mr_ta/translate/translate-textvariants/01.md

11 KiB

वर्णन

हजारो वर्षांपूर्वी, लोकांनी पवित्र शास्त्रातील पुस्तके लिहिली. त्यानंतर इतर लोकांनी हातांनी त्यांची प्रती बनवून त्यांचे भाषांतर केले. त्यांनी हे काम अत्यंत काळजीपूर्वक केले आणि काही वर्षांतच बर्‍याच लोकांनी हजारो प्रती बनवल्या. तथापि, नंतर ज्या लोकांनी त्यांना पाहिले नंतर बघितले की त्यांच्यामध्ये थोडा फरक होता. काही नक्कल करणाऱ्यांनी चुकून काही शब्द सोडले, किंवा काहींनी त्याप्रमाणे दिसणारा दुसरा शब्द चुकीचा घेतला. कधीकधी, एकतर चुकून किंवा त्यांना काहीतरी समजावून सांगायचे म्हणून शब्द किंवा संपूर्ण वाक्य त्यांनी जोडले. आधुनिक पवित्र शास्त्र हे जुन्या प्रतींचे भाषांतर आहेत. काही आधुनिक पवित्र शास्त्रात यापैकी काही वाक्ये समाविष्ट केली गेली आहेत. यूएलटीमध्ये, ही जोडलेली वाक्ये सामान्यत: तळटीपांमध्ये लिहिली जातात.

पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांनी बर्‍याच जुन्या प्रतींंचे वाचन केले आहे आणि त्यांची तुलना एकमेकांशी केली आहे. पवित्र शास्त्रात प्रत्येक ठिकाणी जिथे भिन्नता होती, तेथे कोणते शब्द बहुधा बरोबर आहेत हे त्यांनी शोधून काढले आहे. यूएलटीच्या भाषांतरकारांनी यूएलटीला शब्दांवर आधारित केले जे शास्त्रज्ञ म्हणतात की बहुधा बरोबर आहेत. कारण यूएलटीचा वापर करणाऱ्या लोकांनी इतर प्रतींवर आधारित पवित्र शास्त्राचा वापर केला असेल, एकतर यूएलटी तळटीपांमध्ये किंवा unfoldingWord® भाषांतर नोट्समध्ये,यूएलटी भाषांतरकारांनी काहीवेळा त्यातील काही फरकांविषयी माहिती समाविष्ट केली आहे.

भाषांतरकारांना यूएलटीमधील मजकूर भाषांतरित करण्यास आणि यूएलटीमध्ये केल्याप्रमाणे तळटीपांमधील जोडलेल्या वाक्यांविषयी लिहिण्यास प्रोत्साहित केले जाते.तथापि, जर स्थानिक मंडळींना खरोखरच ती वाक्ये मुख्य मजकूरात समाविष्ट करायची असतील तर, भाषांतरकार त्यांना मजकूरामध्ये ठेवू शकतात आणि त्याबद्दल एक तळटीप समाविष्ट करू शकतात.

पवित्र शास्त्रातील उदाहरणे

मत्तय १८: १०-११ युएलटीमध्ये ११ व्या वचनाबद्दल तळटीप आहे.

10 हे पाहा या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. कारण मी तुम्हांस सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याच्या मुखाकडे सतत पाहतात. 11 [1]

[1] बरेच अधिकारी, काही प्राचीन, व. ११ टाका: कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले आहेत त्यांना तारायला आला आहे.

योहान ७:५३-८:१ सर्वोत्तम जुन्या हस्तलिपींमध्ये नाही. त्याला यूएलटीमध्ये समाविष्ट केले गेले आहे, परंतु त्याला सुरवातीस आणि शेवटी चौकोनी कंसामध्ये ([]) चिन्हांकित केलेले आहे, व ११ व्या वचनानंतर त्याठिकाणी एक तळटीप आहे.

53 [नंतर सर्वजन आपापल्या घरी गेले … ११ ती म्हणाली, “प्रभो, कोणीच नाही.” येशू म्हणाला, “मी देखील तुला दोष लावत नाही. जा आणि अजून पाप करू नको.”] [२]

[२] काही प्राचीन हस्तलिखिते योहान ७:५३-८:११ चा समावेश करतात.

भाषांतर रणनीती

जेव्हा मजकूराचे प्रकार असतात तेव्हा तुम्ही वापर करत असलेल्या युएलटी किंवा अन्य आवृत्तीचे अनुसरण करणे तुम्ही निवडू शकता.

(१) युएलटीमध्ये आहेत त्याप्रमाणेच भाषांतर करा आणि युएलटीने पुरवलेल्या तळटीपांचा समावेश करा.

(२) वचनाच्या दुसर्‍या आवृत्तीत भाषांतर करा आणि तळटीप बदला जेणेकरून या परिस्थितीस योग्य असेल.

भाषांतर पद्धतींचे उदाहरणाचे लागूकरण

भाषांतराची रणनीती मार्क ७: १४-१८ युएलटीवर लागू केली गेली आहे, ज्यामध्ये १६ व्या वचनाबद्दल तळटीप आहे.

१४ त्यांने लोकसमुदायाला पुन्हा बोलाविले आणि त्यांना म्हटले, “तुम्ही सर्वजन, माझे ऐका आणि समजून घ्या. १५ माणसाच्या बाहेर असे काहीही नसते जे त्याच्या आत जाईल तेव्हाच त्याला अपवित्र करील. परंतु ज्या गोष्टी माणसाच्या आतून बाहेर पडतात त्या माणसाला अपवित्र करतात..” १६ [१]

[१] काही प्राचीन हस्तलिखिते १६ व्या वचनाचा समावेश करतात: जर कोणा मनुष्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐको.

(१) वचने यूएलटीमध्ये जसे आहेत तसेच भाषांतरित करा आणि यूएलटीद्वारे प्रदान केलेली तळटीप समाविष्ट करा.

१४ त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलाविले आणि त्यांना म्हटले, “तुम्ही सर्वजन, माझे ऐका, आणि समजून घ्या. १५ माणसाच्या बाहेर असे काहीही नसते जे त्याच्या आत जाईल तेव्हाच त्याला अपवित्र करील. परंतु ज्या गोष्टी माणसाच्या आतून बाहेर पडतात त्या माणसाला अपवित्र करतात.” 16 [1]

[१] काही हस्तलिखितांमध्ये १६ व्या वचनाचा समावेश आहे: जर कोणा मनुष्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐको.

(२) वचनाचे दुसर्‍या आवृत्तीत भाषांतर करा आणि तळटीप बदला जेणेकरून या परिस्थितीस योग्य असेल.

१४ त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलाविले आणि त्यांना म्हटले, “ तुम्ही सर्वजन, माझे ऐका व समजून घ्या. १५माणसाच्या बाहेर असे काहीही नसते जे त्याच्या आत जाईल तेव्हाच त्याला अपवित्र करील. परंतु ज्या गोष्टी माणसाच्या आतून बाहेर पडतात त्या माणसाला अपवित्र करतात.” १६ जर कोणा मनुष्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐको.” [१]

[१] काही प्राचीन हस्तलिखीते १६ व्या वचनाचा समावेश आहे.