mr_ta/translate/writing-endofstory/01.md

8.0 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

वेगवेळ्या प्रकारच्या माहिती कथेच्या शेवटी दिल्या गेल्या आहे. बहुतेकदा ही पार्श्वभूमीची माहिती असते. ही पार्श्वभूमीची माहिती कथेचा मुख्य भाग असलेल्या क्रियांपेक्षा भिन्न असते. अनेकदा ही पार्श्वभूमीची माहिती आहे. या पार्श्वभूमीची माहिती त्या कृतीपेक्षा भिन्न आहे जी कथाचा मुख्य भाग बनते. बायबलचे पुस्तक बर्‍याच छोट्या छोट्या कथांनी बनलेले आहे जे त्या पुस्तकाच्या मोठ्या कथांचे भाग असतात. उदाहरणार्थ, येशूच्या जन्माची कहाणी लूकच्या पुस्तकातील मोठ्या कथेतीली एक छोटी कथा आहे. या कथांपैकी प्रत्येक कथा मग मोठी असो किंवा लहान, तीच्या शेवटी पार्श्वभूमीची माहिती असू शकते.

खाली दिलेले कथा माहितीच्या समाप्तीसाठी असलेले उद्दीष्टे आहेत:

  • कथेला सारांशित करणे
  • कथेमध्ये काय घडले याविषयी एक टिप्पणी देणे
  • मोठ्या कथेला एक छोटीशी कथा जोडणे हा एक भाग आहे
  • कथेचा मुख्य भाग संपल्यानंतर विशिष्ट पात्राचे काय होते हे वाचकांना सांगणे.
  • कथेचा मुख्य भाग संपल्यानंतर चालू असलेल्या क्रिया सांगणे.
  • कथेमध्ये घडलेल्या घटनांच्या परिणामी कथेनंतर काय होते ते सांगणे

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

वेगवेगळ्या भाषांमध्ये या प्रकारची माहिती सादर करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जर तुम्ही (भाषांतरकार) असे करण्याचा आपल्या भाषेतील पध्दतीचा वापर करत नसाल, तर वाचकांना हे माहित नसेल:

  • म्हणजे ही माहीती कथेचा शेवट करत आहे
  • माहितीचा हेतू काय आहे
  • माहिती कशी कथेशी संबंधित आहे

भाषांतराचे पध्दती

  • आपली भाषा ज्या प्रकारची माहिती व्यक्त करते त्याप्रकारे कथेच्या शेवटी विशिष्ट प्रकारच्या माहितीचे भाषांतर करा.
  • याचे भाषांतर करा जेणेकरून ही कथा ज्या कथेचा भाग आहे त्या कथेशी कसे संबंधित आहे हे लोकांना समजेल.
  • शक्य असल्यास, कथेचा शेवट अशा प्रकारे भाषांतरीत करा की लोकांना समजेल की ती कथा कोठे संपते आणि पुढची सुरूवात होते.

बायबलमधील उदाहरणे

  • कथेला सारांशित करणे

आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे. अशा प्रकारे असे घडले की आपल्या सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणले गेले. (प्रेषितांची कृत्ये २७:४४ युएलटी)

  • कथेमध्ये काय घडले याविषयी एक टिप्पणी देणे

जादूटोणा करणाऱ्यांपैकी बर्‍याच जणांनी आपली पुस्तके एकत्र केली आणि ती सर्वांदेखत जाळून टाकली. मग त्यांनी त्यांच्या किमतीची बेरीज केली, आणि ती चांदीचे ५०, तुकडे असल्याचे आढळले. म्हणून परमेश्वराचे वचन सर्वत्र पसरले आणि सामर्थ्याने प्रबल झाले. (प्रेषितांची कृत्ये १९:१९-२० युएलटी)

  • कथेचा मुख्य भाग संपल्यानंतर विशिष्ट पात्राचे काय होते हे वाचकांना सांगणे.

तेव्हा मरीया म्हणाली, "माझा जीव परमेश्वराची स्तुती करतो, आणि माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवाविषयी आनंद करतो …" मरीया सुमारे तीन महिने एलिझाबेथजवळ राहीली आणि आपल्या घरी परत गेली. (लूक १:४६-४७, ५६ युएलटी)

  • कथेचा मुख्य भाग संपल्यानंतर चालू असलेल्या क्रिया सांगणे.

मग ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे आश्चर्यचकित झाले. परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून, त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या. (लूक २:१८-१९ युएलटी)

  • कथेमध्ये घडलेल्या घटनांच्या परिणामी कथेनंतर काय होते ते सांगणे

"तुम्हा यहुदी शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात; तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांना तुम्ही अडथळा केला." तो तेथून बाहेर गेल्यावर, शास्त्री व परुशी यांनी त्याचा तीव्र विरोध केला आणि त्याच्याविरूद्ध पुष्कळ गोष्टींबद्दल युक्तिवाद केला, त्याच्या मुखातून शब्द निघून त्यात त्याला पकडण्याची वाट पाहत बसले. (लूक ११:५२-५४ युएलटी)