mr_ta/translate/figs-pastforfuture/01.md

56 lines
7.0 KiB
Markdown

**वर्णन**
भविष्यसुचक भूतकाळ हा एक अलंकार आहे ज्यामध्ये भुतकाळाचा उपयोग भविष्यात होणाऱ्या गोष्टींना संदर्भित करण्यासाठी केला जातो. घटना नक्कीच घडतील कधीकधी हे दाखविण्यासाठी भविष्यवाणीमध्ये केले जाते.
> म्हणून माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे बंदिवासात गेले.
> त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होत आहे, व त्यांतील लोकसमुदायास पिण्याास काहीच नाही. (यशया ५:१३ युएलटी)
वरील उदाहरणांमध्ये, इस्राएल लोक अजून बंदिवासात गेले नव्हते, परंतु देव त्यांच्या बंदिवासात जाण्याबद्दल असे बोलला जणू काय ते अगोदरच गेले आहेत कारण त्याने असा निश्चय केला होता की ते निश्चित बंदिवासात जातील.
#### कारण हा भाषांतर मुद्दा आहे
भविष्यातील घटनांच्या संदर्भात भविष्यकाळात वापरल्या जाणाऱ्या भूतकाळाची जाणीव नसलेल्या वाचकांना हे गोंधळात टाकणारे असू शकते.
### बायबलमधील उदाहरणे
> इस्राएल लोकांमुळे यरीहोस कडक बंद केले होते. कोणीही बाहेर गेले नाही आणि कोणीही आत आले नाही. तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “ पाहा, मी यरीहो, व त्याचे राजे आणि त्याचे शक्तीशाली योध्दे तुझ्या हाती दिले आहेत." (यहोशवा ६:१-२ युएलटी)
>
> कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे;
> व खांद्यावर सत्ता राहील; (यशया ९: ६ युएलटी)
वरील उदाहरणात, परमेश्वराने भविष्यात होणाऱ्या गोष्टींविषयी असे सांगितले जसे त्या आधीच घडल्या होत्या.
> हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य, यानेसुद्धा या लोकांविषयी असाच संदेश दिला आहे, “पाहा! लाखो पवित्र जनांसोबत प्रभु आला. (यहूदा १:१४ युएलटी)
हनोख भविष्यात जे होईल त्याबद्दल बोलत होता, परंतु त्याने "प्रभू आला" असे म्हटले तेव्हा त्याने भुतकालाचा उपयोग केला.
### भाषांतर पध्दती
जर भूतकाळ नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ प्रदान करीत असेल तर, याचा वापर करण्याचा विचार करा. जर नाही, तर येथे काही इतर पर्याय आहेत.
(१) भविष्यातील घटनांना संदर्भित करण्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग करा.
(२) जर ते तत्कालीन भविष्यात कशालातरी संदर्भित करत असेल, तर त्यास दर्शविणाऱ्या रूपाचा उपयोग करा.
(३) काही भाषा लवकरच काहीतरी घडेल हे दर्शविण्यासाठी वर्तमान काळाचा वापर करतात.
### भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण
(१) भविष्यातील घटनांना संदर्भित करण्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग करा.
> कारण आमच्यासाठी बाळ **जन्मला आहे**, आम्हाला पुत्र **दिला आहे**. (यशया ९:६अ युएलटी)
>
> > कारण आमच्यासाठी बाळ **जन्मला येईल**, आम्हाला पुत्र **दिला जाईल**.
(२) जर ते तत्कालीन भविष्यात कशालातरी संदर्भित करत असेल, तर त्यास दर्शविणाऱ्या रूपाचा उपयोग करा.
> परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “ पाहा, मी यरीहो, व त्याचे राजे आणि त्याचे शक्तीशाली योध्दे तुझ्या हाती दिले आहेत." (यहोशवा ६:१-२ युएलटी)
>
> > परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पाहा, मी यरीहो, व त्याचे राजे, व त्याचे शक्तीशाली योध्दे तुझ्या हाती **देणार आहे**.
(३) काही भाषा लवकरच काहीतरी घडेल हे दर्शविण्यासाठी वर्तमान काळाचा वापर करतात.
> तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “ पाहा, मी यरीहो, व त्याचे राजे आणि त्याचे शक्तीशाली योध्दे तुझ्या हाती दिले आहेत." (यहोशवा ६:१-२ युएलटी)
>
> > परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पाहा मी यरीहो, व त्याचे राजे आणि त्याचे शक्तीशाली योध्दे तुझ्या हाती **देत आहे**.