mr_ta/translate/writing-background/01.md

18 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

जेव्हा लोक एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा ते सामान्यत: घटना घडलेल्या क्रमाने सांगतात. घटनांचा हा क्रम कथा तयार करतो. कथा पुर्ण कृतीच्या क्रियापदाने भरलेल्या आहेत ज्या कथेला वेळेनुसार हलवितात. परंतु कधीकधी लेखक कथेतून थोडी विश्रांती घेतो आणि आपल्या वाचकांना कथा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करण्यास काही माहिती देतो. या प्रकारच्या माहितीस पार्श्वभूमी माहिती असे म्हणतात.पार्श्वभूमीची माहिती त्याने आधी सांगितलेल्या घटनेपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल असू शकते, किंवा कथेमध्ये काहीतरी स्पष्टीकरण देऊ शकते, किंवा कदाचित अशा गोष्टीबद्दल असू शकते जी नंतरच्या काळात घडेल.

उदाहरण खाली दिलेल्या कथेतील ठळक वाक्ये सर्व पार्श्वभूमीची माहिती आहेत.

पेत्र आणि योहान शिकारीच्या प्रवासाला निघाले होते कारण दुसर्‍या दिवशी त्यांच्या गावात मेजवानी होणार होती. पेत्र हा गावचा उत्तम शिकारी होता.त्याने एकदा एकाच दिवसात तीन वन्य डुकरांना मारले! रानटी डुकराचा आवाज ऐकू येईपर्यंत ते झुडपात चालत होते. डुक्कर पळत सुटले, परंतु त्यांनी डुक्करास बाण मारण्यास व त्याला ठार करण्यात यश मिळविले. मग त्याचे पाय त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या काही दोरीने बांधले व ते खांबावर बांधून घरी घेऊन गेले. जेव्हा त्यांनी ते गावात आणले, तेव्हा पेत्राच्या चुलतभावाने त्या डुक्कराला पाहिले आणि ते त्याचे स्वत: चे डुक्कर असल्याचे समजले. पेत्राने आपल्या चुलतभावाच्या डुक्कराला चुकून मारले होते.

पार्श्वभूमीतील माहिती बर्‍याचदा अशा काही गोष्टींबद्दल सांगते ज्या आधी घडली होत्या किंवा खुप नंतर घडणारआहेत. यांचे उदाहण आहेत: “दुसर्‍या दिवशी त्यांच्या गावात मेजवानी होणार होती,” “एकदा त्याने एका दिवसात तीन वन्य डुकरांना मारले,” आणि “त्यांनी आपल्याबरोबर आणले.”

बर्‍याचदा पार्श्वभूमीची माहिती कृतींच्या क्रियापदांऐवजी "असणे" “होता” आणि “होते” या सारख्या क्रियापदाचा वापर करते. याचे उदाहरणे आहेत "त्याच्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी मेजवाणी होती," आणि "पेत्र" हा गावचा उत्तम शिकारी होता."

पार्श्वभूमीची माहिती अशा शब्दांसह देखील चिन्हांकित केली जाऊ शकते जी वाचकाला सांगते की ही माहिती कथेच्या घटनेचा भाग नाही. या कथेत, यापैकी काही शब्द आहेत “कारण,” “एकदा” आणि “होते”.

लेखक पार्श्वभूमीची माहितीचा उपयोग करू शकतात:

  • त्यांच्या वाचकांना कथेमध्ये रस वाटावा यासाठी मदत करणे
  • त्यांच्या वाचकांना कथेमध्ये काहीतरी समजण्यास मदत करणे
  • कथामध्ये काहीतरी महत्वाचे का आहे हे वाचकांचना समजून घेण्यासाठी मदत करणे
  • कथेच्या देखाव्याविषयी सांगण्यासाठी
  • देखाव्याचा समावेश:
  • जिथे कथा घडली
  • केव्हा कथा घडली
  • जेव्हा कथेला सुरुवात झाली तेव्हा कोण उपस्थित होते
  • जेव्हा कथा सुरु होते तेव्हा काय घडते

