mr_ta/translate/figs-youdual/01.md

10 KiB

वर्णन

काही भाषांमध्ये जेव्हा "तुम्ही" हा शब्द एकाच व्यक्तीला सूचित करतो तेव्हा "तुम्ही" या शब्दाचे एकवचनी रूप असते, आणि जेव्हा "तुम्ही" हा शब्द एकापेक्षा अधिक व्यक्तींना सूचित करतो तेव्हा अनेकवचनी रूप असते. जेव्हा "तुम्ही" हा शब्द केवळ दोन लोकांच्या संदर्भात वापरतात तेव्हा काही भाषांमध्ये "तुम्ही" हा शब्द दुहेरी स्वरूपात देखील असतो. यापैकी एक भाषा बोलणाऱ्या अनुवादकांना नेहमी वक्त्याचा अर्थ काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून ते त्यांच्या भाषेतील “तुम्ही” या शब्दासाठी योग्य शब्द निवडू शकतील. इतर भाषांमध्ये, जसे इंग्रजी, त्यामध्ये एकच प्रकार आहे, ज्याचा वापर लोक कितीही लोकांना संदर्भित करण्यासाठी करतात.

बायबल हे पहिल्यांदा इब्री, अरामी व ग्रीक भाषेमध्ये लिहिले गेले होते. या भाषांमध्ये सर्व "तू" या शब्दाचे एकवचनी रूप आहे आणि "तुम्ही" या शब्दाचे अनेकवचनी रूप आहे. जेव्हा आपण त्या भाषेमध्ये बायबल वाचतो, तेव्हा सर्वनाम आणि क्रियापद रूप आपल्याला दर्शवितो की "तुम्ही" हे एका व्यक्तीस किंवा एकापेक्षा अधिक व्यक्ती सूचित करते. तथापि, ते फक्त दोन लोक किंवा दोनपेक्षा जास्त लोकांना संदर्भित करते की नाही हे ते आम्हाला दर्शवू शकत नाही. जेव्हा सर्वनाम आपल्याला “तुम्ही” हा शब्द किती लोकांना सूचित करतो हे दर्शवत नाही, तेव्हा वक्ता किती लोकांशी बोलत होता हे पाहण्यासाठी आपल्याला संदर्भ पाहण्याची आवश्यकता आहे.

कारणे हा भाषांतर मुद्दा आहे

  • "तुम्ही" या शब्दाचे वेगळे एकवचनी, दुहेरी आणि अनेकवचनी रूपे असलेली भाषा बोलणाऱ्या अनुवादकांना नेहमी वक्त्याचा अर्थ काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून ते त्यांच्या भाषेत "तुम्ही" या शब्दासाठी योग्य शब्द निवडू शकतील.
  • कर्ता एकवचनी किंवा अनेकवचनी आहे यावर अवलंबून अनेक भाषांमध्ये क्रियापदाचे वेगवेगळे रूप देखील असतात. त्यामुळे “तुम्ही” या अर्थाचा असा कोणताही सर्वनाम नसला तरीही, या भाषांच्या अनुवादकांना हे माहित असणे आवश्यक आहे की वक्ता एका व्यक्तीचा किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींचा संदर्भ देत आहे.

"तुम्ही" हा शब्द एका व्यक्तीचा किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना संदर्भित करतो की नाही हे अनेकदा संदर्भ स्पष्ट करेल. तुम्ही वाक्यातील इतर सर्वनाम पाहिल्यास, ते तुम्हाला वक्ता किती लोकांना संबोधित करत होते हे समजण्यास मदत करतील.

बायबलमधील उदाहरणे

जब्दीचे मुलगे याकोब व योहान, हे त्याच्याकडे आले, आणि त्याला म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” 36 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” (मार्क 10:35-36 युएलटी)

येशू याकोब व योहान, या दोघांना विचारत आहे, कि त्याने त्यांच्यासाठी काय करावे अशी त्यांची इच्छा आहे. जर लक्ष्यित भाषेमध्ये "तुम्ही" या शब्दाचे दुहेरी रूप असल्यास, त्याचा वापर करा. जर लक्ष्यित भाषेमध्ये दुहेरी रूप नसल्यास अनेकवचनी रूप योग्य असेल.

येशूने आपल्या दोन शिष्यास पाठविले आणि असे सांगितले की, “तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा. तुम्ही गावात जाताच, ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू तुम्हाला बांधलेले आढळेल. त्यास सोडा व माझ्याकडे त्यास घेऊन या. (मार्क 11:1-2युएलटी)

संदर्भ हे स्पष्ट करतो की येशू दोन लोकांना संबोधित करत आहे. जर लक्ष्यित भाषेमध्ये "तुम्ही" या शब्दाचे दुहेरी रूप असल्यास, त्याचा वापर करा. जर लक्ष्यित भाषेमध्ये दुहेरी रूप नसल्यास अनेकवचनी रूप योग्य असेल.

देवाचा आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून, देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर विखुरलेले आहेत त्यांना सलाम! माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वत:ला अत्यंत आनंद माना, कारण तुम्हांला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो. (याकोब 1:1-3 युएलटी)

याकोबाने हे पत्र अनेकांना लिहिले, म्हणून "तुम्ही" हा शब्द अनेक लोकांना संदर्भित होतो. लक्ष्यित भाषेत "तुम्ही" या शब्दाचा अनेकवचनी रुप असल्यास, त्याचा उपयोग येथे करणे सर्वोत्तम होईल.

"तुम्ही" हा शब्द किती लोकांना संदर्भित करतो याबाबतची धोरणे

(1) "तुम्ही" हा शब्द एका व्यक्तीला किंवा एकाहून अधिक व्यक्तींला संदर्भित करतो की नाही हे ते सांगतात का ते पाहण्यासाठी भाषांतर नोट्स पाहा.

(2) "तुम्ही" हा शब्द एका व्यक्तीचा किंवा एकाहून अधिक व्यक्तींचा संदर्भ घेतो की नाही हे तुम्हाला दर्शवेल असे काही बोलते का ते पाहण्यासाठी यूएसटी पहा.

(3)जर तुमच्याकडे बायबल असेल जे अशा भाषेत लिहिलेले आहे ज्यात "तू" एकवचनी रुप "तुम्ही" अनेकवचनी रुप यात फरक स्पष्ट करते, तर त्या बायबलमध्ये "तुम्ही" या शब्दाचे कोणते रूप आहे ते पाहा.

(4) वक्ता कोणाशी बोलत होता आणि कोणी प्रतिसाद दिला हे पाहण्यासाठी संदर्भ पाहा.

आपण http://ufw.io/figs_youdual येथे व्हिडिओ पाहू शकता.