mr_ta/translate/guidelines-sonofgodprinciples/01.md

10 KiB

जेव्हा ते देवाला संदर्भित करतात तेव्हा संकल्पनेचे प्रतिनिधित्व करणारे बायबल भाषांतरांचे डुअर 43 समर्थन करते

बायबलसंबंधी साक्ष

"पिता" आणि "पुत्र" ही नावे आहेत जी परमेश्वर स्वतःला पवित्र शास्त्रात संबोधतो.

देवाने येशूला आपला पुत्र म्हटले असे पवित्र शास्त्रात दर्शविले आहे:

त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर येशू त्वरीत पाण्यातून वर आला, व … असे म्हणत स्वर्गातून एक वाणी ऐकू आली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. त्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१६-१७ ULT)

पवित्र शास्त्र दर्शविते की येशूने देवाला त्याचा पिता असे म्हटले:

येशू … म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो … पित्यावाचून पुत्राला कोणीच ओळखत नाही, आणि पुत्रावाचून पित्याला कोणीच ओळखत नाही.” (मत्तय ११:२५a, २७ब युएलटी) (हे देखील पाहा: योहान ६:२६-५७)

ख्रिस्ती लोकांना असे आढळले आहे की “पिता” आणि “पुत्र” ही कल्पना त्र्येक्यत्वातील प्रथम आणि द्वितीय व्यक्तींच्या एकमेकांमधील सार्वकालिक नातेसंबंधाचे मुख्यतः वर्णन करतात. बापवित्र शास्त्र खरंच त्यांचा विविध प्रकारे उल्लेख करते, परंतु कोणतीही अन्य संज्ञा या व्यक्तींमधील सार्वकालिक प्रेम आणि जवळीक प्रतिबिंबित करू शकत नाहीत किंवा त्या दोघांमधील परस्परावलंबी संबंधही दर्शवित नाहीत.

येशूने परमेश्वराचे पुढील शब्दांत वर्णन केले:

पित्याच्या, व पुत्राच्या, आणि पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तीस्मा द्या. (मत्तय २८:१९ब यु.एल.टी)

जसे ते सार्वकालिक आहेत, तसेच पिता आणि पुत्रामधील जिव्हाळ्याचे, प्रेमळ नातेसंबंध सार्वकालिक आहे. पिता पुत्रावर प्रिती करतो. (योहान ३:३५-३६; ५:१९-२० युएलटी पाहा)

मी पित्यावर प्रीती करतो,आणि जसे पित्याने मला आज्ञापिले आहे, तसे मी करतो. (योहान १४:३१ युएलटी)

पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणालाच ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून कोणालाच ठाऊक नाही. (लुक १०:२२ब युएलटी)

“पिता” आणि “पुत्र” या शब्दांद्वारे हे देखील सूचित केले जाते की पिता आणि पुत्र यांचा सार समान आहे; ते दोघेही सार्वकालिक देव आहे.

येशु म्हणाला, “ पित्या, … पुत्राचा गौरव कर म्हणजे पुत्र तुझे गौरव करील … मी पृथ्वीवर तुझे गौरव केले… आता पित्या, …जगाची निर्मीती होण्यापुर्वी माझ्या गौरव तुझ्याजवळ होता त्याद्वारे माझा गौरव कर.” (योहान १७:१, ४अ, ५ युएलटी)

परंतु या शेवटल्या दिवसांत, तो [देव पिता] आपल्याबरोबर पुत्राद्वारे बोलला आहे, ज्याला त्याने सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. त्याच्याद्वारे त्याने हे विश्वही निर्माण केले. तो देवाच्या गौरवाचे तेज आणि  त्याच्या अस्तित्वाचे अगदी अचूक प्रतिनिधित्व आहे. तो त्याच्या सामर्थ्याच्या शब्दाने प्रत्येक गोष्ट एकत्रित ठेवतो. (इब्रीलोकांस पत्र 1: 2-3 ए यूएलटी)

येशु त्याला म्हणाला, “फिलिप्पा, मी बराच काळ तुमच्याबरोबर आहे आणि तरीही तू मला ओळखत नाही का? ज्याने मला पाहीले आहे त्याने पित्याला पाहीले आहे. तु असे कसे काय म्हणू शकतोस, ‘आम्हाला पिता दाखवा’?” (योहान १४:९ युएलटी)

मानवी नातेसंबंध

मानवी पिता आणि पुत्र परिपूर्ण नाहीत, परंतु पवित्रशास्त्र पिता आणि पुत्रासाठी त्या संज्ञेंचा अद्यापही उपयोग करते, जे परिपुर्ण आहेत.

आजच्यासारखे ,पवित्र शास्त्राच्या काळातील मानवी पिता-पुत्राचे नाते येशू आणि त्याचा पिता यांच्यातील नात्याइतके कधीच प्रेमळ किंवा परिपूर्ण नव्हते. परंतु याचा अर्थ असा नाही की भाषांतरकाराने पिता आणि पुत्राच्या संकल्पनेला टाळावे. शास्त्रवचने या संज्ञांचा उपयोग देव, परिपूर्ण पिता आणि पुत्र तसेच पापी मानव पिता आणि पुत्र यांना संदर्भित करण्यासाठी करतात. देवाला पिता आणि पुत्र म्हणून संबोधताना, आपल्या भाषेत असे शब्द निवडा जे मानवी “पिता” आणि “पुत्र” यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अशाप्रकारे तुम्ही संवाद कराल की ज्याप्रमाणे मानवी पिता आणि पुत्र यांचा मानवी सार समान असतो (ते दोघेही मानव आहेत आणि समान मानवी वैशिष्टयांचे भागीदार आहेत) त्याप्रमाणे देव जो पिता व देव जो पुत्र यांचा दैवी सार समान आहे (ते दोघेही देव आहेत)

भाषांतर रणनीती

(१) तुमच्या भाषेमध्ये "पुत्र" आणि "पिता" या शब्दांचे भाषांतर करण्याच्या सर्व शक्यतांचा विचार करा. आपल्या भाषेतील कोणते शब्द दैवी "पुत्र" आणि "पित्याचे" सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व करतात ते ठरवा.

(२) जर तुमच्या भाषेमध्ये "पुत्रा" साठी एकापेक्षा अधिक शब्द असेल तर "एकुलता एक पुत्र" याच्याशी (किंवा "प्रथम पुत्र" आवश्यक असल्यास) जवळचा अर्थ असणाऱ्या शब्दाचा वापर करा.

(३) जर तुमच्या भाषेत "पित्या" साठी एकापेक्षा अधिक शब्द असतील तर "दत्तक पिता" ऐवजी "जन्मपिता" याच्याशी जवळचा अर्थ असणाऱ्या शब्दाचा वापर करा.

("पिता" व "पुत्र" भाषांतर करण्यास मदतीसाठी देव जो पितादेवाचा पुत्र unfoldingWord® भाषांतर शब्द पाहा )