mr_ta/translate/grammar-connect-words-phrases/01.md

24 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

मानव म्हणून, आपण आपले विचार वाक्प्रचार व वाक्यांमध्ये लिहितो.आम्हाला सहसा वेगवेगळ्या पध्दतीने एकमेकांशी जोडलेल्या विचारांची मालिका संप्रेषित करायची असते. जोडणारे शब्द व वाक्प्रचार हे विचार एकमेकांशी कसे जोडलेले आहे यास दर्शवितात. उदाहरणार्थ, ठळक अक्षरातील जोडणाऱ्या शब्दांचा उपयोग करून खालील विचार कसे संबंधित आहेत हे आम्ही दर्शवू शकतो:

  • पाऊस पडत होता, म्हणून मी माझी छत्री उघडली.
  • पाऊस पडत होता, पण माझ्याकडे छत्री नव्हती. म्हणून मी खुप भिजलो.

जोडणारे शब्द किंवा वाक्प्रचार वाक्यामध्ये वाक्प्रचार किंवा उपवाक्यास जोडू शकतात.ते वाक्य एकमेकांना जोडू शकतात. कशाप्रकारे अगोदरचा खंड नंतरच्या खंडास म्हणजे जोडणाऱ्या शब्दास संबंधीत आहे हे दर्शविण्यासाठी ते संपुर्ण खंड एकमेकांस देखील जोडू शकतात. बर्‍याचदा, संपूर्ण खंडास एकमेकांना जोडणारे जोड शब्द एकतर उभान्वयी अव्यय किंवा क्रियाविशेषण असतात.

पाऊस पडत होता, पण माझ्याकडे छत्री नव्हती, म्हणून मी खुप भिजलो.

आता मी माझे कपडे बदलले पाहीजे. मग मी गमर चहाचा एक प्याला पिईन आणि शेकोटीने स्वत:स उब देईल.

वरील उदाहणामध्ये, आता हा शब्द त्यांच्यामधील संबंध दर्शिवत मजकुरातील दोन छोट्या खंडास जोडतो. . यापूर्वी घडलेल्या एखाद्या गोष्टीमुळे (म्हणजे तो पावसात भिजला होता) वक्त्यानी आपले कपडे बदलावे, गरम चहा प्यावा आणि स्वतःला गरम करावे.

कधीकधी लोक जोडणारे शब्द वापरू शकणार नाहीत कारण वाचकांना विचारांमधील संबंध समजून घेण्यासाठी संदर्भाने मदत करावी अशी ते अपेक्षा करतात. जितका इतर भाषांमध्ये केला जातो तेवढा काही भाषांमध्ये जोडणाऱ्या शब्दांचा उपयोग केला जात नाही. ते कदाचित म्हणतील:

  • पाऊस पडत होता. माझ्याकडे छत्री नव्हती. मी खुप भिजलो.

तुम्हाला (भाषांतरकार) लक्ष्यित भाषेमध्ये सर्वात नैसर्गिक आणि स्पष्ट असलेली पद्धत वापरण्याची आवश्यकता असेल. परंतु सर्वसाधारणपणे,जेव्हा शक्य असेल तेव्हा जोडणाऱ्या शब्दांचा वापर करण्याने बायबलमधील कल्पना जास्त स्पष्टपणे समजण्यास मदत होते.

कारण ही भाषांतरातील समस्या आहे

  • आपल्याला परिच्छेद, वाक्ये आणि बायबलमधील वाक्यांच्या भागांमधील संबंध आणि जोडणारे शब्द आणि वाक्यांश जोडत असलेल्या विचारांमधील संबंध समजण्यास कशी मदत करू शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे.
  • विचारांचा कसा संबंध आहे हे दर्शविण्याचे प्रत्येक भाषेचे स्वतःचे मार्ग आहेत..
  • आपल्या भाषेत नैसर्गिक आहे अशा प्रकारे विचारांमधील संबंध वाचकांना कसे समजून घेता येईल हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

भाषांतर सिध्दांत

  • मूळ वाचकांना समजले असेल अशा विचारांमधील समान नाते वाचकांना समजू शकेल अशा प्रकारे आपल्याला भाषांतर करण्याची आवश्यकता आहे.
  • जोडणारा शब्द वापरला गेला की नाही हे तितके महत्वाचे नाही जितके वाचक कल्पनांमधील संबंध समजण्यास सक्षम आहेत..

