mr_ta/translate/translate-unknown/01.md

16 KiB
Raw Permalink Blame History

बायबलचे भाषांतर करण्याचे काम करत असताना, आपण (भाषांतरकार) स्वत:स कदाचित असे विचारत असाल: "जेव्हा माझ्या संस्कृतीमधील लोकांनी कधीच या गोष्टींना पाहीले नसेल व आपल्याकडे त्यांच्यासाठी शब्द नसेल, तेव्हा सिंह, अंजिराचे वृक्ष, पर्वत, याजक, किंवा मंदिर यासारख्या शब्दांचे भाषांतर मी कसे करावे?

वर्णन

अज्ञात स्त्रोत या अशा गोष्टी आहेत ज्या मजकूरामध्ये घडतात त्या आपल्या संस्कृतीच्या लोकांना माहित नसतात. अनफोल्डींग वर्ड®भाषांतर शब्दांचे पृष्ठे व अनफोल्डींग वर्ड® भाषांतर नोंदी ते काय आहेत हे समजून घेण्यास आपली मदत करतील. तुम्हाला ते समजल्यानंतर, तुम्हास त्या गोष्टींना संदर्भित करण्यासाठी मार्गांचा शोध घेणे आवश्यक आहे जेणेकरून जे लोक तुमचे भाषांतर वाचतील त्यांना ते काय आहे हे समजेल.

ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे, याखेरीज आमच्याकडे काहीच नाही.” (मत्तय १४:१७ युएलटी)

भाकर हे एक विशिष्ट अन्न आहे जे धान्याला बारीक दळून तेल टाकून एकत्रित केले जाते, आणि मग त्या मिश्रणाला भाजले जाते जेणेकरून ते कोरडे होते. (धान्य हे एका प्रकारचे गवत आहे.) काही संस्कृतींमध्ये लोकांजवळ भाकरी नाही आणि ते काय आहे हे त्यांना माहीत नाही.

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

  • बायबलमध्ये असलेल्या काही गोष्टी कदाचित वाचकांना ठाऊक नसतील कारण त्या गोष्टी त्यांच्या संस्कृतीचा भाग नाहीत.
  • वाचकांना त्यामध्ये उल्लेख केलेल्या काही गोष्टी माहीत नसल्यामुळे मजकूर समजण्यास अडचण येऊ शकते.

भाषांतर पध्दती

सिंह, अंजिराचे झाड, पर्वत, पुजारी किंवा मंदिरासारख्या शब्दांचे मी भाषांतर कसा करू शकेन जेव्हा माझ्या संस्कृतीतल्या लोकांनी या गोष्टी पाहिल्या नाहीत आणि त्यांच्याकडे काही शब्द येत नाही?

  • शक्य असल्यास आपल्या आधीपासूनच आपल्या भाषेचा भाग असलेले शब्द उपयोग करा.
  • शक्य असल्यास अविर्भाव छोटा ठेवा.
  • देवाच्या आज्ञा आणि ऐतिहासिक तथ्ये अचूकपणे सादर करा..

बायबलमधील उदाहरणे

म्हणून मी यरुशलेमेस नाशाचे ढिगार, व कोल्हांचे वस्तीस्थान असे करीन. (यिर्मया ९:११अ युएलटी)

कोल्हे हे कुत्र्यांसारखे वन्य प्राणी आहेत जे जगातील फक्त काही भागात राहतात. म्हणून त्यास बर्‍याच ठिकाणी ओळखल्या जात नाहीत.

खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध राहा, जे मेंढरांच्या वेशात तुमच्याकडे येतात, परंतू आतून ते क्रुर लांडगे आहेत. मत्तय ७:१५ युएलटी

जेथे भाषांतर वाचले जातील तेथे लांडगे राहत नसतील, तर वाचकांना हे समजणार नाहीत की ते भयंकर, कुत्र्यांसारखे जंगली प्राणी आहेत जे मेंढरांवर हल्ला करतात व त्यांना खातात.

त्यांनी त्याला गंधरस मिसळलेला द्राक्षरस दिला, परंतू त्याने तो पिला नाही . (मार्क १५:२३ युएलटी)

लोकांना गंधरस म्हणजे काय ते माहित नसते आणि ते एक औषध म्हणून वापरले गेले होते.

… ज्याने मोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे… (स्तोत्र १३६:७अ युएलटी)

काही भाषांमध्ये सूर्य आणि आग सारख्या प्रकाश देणाऱ्या गोष्टींसाठी संज्ञा असतात, परंतु त्यांच्याकडे दिव्यांसाठी सामान्य शब्द नसतात.

तुमची पापे… बर्फासारखी पांढरी होतील. (यशया १:१८ब युएलटी)

जगातील बर्‍याच भागातील लोकांनी बर्फ पाहीलेला नाही, परंतु त्यांनी तो कदाचित चित्रांमध्ये पाहिला असेल.

भाषांतर पध्दती

तुमच्या भाषेत ज्ञात नसलेली संज्ञा तुम्ही भाषांतरित करू शकता त्यासाठी येथे मार्ग आहेत:

(१) अज्ञात संज्ञा म्हणजे काय किंवा वचनाचे भाषांतर केले जाण्यासाठी अज्ञात संज्ञेविषयी काय महत्वाचे आहे याचे वर्णन करणाऱ्या वाक्यांशाचा उपयोग करा.