कारण ही भाषांतराची समस्या आहे

  • भाषांमध्ये पार्श्वभूमीची माहिती आणि कथानक माहिती चिन्हांकित करण्याचे वेगवेगळ्या पध्दती आहेत.
  • तुम्ही (भाषांतरकार) बायबलमधील घटनेचा क्रम, कोणती माहिती पार्श्वभूमी माहिती आहे, आणि कोणती कथेची माहिती आहे हे माहित असणे आवश्यक आहे.
  • आपण या कथेचे भाषांतर अशा प्रकारे केले पाहिजे ज्यामुळे पार्श्वभूमीची माहिती चिन्हांकित होईल ज्यायोगे आपल्या स्वत: च्या वाचकांना घटनांचा क्रम, कोणती माहिती पार्श्वभूमीची माहिती आहे आणि कोणती कथा़ेची माहिती आहे हे समजेल.

बायबलमधील उदाहरणे

हागारेने अब्रामाच्या मुलाला जन्म दिला, आणि अब्रामाने आपल्या मुलाचे नाव, ज्यास हागारेने जन्म दिला, इश्माएल असे ठेवले. जेव्हा हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला, तेव्हा अब्राम ८६ वर्षांचा होता (उत्पत्ती १६:१६ युएलटी)

पहिले वाक्य दोन घटनेबद्दल सांगते. हागारेने जन्म दिला आणि अब्राहामाने नाव दिले. दुसरे वाक्य जेव्हा त्या गोष्टी घडल्या तेव्हा अब्राम किती वर्षाचा होता याबद्दलची पार्श्वभुमीची माहिती आहे.

जेव्हा येशू शिकवू लागला, तेव्हा येशू स्वत: साधारण तीस वर्षाचा होता. तो हेलीचा मुलगा, योसेफ (जसे मानले होते) याचा मुलगा होता. (लूक ३:२३ युएलटी)

आणि येशू स्वत: सुमारे ३० वर्षांचा असताना त्याने सुरुवात केली. तो हेलीचा मुलगा, योसेफ (जसे गृहित धरले गेले होते) याचा मुलगा होता.

या आधीचे वचन जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला त्याबद्दल सांगतात. या वाक्यात येशूचे वय आणि पूर्वजांची पार्श्वभूमी याबद्दल माहिती आहे. कथा ४ थ्या अध्यायामध्ये पुन्हा सुरू होते जिथे येशू अरण्यात जात असल्याचे सांगितलं आहे.

मग एका शब्बाथ दिवशी असे झाले कि तो शेतातून जात होता व त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले. परंतु काही परुशी म्हणाले… (लूक ६:१-२अ युएलटी)

ही वचने कथेचा देखावा प्रदान करतात. शब्बाथ दिवशी धान्याच्या शेतात ही घटना घडली. येशू, त्याचे शिष्य, आणि काही परूशी तेथे होते, आणि येशूचे शिष्य धान्याची कणसे मोडून ते खात होते. “पण काही परुशी म्हणाले….” या वाक्यांशाने कथेतील मुख्य क्रियाची सुरुवात होते.

भाषांतर पध्दती

भाषांतर स्पष्ट आणि नैसर्गिक ठेवण्यासाठी लोक तुमच्या भाषेत कथा कसे सांगतात याचा तुम्हाला अभ्यास करणे आवश्यक आहे. आपली भाषा पार्श्वभूमीची माहिती कशाप्रकारे चिन्हांकित करते ते पाहा. याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही कथा लिहाव्या लागतील. पार्श्वभूमीच्या माहितीसाठी आपली भाषा कोणत्या प्रकारचे क्रियापद वापरते आणि कोणत्या प्रकारचे शब्द किंवा इतर खूण चिन्हांकित करतात की काहीतरी पार्श्वभूमीची माहिती आहे. जेव्हा आपण भाषांतर करता तेव्हा त्याच गोष्टी करा, म्हणजे आपले भाषांतर स्पष्ट व नैसर्गिक होईल आणि लोक ते सहजपणे समजू शकतील.