विविध प्रकारचे संबंध

कल्पना किंवा घटना यांच्यामधील संबंधाचे प्रकार खाली सूचीबद्ध आहेत. हे विविध प्रकारचे संबंध विविध प्रकारचे जोडणारे शब्द वापरुन दर्शविले जाऊ शकतात. जेव्हा आपण काहीतरी लिहितो किंवा अनुवादित करतो, तेव्हा योग्य जोडणारा शब्द वापरणे महत्वाचे आहे जेणेकरुन हे संबंध वाचकांना स्पष्ट होतील. आपल्याला अतिरिक्त माहिती हवी असल्यास, प्रत्येक प्रकारच्या जोडणीची व्याख्या आणि उदाहरणे असलेल्या पृष्ठाकडे निर्देशित करण्यासाठी फक्त रंगीत, हायपरलिंक्ड शब्दावर क्लिक करा.

  • अनुक्रमिक उपवाक्य दोन घटनांमधील काळाचा संबंध ज्यामध्ये एक घडते आणि नंतर दुसरी घडते.
  • एकाच वेळी येणारे एकाच वेळी घडणाऱ्या दोन किंवा अधिक घटनांमधील वेळ संबंध.
  • पार्श्वभुमीतील उपवाक्य एक वेळेचा संबंध ज्यात पहिले उपवाक्य दुसर्‍या घटनेची सुरूवात होते त्या वेळी घडणार्‍या एका दीर्घ घटनेचे वर्णन करते, ज्याचे वर्णन दुसर्‍या उपवाक्यात केले आहे.
  • अपवादात्मक संबंध एक उपवाक्य लोक किंवा वस्तूंच्या गटाचे वर्णन करते, आणि दुसरे उपवाक्य एक किंवा अधिक वस्तू किंवा गटातील लोक वगळून टाकते.
  • कल्पित स्थिती पहिली घटना घडते तेव्हाच दुसरी घटना घडेल. कधीकधी जे घडते ते इतर लोकांच्या कृतींवर अवलंबून असते.
  • वास्तविक स्थिती अशी जोड जी काल्पनिक वाटते परंतु ती आधीच निश्चित किंवा सत्य असते, जेणेकरून स्थिती घडून येईल याची हमी दिली जाते.
  • उलट- ते - वास्तविक स्थिती एक जोड जी काल्पनिक वाटते परंतु ते आधीच निश्चित आहे की ते सत्य नाही. हे देखील पाहा: कल्पित विधाने.
  • लक्षीत संबंध तार्किक संबंध ज्यात दुसरी घटना पहिल्या घटनेचा हेतू किंवा ध्येय असते.
  • कारण आणि परिणाम संबंध तार्किक संबंध ज्यात एक घटना दुसर्‍या घटनेचे कारण असते, म्हणजे परिणाम.
  • परस्परविरोधी संबंध एक गोष्ट भिन्न किंवा दुसर्‍याच्या विरोधात वर्णन केली जात आहे.

बायबलमधील उदारणे

मांस व रक्तांचा मी सल्ला घेत नाही. माझ्यानंतर झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर जात नाही. त्याऐवजी, मी अरेबियात गेलो व दिमिष्किता परत आलो. मग तीन वर्षानंतर. मी यरुशलेमेस कयफाला भेटावयास गेलो, व त्याच्यासह पंधरा दिवस राहीलो . (गलती १:१६ब-१८ युएलटी)

“त्याऐवजी” या शब्दाने अशा एका गोष्टीची ओळख करुन दिली जी आधी सांगितलेल्या शब्दाशी तुलना करते. येथे पौलाने काय केले नाही व त्याने काय केले यामधील फरक आहे. “मग” हा शब्द घटनांच्या अनुक्रमाचा परिचय करुन देतो. ते कशाचातरी परिचय देते जे पौलाने दिमिष्कात परत आल्यावर केले.

