mr_ta/translate/figs-yousingular/01.md

11 KiB
Raw Permalink Blame History

वर्णन

काही भाषांमध्ये जेव्हा “तुम्ही” हा शब्द एकाच व्यक्तीला संदर्भित केला जातो तेव्हा "तुम्ही" या शब्दासाठी एकवचनी रुप आहे, व जेव्हा "तुम्ही" हा शब्द एकापेक्षा जास्त व्यक्तींना संदर्भित केला जातो तेव्हा त्याचे अनेकवचनी रुप आहे. जे भाषांतरकार यापैकी एक भाषा बोलतात, वक्त्याला काय म्हणायचे आहे हे माहीत असण्याची गरज आहे, जेणेकरून "तुम्ही" यासाठी असलेल्या योग्य शब्दाची ते निवड करु शकतील. इंग्रजीसारख्या इतर भाषांमध्ये फक्त एकच रूप आहे, ज्याचा लोक किती लोकांचा संदर्भ घेत आहे याचा विचार न करता वापर करतात.

बायबल सर्वप्रथम इब्री,अरामी आणि ग्रीक भाषांमध्ये लिहिले गेले होते. या सर्व भाषांमध्ये “तुम्ही” चे एकवचनी रूप आणि “तू” चे अनेकवचनी रूप आहे. जेव्हा आपण त्या भाषांमध्ये बायबलचे वाचन करतो, तेव्हा सर्वनाम आणि क्रियापद आपल्याला "तू” शब्दाचा संदर्भ एका व्यक्तीसाठी किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी आहे हे दर्शवितो. जेव्हा आपण तू ची भिन्न रूपे नसलेल्या भाषेतील बायबल वाचतो तेव्हा वक्ता किती लोकांशी बोलत होता हे पाहण्यासाठी आपण संदर्भ पाहिला पाहिजे.

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

  • “तुम्ही” याचे विशिष्ट एकवचनी आणि अनेकवचनी रुपे असणारी भाषा बोलणारे भाषांतरकारांना त्यांच्या भाषेत “तुम्ही” यासाठी योग्य शब्द निवडता यावा म्हणून वक्त्याचे म्हणणे काय होते हे नेहमीच माहित असणे आवश्यक आहे.
  • कर्ता एकवचनी किंवा अनेकवचनी आहे यावर अवलंबून अनेक भाषांमध्ये क्रियापदाचे भिन्न रूप आहेत. तरीही “तुम्ही” याचा अर्थ असलेले असे कोणतेही सर्वनाम नसले तरीही या भाषांच्या भाषांतरकारांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की वक्ता एका व्यक्तीचा उल्लेख करीत आहे किंवा एकापेक्षा अधिक.

"तुम्ही" हा शब्द एका व्यक्तीला किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींला संदर्भित करत आहे की नाही हे संदर्भ नेहमीच स्पष्ट करते. जर तुम्ही वाक्यातील इतर सर्वनामांकडे पाहिले तर ते तुम्हाला वक्ता बोलत असलेल्या लोकांची संख्या जाणून घेण्यास मदत करतील. कधीकधी ग्रीक आणि इब्री भाषिक लोकांच्या समुहाशी बोलत असले तरीही “तू” या एकवचनी स्वरुपाचा वापर करतात.   (पाहा ‘तू’ या शब्दाची रुपे समुदायासाठी एकवचनी आहे .)े

बायबलमधील उदाहरणे

तो म्हणाला, “या सर्व गोष्टी मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत.” जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, "तुझ्यात अजून एका गोष्टीची उणीव आहे. सर्व गोष्टी जेवढ्या तुझ्या जवळ आहेत, सर्व विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल — मग ये, माझ्या मागे चल.” (लूक १८:२१,२२ यु.एल.टी) जेव्हा त्याने “मी” असे म्हटले, तेव्हा शासक त्याच्या स्वतःबद्दल बोलत होता. यावरून असे दिसून येते की जेव्हा येशू “तू” असे म्हणाला तेव्हा तो फक्त शासकाला संदर्भित करत होता. तर ज्या भाषांमध्ये "तुम्ही” चे एकवचनी आणि अनेकवचनी रूप आहेत येथे त्यांना एकवचनी स्वरुपाची आवश्यकता आहे.

देवदुत त्याला म्हणाला, स्वत:स “वस्त्र पांघरून" घे व तुझ्या वाहणा घाल.” मग त्याने तसे केले. तो त्याला म्हणासा, “ तुझे बाह्य वस्त्र पांघर व माझ्या मागे ये.” (प्रेषित १२:८ युएलटी)

संदर्भ हे स्पष्ट करतो की देवदूत एका व्यक्तीशी बोलत होता आणि देवदूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केवळ एका व्यक्तीने ते केले. तर “तुम्ही” चे एकवचनी आणि अनेकवचनी रुप असलेल्या भाषांना येथे “तुम्ही स्वतः” आणि “तुमचे” यासाठी एकवचनी रुपाची आवश्यकता आहे. तसेच, जर क्रियापदांना एकवचनी आणि अनेकवचनी कर्त्यासाठी भिन्न रूपे असतील, तर मग “वस्त्र पांघरणे” आणि “घालणे” या क्रियापदांना एकवचनी कर्त्याला निर्देशित करणारे रुप असणे आवश्यक आहे.

आमचा समान विश्वासात असलेला खरा मुलगा तीत याला. या उद्देशासाठी मी तुला क्रेतेमध्ये सोडले, की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यावस्थित करावेस व मी तुला निर्देशित केल्याप्रमाणे प्रत्येक नगरात वडील नेमावेत…. तू मात्र सुशिक्षणाला शोभणाऱ्या अशा गोष्टी बोल. (तीताला पत्र 1:4,5; 2:1 युएलबी)

पौलाने हे पत्र तीत नावाच्या एका व्यक्तीला लिहिले. या पत्रामधील “तू” हा शब्द बहुतेक वेळा फक्त तीताला संदर्भित करतो.

"तुम्ही" हा शब्द किती लोकांना संदर्भित करतो हे शोधण्याची रणणीती

(१) “तुम्ही” एका व्यक्तीला किंवा एका पेक्षा जास्त व्यक्तीला संदर्भित करतो का नाही हे पाहण्यासाठी नोंदींना पाहा.

(२) “तुम्ही” हा शब्द एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींला संदर्भित करते हे दाखविण्यसाठी तो शब्द काही सांगतो का नाही हे पाहण्यासाठी युएसटीकडे पाहा.

(३) तुमच्याकडे अशा भाषेत लिहिलेले एखादे बायबल आहे जे “तुम्ही” या अनेकवचनी रुपातून "तू" या एकवचनी रुपात फरक करते, तर त्या वाक्यांतील "तू" चे बायबलमध्ये कोणते रुप आहे हे पाहा

(४) वक्ता किती लोकांशी बोलत आहे आणि कोणी प्रतिसाद दिला हे पाहण्यासाठी संदर्भ पाहा.

तुम्ही https://ufw.io/figs_younum वरील व्हिडीयो देखील पाहू शकता.