mr_ta/translate/translate-ordinal/01.md

9.5 KiB

वर्णन

बायबलमध्ये क्रमवाचक संख्या प्रामुख्याने वापर मुख्यतः यादीतील एखाद्या गोष्टीचे स्थान सांगण्यासाठी केला जातो.

तसेच देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे, प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे (1 करिंथ 12:28अ युएलटी)

ही कारभाऱ्यांची एक सूची आहे ज्याना देवाने त्याच्या आदेशानुसार मंडळीला दिली.

इंग्रजीमध्ये क्रमवाचक वचन

इंग्रजीतील बहुतांश क्रमवाचक संखेला शेवटी फक्त "-th" ने जोडलेले आहे.

| वचन | वचन | क्रमवाचक संख्या | | -------- | -------- | -------- | | 4 | चार | चौथा | | 10 | दहा | दहावा | 100 | शंभर | शंभरावा | | 1,000 | एक हजार | एक हजारावा |

इंग्रजीतील काही क्रमवाचक संख्या हे त्या नमुन्याचे पालन करीत नाहीत.

| वचन | वचन| क्रमवाचक संख्या | | -------- | -------- | -------- | | 1 | एक | प्रथम | | 2 | दोन | द्वितीय | | 3 | तीन | तृतीय | | 5 | पाच | पाचवा | | 12 | बारा | बारावा |

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

सूचीतील वस्तूंचा क्रम दर्शवण्यासाठी काही भाषांमध्ये विशेष क्रमांक नसतात. याला सामोरे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

बायबलमधील उदाहरणे

पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची… तेविसावी दलायाची, आणि चोविसावी माज्याची. (1 इतिहास 24:7-18 युएलटी)

लोकांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि दिलेल्या क्रमाने यापैकी प्रत्येकाकडे एक गेली.

त्यात तुम्ही मौल्यवान रत्नांच्या चार रांगा लावा. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज आणि माणिक असणे आवश्यक आहे. दुसऱ्या रांगेत पाचू, नीलकांत आणि हिरा असणे आवश्यक आहे. तिसऱ्या रांगेत तृणमणी, सुर्यकांत व पद्मराग असणे आवश्यक आहे. चौथ्या रांगेत लसणा, गोमेद आणि यास्फे असणे आवश्यक आहे. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत. (निर्गम 28:17-20 युएलटी)

हे रत्नाच्या चार रांगेचे वर्णन करते. पहिली पंक्ती कदाचित वरची पंक्ती आहे आणि चौथी पंक्ती कदाचित खालची पंक्ती आहे.

भाषांतर रणनीती

तुमच्या भाषेत क्रमवाचक संख्या असल्यास आणि त्यांचा वापर केल्याने योग्य अर्थ मिळत असल्यास, त्यांचा वापर करण्याचा विचार करा. नसल्यास, येथे विचार करण्यासाठी काही धोरणे आहेत:

(1) पहिल्या वस्तुसह "एक" वापरा आणि उर्वरितासह "दुसरा" किंवा "पुढील" वापरा.

(2) एकूण वस्तुची संख्या सांगा आणि नंतर त्यांना किंवा त्यांच्याशी निगडीत गोष्टींची यादी करा.

भाषांतर पद्धतींचे उदाहरण लागू

(1) वस्तुची एकूण संख्या सांगा आणि पहिल्या पदार्थासह "एक" आणि उर्वरित "दुसरा" किंवा "पुढील" वापरा.

पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची… तेविसावी दलायाची, आणि चोविसावी माज्याची. (1 इतिहास 24:7-18 युएलटी)

24 चिठ्या होत्या पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, दुसरी हारीमाची, दुसरी सोरीमाची… दुसरी दलायाची, आणि शेवटची माज्याची निघाली.

24 चिठ्या होत्या पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, पुढची यदायाची, पुढची हारीमाची, पुढची सोरीमाची… पुढची दलायाची, आणि शेवटची माज्याची निघाली.

बागेला पाणी देण्यासाठी एक नदी एदेनच्या बाहेर गेली. तिथून ती विभाजित होऊन तिच्या चार नद्या बनल्या. पहिलीचे नाव पिशोन आहे. ती हवीलाच्या संपूर्ण प्रदेशात वाहते, जिथे सोने आहे. त्या जमिनीचे सोने चांगले आहे. तेथे मोती आणि गोमेद रत्न देखील आहे. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन आहे. ही कुशाच्या संपूर्ण देशात वाहते. तिसऱ्या नदीचे नाव टायग्रिस आहे, जी अश्शूराच्या पूर्वेकडे वाहते. चौथी नदी फरात आहे. (उत्पत्ति 2:10-14 युएलटी)

बागेला पाणी देण्यासाठी एक नदी एदेनच्या बाहेर गेली. तिथून ती विभाजित होऊन तिच्या चार नद्या बनल्या. एकीचे नाव पिशोन आहे. ही हवीलाच्या संपूर्ण प्रदेशात वाहते, जिथे सोने आहे. त्या जमिनीचे सोने चांगले आहे. तेथे मोती आणि गोमेद रत्न देखील आहे. पुढच्या नदीचे नाव गिहोन आहे. ही कुशाच्या संपूर्ण देशात वाहते. पुढच्या नदीचे नाव टायग्रिस आहे, जी अश्शूराच्या पूर्वेकडे वाहते. शेवटची नदी फरात आहे. (उत्पत्ति 2:10-14 युएलटी)

(2) एकूण वस्तुची संख्या सांगा आणि नंतर त्यांना किंवा त्यांच्याशी निगडीत गोष्टींची यादी करा.

पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची… तेविसावी दलायाची, आणि चोविसावी माज्याची. (1 इतिहास 24:7-18 युएलटी)

त्यांनी 24 चिठ्ठ्या टाकल्या. यहोयारीब, यदाया, हारीमाची, सोरीम … दलाया आणि माज्या यांच्या चिठ्ठ्या निघाल्या