तथापि, जो कोणी या लहान आज्ञांमधील एक मोडतो आणि इतरांना तसे करण्यास शिकवितो त्यास स्वर्गाच्या राज्यात अतिशय लहान म्हणतील. परंतू जो कोणी त्या पाळतो व त्या शिकवितो, त्यास स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. (मत्तय ५:१९ युएलटी)

“तथापि” हा शब्द या भागाला या अगोदरच्या भागाशी जोडते, जो यापूर्वी आलेल्या विभागाने या विभागाचे कारण दिले असल्याचे दर्शवित आहे. “तथापि” एका वाक्यापेक्षा मोठ्या असलेल्या विभांगाने जोडते. “आणि” हा शब्द एकाच वाक्यात फक्त दोन क्रियांचा संबंध जोडतो, म्हणजे आज्ञा मोडणे आणि इतरांना शिकवणे. या वचनात “पण” हा शब्द देवाच्या राज्यामध्ये एका लोकांच्या समुहाला काय संबोधले जाईल याची दुसऱ्या समुहाला काय संबोधले जाईल यात तुलना करतो.

आम्ही कोणासमोरही अडखळण म्हणून काहीही ठेवत नाही, जेणेकरून आमच्या सेवेची अपकिर्ती होऊ नये. त्याऐवजी, आम्ही सर्व गोष्टींमध्ये देवाचे सेवक म्हणून स्वत: ची प्रशंसा करतो. (२ करिंथ ६:३-४ युएलटी)

येथे “जेणेकरुण” हा शब्द जे आधी आले त्यामागील कारण म्हणून जोडला जातो; पौल अडखळण ठेवत नाही याचे कारण आहे की त्याची सेवा बदनाम व्हावी अशी त्याला इच्छा नाही. “त्याऐवजी” हा शब्द पौल जे म्हटला होता कि तो करणार नाही (अडखळण ठेवणे) असे करतो त्याची तुलना करतो ( तो देवाचा सेवक आहे हे त्याच्या कृत्यांतून सिध्द होते)

सामान्य भाषांतर पध्दती

विशिष्ट पध्दतीसाठी वरील प्रत्येक प्रकारचे जोडणारे शब्द पाहा

विचारांमधील संबंध यूएलटीमध्ये दर्शविण्याची पध्दत नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेला योग्य अर्थ प्राप्त होत असेल तर त्याचा वापर करण्याचा विचार करा. जर नाही, तर येथे काही इतर पर्याय आहेत.

(१) जोडणाऱ्या शब्दांचा उपयोग करा (जरी यूएलटी एकही वापरत नाही).

(२) एकच वापरणे विचित्र असेल आणि त्याच्याशिवाय लोकांना विचारांधील योग्य संबंध समजेल तर जोडणाऱ्या शब्दाचा वापर करा.

(३) विविध जोडणारे शब्द वापरा.

भाषातंरातील पध्दतीच्या उदाहरणाचे लागुकरण

(१) जोडणाऱ्या शब्दांचा उपयोग करा (जरी यूएलटी एकही वापरत नाही).

येशु त्यांना म्हणाला, “चला माझ्या मागे या, व तुम्हाला माणसे धरणारे असे मी करीन.” मग लगेच त्यांनी जाळी सोडली व त्याच्या मागे गेले. (मार्क १:१७-१८ युएलटी)

ते येशुच्या मागे गेले कारण त्याने त्यांना सांगितले होते. काही भाषांतरकारांना हे उपवाक्य “म्हणून” असे चिन्हांकित करण्याची इच्छा आहे.