(१) विशिष्ट माहिती ही पार्श्वभूमीची माहिती दर्शविण्याऱ्या आपल्या भाषेचा मार्ग वापरा.

(२) माहितीची पुनर्रचना करा जेणेकरून आधीच्या घटनांचा प्रथम उल्लेख केला जाईल. (जेव्हा पार्श्वभूमीची माहिती खूप लांब असेल तेव्हा हे नेहमीच शक्य नसते.)

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

(१) विशिष्ट माहिती ही पार्श्वभूमीची माहिती दर्शविण्याऱ्या आपल्या भाषेचा मार्ग वापरा. यूएलटी इंग्रजी भाषांतरांमध्ये हे कसे केले गेले यास खालील उदाहरणे स्पष्ट करतात.

आणि येशू स्वत: सुमारे ३० वर्षांचा असताना त्याने सुरुवात केली. तो हेलीचा मुलगा, योसेफ (जसे गृहित धरले गेले होते).. याचा मुलगा होता.(लूक ३:२३ युएलटी)

कथेमध्ये काही प्रकारचे बदल आहेत हे दर्शविण्यासाठी इंग्रजी भाषा “आणि” या शब्दाचा वापर करते. "होता" हे क्रियापद दर्शविते की ती पार्श्वभुमीची माहीती होती.

तथापि, इतरही बऱ्याच गोष्टी सांगून त्याने लोकांना सुवार्ता सांगितली. परंतू मांडलिक हेरोद, यास त्याने त्याच्या भावाची बायको, हेरोदिया हिच्याबद्दल, आणि हेरोदाने केलेल्या त्या सर्व वाईट गोष्टींसाठी ताडण केल्यामुळे, त्याने या सर्वामध्ये याचीही जोड केली की: त्याने योहानाला तुरुंगात कोडून ठेवले. (लूक ३:१८-२० युएलटी)

योहानाने हेरोदाला ताडण करण्यापुर्वी ठळक अक्षरातील वाक्यांश आला आहे. इंग्रजीमध्ये, "केलेले" मधील “होता” हे सहाय्यकारी क्रियापद असे दर्शिविते की योहानाने त्याला ताडण केले त्यापुर्वी हेरोदाने त्या गोष्टी केल्या.

(२) माहितीची पुनर्रचना करा जेणेकरून आधीच्या घटनांचा प्रथम उल्लेख केला जाईल. (जेव्हा पार्श्वभूमीची माहिती खूप लांब असेल तेव्हा हे नेहमीच शक्य नसते.)

हागारेने अब्रामाच्या मुलाला जन्म दिला, आणि अब्रामाने आपल्या मुलाचे नाव, ज्यास हागारेने जन्म दिला, इश्माएल असे ठेवले. जेव्हा हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला, तेव्हा अब्राम ८६ वर्षांचा होता (उत्पत्ती १६:१६ युएलटी)

जेव्हा अब्राम ८६ वर्षाचा होता, तेव्हा हागारेने त्याच्या मुलास जन्म दिला, व अब्रामाने त्याचे नाव इश्माएल असे ठेवले.”

तथापि, इतरही बऱ्याच गोष्टी सांगून त्याने लोकांना सुवार्ता सांगितली. परंतू मांडलिक हेरोद, यास त्याने त्याच्या भावाची बायको, हेरोदिया हिच्याबद्दल, आणि हेरोदाने केलेल्या सर्व वाईट गोष्टींसाठी ताडण केल्यामुळे, त्याने या सर्वामध्ये याचीही जोड केली की: त्याने योहानाला तुरुंगात कोडून ठेवले. (लूक ३:१८-२० युएलटी)

खाली दिलेले भाषांतर योहानाच्या ताडणास आणि हेरोदाच्या क्रियांना पुनर्क्रमित करतो.

"तेव्हा मांडलिक हेरोद याने आपल्या भावाची बायको हेरोदिया हिच्याशी लग्न केले, आणि त्याने बरीच दुष्कृत्ये केली. त्यामुळे योहानाने त्यांना दोष लावला. परंतु मग हेरोदाने आणखी खुप दुष्ट गोष्ट केली. त्याने योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले."