाठी एखादा अनिश्चित शब्द किंवा वाक्प्रचार वापरण्याचा विचार करा जसे की: “दुसर्‍या वेळी” किंवा “कोणीतरी.”

जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला तेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता. (उत्पत्ती ७:६ युएलटी) नवीन घटना कधी घडली याबद्दल लोकांनी काही सांगण्याची अपेक्षा केली तर “त्यानंतर” हा वाक्यांश त्यांना ते आधीच नमुद केलेल्या घटनांनंतर घडले आहे हे समजण्यास मदत करू शकतो.

त्यानंतर, जेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता, तेव्हा पृथ्वीवर प्रलय आला.

समुद्राच्या बाजूला पुन्हा तो शिकवू लागला. (मार्क ४:१अ युएलटी) ३ अध्यायात येशू एखाद्याच्या घरी शिकवत होता. वाचकांना हे सांगण्याची गरज असते की ही नवीन घटना दुसर्‍या वेळी घडली आहे, किंवा येशू प्रत्यक्षात समुद्राकडे गेला होता.

दुसऱ्या वेळेला येशु समुद्राच्या बाजूला लोकांस शिकवू लागला.

येशू समुद्राकडे गेला आणि तेथे लोकांना पुन्हा शिकवू लागला.

(३) जर परिचय संपूर्ण घटनेचा सारांश असेल तर, सारांश आहे असे दर्शविण्याच्या आपल्या भाषेतील पद्धतीचा वापर करा.

जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला तेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता. (उत्पत्ती ७:६ युएलटी)

आता हे घडले तेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता आणि पृथ्वीवर प्रलय आला.

हा भाग काय घडले त्याबद्दल सांगतो तेव्हा पृथ्वीवर प्रलय आला. जेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता तेव्हा हे घडले.

(४) सुरुवातील घटनेचा सारांश देणे लक्ष्यित भाषेत नविन असेल तर, घटना कथेमध्ये नंतर खरोखर घडतील असे निर्देशित करा.

जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला तेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता. प्रलयाच्या पाण्यामुळे, नोहा, त्याचे मुलगे, त्याची बायको, व त्याच्या मुलांच्या बायका, हे एकत्र तारवामध्ये गेले. (उत्पत्ती ७:६-७ युएलटी)

आता हे घडले तेव्हा नोहा ६०० वर्षाचा होता. नोहा, त्याचे मुलगे, त्याची बायको, व त्याच्या मुलांच्या बायका, हे एकत्र तारवामध्ये गेले कारण देवाने सांगितले होते की प्रलय येईल.