(२) जर असे केल्याने ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पध्दतीने सादर केले जात नाही तर आपल्या भाषेतील काही समान पर्यायांचा उपयोग करा.

(३) दुसर्‍या भाषेतून या शब्दाची नकल करा, आणि लोकांना ते समजून घेण्यास मदत व्हावी म्हणून एक सामान्य शब्द किंवा वर्णनात्मक वाक्यांश जोडा.

(४) अर्थाने अधिक सामान्य असणाऱ्या शब्दाचा उपयोग करा.

(५) अर्थामध्ये अधिक स्पष्ट असलेला शब्द किंवा वाक्यांश यांचा उपयोग करा.

भाषांतर पध्दतीच्या उदारणाचे लागूकरण

(१) अज्ञात संज्ञा म्हणजे काय किंवा वचनाचे भाषांतर केले जाण्यासाठी अज्ञात संज्ञेविषयी काय महत्वाचे आहे याचे वर्णन करणाऱ्या वाक्यांशाचा उपयोग करा.

खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध राहा, जे मेंढरांच्या वेशात तुमच्याकडे येतात, परंतू आतून ते क्रुर लांडगे आहेत. (मत्तय ७:१५ युएलटी)

खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध राहा, जे मेंढरांच्या वेशात तुमच्याकडे येतात, परंतू आतून ते फार भुकेले व घातक असे प्राणी आहेत.

“क्रुर लांडगे” येथे एका रुपकाचा भाग आहे, म्हणून हे रुपक आहे असे समजण्यासाठी वाचकांना हे माहित असणे आवश्यक आहे की ते मेंढरांसाठी अतिशय घातक आहेत.

(जर मेंढरे देखील अज्ञात असतील, तर तुम्हाला मेंढराचे भाषांतर करण्यासाठी भाषांतराच्या पध्दतीतील एका पध्दतीचा उपयोग करण्याची, किंवा, भाषांतर पध्दतीचा उपयोग करून इतर कशानेतरी रुपकाला बदलण्याची गजर आहे. पाहा भाषांतरीत रुपक.)

“पाच भाकरी व दोन मासे, याखेरीज आमच्याकडे काहीच नाही.” (मत्तय १४:१७ युएलटी)

धान्याच्या बीयांना भाजून केलेल्या पाच भाकरी व दोन मासे, याखेरीज आमच्याकडे काहीच नाही.

(२) जर असे केल्याने ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पध्दतीने सादर केले जात नाही तर आपल्या भाषेतील काही समान पर्यायांचा उपयोग करा.

तुमची पापे… बर्फासारखी पांढरी होतील. (यशया १:१८ब युएलटी) हे वचन बर्फाबद्दल नाही. काहीतरी पांढरे कसे असेल हे लोकांना समजण्यासाठी ते अलंकारामध्ये बर्फाचा करतात.

तुमची पापे … दुधासारखी पांढरी होतील.

तुमची पापे … चंद्रासारखी पांढरी होतील.

(३) दुसर्‍या भाषेतून या शब्दाची नकल करा, आणि लोकांना ते समजून घेण्यास मदत व्हावी म्हणून एक सामान्य शब्द किंवा वर्णनात्मक वाक्यांश जोडा.

नंतर त्यांन येशुला गंधरस मिसळलेला द्राक्षरस देण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याने तो पिण्यास नकार दिले. परंतू त्याने तो पिण्यास नकार दिला. (मार्क १५:२३ युएलटी) "औषध" या सामान्य शब्दाचा वापर केल्यास गंधरस म्हणजे काय हे लोकांना अधिक चांगले समजेल.

नंतर त्यांनी येशुला द्राक्षरस जो गंधरस नावाच्या औषधामध्ये मिसळलेला होता तो देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने तो पिण्यास नकार दिला.

“पाच भाकरी व दोन मासे, याखेरीज आमच्याकडे काहीच नाही.”(मत्तय १४:१७ युएलटी) ते कशापासून (बीयाणे) बनविले जाते व त्याला कसे तयार केले जाते (दळणे व भाजणे) असे जर वाक्यांशासह सांगितले गेले तर भाकर म्हणजे काय हे लोकांना चांगले समजेल.

बीयाने दळून भाजलेल्या पाच भाकरी व दोन मासे याखेरीज आमच्याकडे काहीच नाही.

(४) अर्थाने अधिक सामान्य असणाऱ्या शब्दाचा उपयोग करा.

म्हणून मी यरुशलेमेस नाशाचे ढिगार, व कोल्हांचे वस्तीस्थान असे करीन. (यिर्मया ९:११अ युएलटी)

मी यरुशलेमेस नाशाचे ढिगार, व जंगली कुत्र्यांचे वस्तीस्थान असे करीन.

“पाच भाकरी व दोन मासे, याखेरीज आमच्याकडे काहीच नाही.”(मत्तय १४:१७ युएलटी)

पाच भाजलेले अन्न व दोन मासे याखेरीज आमच्याकडे काहीच नाही.

(५) अर्थामध्ये अधिक स्पष्ट असलेला शब्द किंवा वाक्यांश यांचा उपयोग करा.

… ज्याने मोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे… (स्तोत्र १३६:७अ युएलटी)

ज्याने सुर्य व चंद्र निर्माण केले त्याचे