mr_ta/translate/translate-numbers/01.md

11 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

बायबलमध्ये अनेक संख्या आहेत. त्यांना शब्दात लिहिले जाऊ शकते, जसे ("पाच") किंवा अंक म्हणून "५". काही संख्या खूप मोठ्या असतात, जसे की "दोनशे" (२००), "बावीस हजार" (२२०००), किंवा "शंभर दशलक्ष" (१००,,.) काही भाषांमध्ये या सर्व क्रमांकांसाठी शब्द नसतात. अंकांचे भाषांतर कसे करावे आणि शब्दात किंवा संख्येत ते कसे लिहायचे हे भाषांतरकारांनी ठरविण्याची गरज आहे.

काही संख्या अचूक आहेत आणि इतर पूर्ण आहेत.

अब्राहम हा ८६ वर्षाचा होता जेव्हा हागारेला अब्राहामापासून इश्माएल झाला. (उत्पत्ती १६:१६ युएलटी)

शहाऐंशी (८६) ही एक अचूक संख्या आहे.

त्या दिवशी साधारण ३००० लोक मरण पावले. (निर्गम ३२:२८ युएलटी)

येथे तीन हजार (३०००) ही संख्या एक पूर्ण संख्या आहे. कदाचित त्यापेक्षा थोडे अधिक असू शकते किंवा त्याहून थोडे कमी. "साधारण" हा शब्द दर्शवितो की ती एक अचूक संख्या नाही.

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

यापैकी काही संख्यांसाठी काही भाषांमध्ये शब्द नाहीत.

भाषांतर तत्त्वे

  • अचूक संख्यांचे भाषांतर अधिक बारीककरित्या आणि विशेष रुपात केले जावे.
  • पूर्ण संख्याचे अधिक सामान्यपणे भाषांतर केले जाऊ शकते.

बायबलमधील उदाहरणे

यारेद जेव्हा १६२ वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा बाप झाला. हनोखाचा बाप झाल्यावर, यारेद ८०० वर्षे जगला. तो आणखी मुले व मुलींचा बाप झाला. यारेद ९६२ वर्षे जगला, आणि मग तो मरण पावला. (उत्पत्ती ५:१८-२० युएलटी)

१६२, ८००, व ९६२ या संख्या अचूक आहेत आणि त्या संख्येच्या शक्य तितक्या जवळ काहीतरी म्हणून भाषांतरित केले पाहिजे.

आमची बहीणी, तू सहस्त्रावधींची लक्षावंधीची माता हो (उत्पत्ती २४:६० युएलटी)

ही पूर्ण संख्या आहे. ते म्हणू शकत नाही किती वंशज तिला असावेत, पण ती त्यापैकी एक प्रचंड संख्या होती.

भाषांतर पध्दती.

(१) अंकाचा वापर करून संख्या लिहा.

(२) त्या अंकांसाठी आपल्या भाषेतील शब्द किंवा मुख्य भाषेतील शब्द वापरून संख्या लिहा.

(३) शब्दांचा वापर करून संख्या लिहा, आणि त्याच्यानंतर संख्या कंसात ठेवा.

(४) मोठ्या संख्येसाठी शब्दांना एकत्रित करा.

(५) फार मोठ्या पूर्ण संख्यांसाठी एक सर्वसाधारण अभिव्यक्तिचा उपयोग करा आणि त्यानंतर कंसामध्ये संख्या लिहा.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

आम्ही आमच्या उदाहरणांमध्ये खाली दिलेल्या वचनााचा उपयोग करू:

आता,पाहा, मी फार मेहनत करून यहोवाच्या मंदिरासाठी १००, किक्कार सोने, १,, किक्कार चांदी तयार केले आहे, आणि पितळ व लोखंड मोठ्या प्रमाणात आहे. (१ इतिहास २२:१४ युएलटी)

(१) अंकाचा वापर करून संख्या लिहा.