येशु त्यांना म्हणाला, “चला माझ्या मागे या, व तुम्हाला माणसे धरणारे असे मी करीन." म्हणून लगेच त्यांनी जाळी सोडली व त्याच्या मागे गेले.

(२) एकच वापरणे विचित्र असेल आणि त्याच्याशिवाय लोकांना विचारांमधील योग्य संबंध समजेल तर जोडणाऱ्या शब्दाचा वापर करु नका.

तथापि, जो कोणी या लहान आज्ञांमधील एक मोडतो आणि इतरांना तसे करण्यास शिकवितो त्यास स्वर्गाच्या राज्यात अतिशय लहान म्हणतील. परंतू जो कोणी त्या पाळतो व त्या शिकवितो, त्यास स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. (मत्तय ५:१९ युएलटी)

काही भाषा येथे जोडणाऱ्या शब्दाचा वापर न करणे पसंत करतात कारण त्यांच्याशिवाय अर्थ स्पष्ट आहे आणि त्यांचा वापर करणे अनैसर्गिक असेल. त्यांचे कदाचित असे भाषांतर होऊ शकेल:

तथापि, जो कोणी या लहान आज्ञांमधील एक मोडतो, इतरांना तसे करण्यास शिकवितो त्यास स्वर्गाच्या राज्यात अतिशय लहान म्हणतील. जो कोणी त्या पाळतो व त्या शिकवितो, त्यास स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.

मांस व रक्तांचा मी लगेच सल्ला घेत नाही. माझ्यानंतर झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर गेलो नाही. त्याऐवजी, मी अरेबियात गेलो व दिमिष्किता परत आलो. मग तीन वर्षानंतर. मी यरुशलेमेस कयफाला भेटावयास गेलो, व त्याच्यासह पंधरा दिवस राहीलो . (गलती १:१६ब-१८ युएलटी) (गलती १:१६-१८ युएलटी)

काही भाषांना येथे “त्याऐवजी” किंवा “मग” या शब्दांची आवश्यकता नसते. ते अशाप्रकारे भाषांतर करतात:

मांस व रक्तांचा मी लगेच सल्ला घेत नाही, व माझ्यानंतर झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर गेलो नाही. मी अरेबियात गेलो व दिमिष्किता परत आलो. तीन वर्षानंतर मी यरुशलेमेस कयफाला भेटावयास गेलो, व त्याच्यासह पंधरा दिवस राहीलो.

(३) विविध जोडणारे शब्द वापरा.

तथापि, जो कोणी या लहान आज्ञांमधील एक मोडतो आणि इतरांना तसे करण्यास शिकवितो त्यास स्वर्गाच्या राज्यात अतिशय लहान म्हणतील. परंतू जो कोणी त्या पाळतो व त्या शिकवितो, त्यास स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. (मत्तय ५:१९ युएलटी)

“तथापि” यासारख्या शब्दाऐवजी, एखाद्या भाषेच्या पुढील भागाचे कारण दिले त्यापूर्वी एक विभाग असा होता हे सूचित करण्यासाठी एखाद्या वाक्यांशाची आवश्यकता असू शकते. तसेच, “परंतु” हा शब्द लोकांच्या दोन गटांमधील भिन्नतेमुळे येथे वापरला जातो. परंतु काही भाषांमध्ये “परंतु” हा शब्द दर्शवितो की त्यापूर्वी काय घडले यामुळे त्यानंतर जे घडते ते आश्चर्यकारक आहे. म्हणून “आणि” हा शब्द त्या भाषांसाठी स्पष्ट असेल. ते त्याचे भाषांतर कदाचित असे करतील:

त्या कारणाने, जो कोणी या लहान आज्ञांमधील एक मोडतो आणि इतरांना तसे करण्यास शिकवितो त्यास स्वर्गाच्या राज्यात अतिशय लहान म्हणतील.आणि जो कोणी त्या पाळतो व त्या शिकवितो, त्यास स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.