mr_ta/translate/figs-youcrowd/01.md

12 KiB

वर्णन

बायबल इब्री, अरेमिक आणि ग्रीक भाषेमध्ये लिहण्यात आले आहे. जेव्हा “तुम्ही” हा शब्द फक्त एका व्यक्तीला सूचित करतो तेव्हा या भाषांमध्ये “तू” असे एकवचनी रूप असते आणि जेव्हा “तुम्ही” हा शब्द एकापेक्षा जास्त व्यक्तींना सूचित करतो तेव्हा त्याचे अनेकवचन असते. तथापि, काहीवेळा बायबलमधील वक्ते लोकांच्या गटाशी बोलत असले तरीही ते “तू” या एकवचनी रूपाचा वापर करतात. जेव्हा तुम्ही बायबल इंग्रजीमध्ये वाचता तेव्हा हे स्पष्ट होत नाही कारण इंग्रजीमध्ये "तुम्ही" कुठे एकवचन आहे आणि कुठे "तुम्ही" अनेकवचनी आहे हे दर्शवणारे भिन्न रूपे नाहीत. परंतु, तुम्ही एखाद्या भाषेत बायबल वाचल्यास, ज्याचे वेगळे स्वरूप आहे तर तुम्ही ते पाहू शकता.

तसेच, जुन्या कराराचे वक्ते आणि लेखक बहुतेक अनेकवचनी सर्वनामांसह "ते," ऐवजी एकवचनी सर्वनाम "तो" असलेल्या लोकांच्या गटांना संदर्भित करतात.

शेवटी, जुन्या कराराचे वक्ते आणि लेखक देखील त्यांनी समूहाचा एक भाग म्हणून केलेल्या कृतींचा संदर्भ देतात, जेव्हा, खरोखर संपूर्ण गट सामील होता तेव्हा ते म्हणतात 'मी' असे केला.

कारण हा भाषांतर मुद्दा आहे

  • बऱ्याच भाषांसाठी, "तुम्ही" या शब्दाच्या सामान्य रूपात बायबल वाचणारी भाषांतरकर्त्यांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की वक्ता एका व्यक्तीशी किंवा एका पेक्षा जास्त लोकांशी बोलत होते की नाही.
  • काही भाषांमध्ये एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींशी बोलताना किंवा च्याबद्दल बोलताना एकवचनी सर्वनाम वापरत असल्यास ती गोंधळात टाकणारी असू शकते.

बायबलमधील उदाहरणे

1 आता हे लक्षात घ्या की तुम्ही तुमची नीतिमत्वाची कृत्ये लोकांनी बघावी म्हणून त्यांच्यासमोर करू नका, अन्यथा तुम्हाला तुमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रतिफळ मिळणार नाही. 2 म्हणून जेव्हा तुम्ही दानधर्म करता तेव्हा जसे ढोंगी लोक सभास्थानात आणि रस्त्यावर करतात तसे स्वतःसमोर कर्णा वाजवू नका, जेणेकरून लोकांकडून त्यांची स्तुती व्हावी. मी तुम्हाला खरे सांगतो, त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. (मत्तय 6:1-2 युएलटी)

येशू एका जमावाला म्हणाला. त्याने वचन 1 मध्ये "तुम्ही" हा शब्द अनेकवचन म्हणून वापरले आणि "तुम्ही" हा शब्द एकवचन म्हणून 2 वचनातील पहिल्या वाक्यात वापरले. मग शेवटच्या वाक्यात त्याने पुन्हा अनेकवचन वापरले.

देव या सर्व गोष्टी बोलला: “मी याव्हे तुझा देव आहे, तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले. “माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस." (निर्गम 20:1-3 युएलटी)

देवाने इस्राएलाच्या प्रत्येक माणसाला हे सांगितले. त्याने त्यांना मिसरमधून बाहेर आणले होते आणि सर्व लोकांनी त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे असे त्याला वाटले, परंतु त्यांच्याशी बोलतांना त्याने येथे तु या शब्दाच्या एकवचनी रूपाचा उपयोग केला.

परमेश्वर असे सांगतो, “अदोमाचे तीन पाप काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्याने तलवारीने त्याच्या भावाचा पाठलाग केला आणि अजिबात दया केली नाही. त्याचा राग कायम भडकत राहिला, आणि आपला संताप सतत बाळगला." (अमोस 1:11 युएलटी)

परमेश्वराने या गोष्टी अदोम राष्ट्राविषयी सांगितल्या, केवळ एका व्यक्तीबद्दल नाही.

आणि मी रात्री उठलो, स्वतः आणि माझ्यासोबत काही माणसे. आणि मी रात्री वाडीने वर जात होतो आणि मी भिंतीकडे लक्षपूर्वक पाहत होतो. आणि मी मागे वळून दरीच्या दारातून आत गेलो आणि परत आलो. (नहेम्या 2:12अ,15 युएलटी)

नहेम्याने स्पष्ट केले की यरुलेमच्या भिंतीच्या त्याच्या पाहणी दौऱ्यावर त्याने इतर लोकांना त्याच्यासोबत आणले. पण तो दौर्‍याचे वर्णन करत असताना, तो फक्त म्हणतो “मी” हे आणि ते केले.

भाषांतर रणनीती

(1) लोकांच्या समूहाचा संदर्भ देताना सर्वनामाचे एकवचन स्वरूप नैसर्गिक असेल तर ते वापरण्याचा विचार करा.

  • तुम्ही ते वापरू शकता की नाही हे वक्ता कोण आहे आणि ज्या लोकांबद्दल तो बोलत आहे किंवा कोणाशी बोलत आहे त्यावर अवलंबून असू शकते.
  • हे वक्ता काय म्हणत आहे यावर देखील अवलंबून असू शकते.

भाषांतर रणनीती लागू

(1) एकवचन रूप असलेले सर्वनाम जर लोकांच्या एका गटाचा संदर्भ देताना स्वाभाविक नसेल, किंवा जर वाचकांना ते गोंधळले असेल तर सर्वनामांचे अनेकवचन वापरा.

परमेश्वर असे सांगतो, “अदोमाचे तीन पाप काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्याने तलवारीने त्याच्या भावाचा पाठलाग केला आणि अजिबात दया केली नाही. त्याचा राग कायम भडकत राहिला, आणि आपला संताप सतत बाळगला." (अमोस 1:11 युएलटी)

परमेश्वर असे सांगतो, “अदोमाचे तीन पाप काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्यांनी तलवारीने त्यांच्या बंधूंचा पाठलाग केला आणि अजिबात दया केली नाही. त्यांचा राग कायम भडकत राहिला, आणि त्यांनी संताप सतत बाळगला." (अमोस 1:11 युएलटी)

आणि मी रात्री उठलो, मी स्वतः आणि माझ्यासोबत काही माणसे. आणि मी रात्री वाडीने वर जात होतो, आणि मी भिंतीकडे लक्षपूर्वक पाहत होतो. आणि मी मागे वळलो, आणि मी खोऱ्याच्या वेशीने प्रवेश केला आणि मी परतलो. (नहेम्या 2:12अ,15 युएलटी)

आणि मी रात्री उठलो, मी स्वतः आणि माझ्यासोबत काही माणसे. आणि आम्ही रात्री वाडीने वर जात होतो, आणि आम्ही भिंतीकडे लक्षपूर्वक पाहत होतो. आणि आम्ही मागे वळलो, आणि आम्ही खोऱ्याच्या वेशीने प्रवेश केला आणि आम्ही परतलो. (नहेम्या 2:12अ,15 युएलटी)