मी यहोवाच्या मंदिरासाठी १००, किक्कार सोने, १,, किक्कार चांदी तयार केले आहे, आणि पितळ व लोखंड मोठ्या प्रमाणात आहे.

(२) त्या अंकांसाठी आपल्या भाषेतील शब्द किंवा मुख्य भाषेतील शब्द वापरून संख्या लिहा.

मी यहोवाच्या मंदिरासाठी एक लक्ष किक्कार सोने, दहा लक्ष किक्कार चांदी तयार केले आहे, आणि पितळ व लोखंड मोठ्या प्रमाणात आहे.

(३) शब्दांचा वापर करून संख्या लिहा, आणि त्याच्यानंतर संख्या कंसात ठेवा.

मी यहोवाच्या मंदिरासाठी एक लक्ष (१००,) किक्कार सोने, दहा लक्ष (१,,) किक्कार चांदी तयार केले आहे, आणि पितळ व लोखंड मोठ्या प्रमाणात आहे.

४) मोठ्या संख्येसाठी शब्दांना एकत्रित करा.

मी यहोवाच्या मंदिरासाठी शंभर हजार किक्कार सोने, एक हजार हजार किक्कार चांदी तयार केले आहे, आणि पितळ व लोखंड मोठ्या प्रमाणात आहे.

(५) फार मोठ्या पूर्ण संख्यांसाठी एक सर्वसाधारण अभिव्यक्तिचा उपयोग करा आणि त्यानंतर कंसामध्ये संख्या लिहा.

मी यहोवाच्या मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात सोने (१००, किक्कार), चांदीच्या किमंतीच्या दहापट (१,, किक्कार) तयार केले आहे, आणि पितळ व लोखंड मोठ्या प्रमाणात आहे.

सुसंगतता

आपल्या भाषांतरांमध्ये सातत्य ठेवा. संख्या किंवा अंकां याचा वापर करून संख्यांचे भाषांतर कसे केले जाईल हे ठरवा. सुसंगत असण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

  • प्रत्येक वेळी संख्येला दर्शविण्यासाठी शब्दांचा वापर करा. (आपणाकडे खूप लांब शब्द असू शकतात.)
  • सर्व वेळी संख्येला दर्शविण्यासाठी अंकांचा वापर करा.
  • संख्येला दर्शविण्यासाठी आपल्या भाषेत असलेल्या शब्दांचा त्याच्यासाठी वापर करा व आपल्या भाषेत त्याच्यासाठी नसलेल्या संख्यांसाठी अंकांचा वापर करा.
  • कमी संख्येसाठी शब्द आणि उच्च संख्येसाठी संख्या वापरा.
  • काही शब्दांपेक्षा जास्त शब्दांची आवश्यकता असलेल्या संख्येसाठी शब्दांचा वापर करा व थोडक्या शब्दापेक्षा अधिक शब्दांची आवश्यकता असलेल्या संख्येसाठी अंकांचा वापर करा.
  • संख्या दर्शविण्यासाठी शब्दांचा वापर करा, आणि त्यांच्यानंतर कंसामध्ये संख्या लिहा.

युएलटी आणि युएसटी मधील सुसंगतता

  • अनफोल्डींगवर्ड®शब्दश: मजकुर* ( युएलटी) व अनफोल्डींगवर्ड®सरलीकृत मजकूर (युएलटी) एक ते दहा संख्यांसाठी शब्दांचा उपयोग करा व दहा वरील सर्व संख्यांसाठी अंकाचा उपयोग करा.

आदाम जेव्हा १३० वर्षाचा झाला, तेव्हा त्याच्या सारखा, त्याच्या प्रतिरुपाच्या मुलाचा तो पिता झाला, व त्याने त्याचे नाव शेथ असे ठेवले. आदाम शेथाचा पिता झाल्यावर, तो ८०० वर्षे जगला. तो अनेक मुले व मुलींचा पिता झाला. आदाम ९३० वर्षे जगला आणि मग तो मरण पावला. (उत्पत्ती ५:३-५ युएलटी)