mr_ta/translate/figs-nominaladj/01.md

5.6 KiB

वर्णन

काही भाषांमध्ये विशेषणाने वर्णन केलेल्या गोष्टींच्या वर्गाचा संदर्भ घेण्यासाठी विशेषण वापरला जाऊ शकते. जेव्हा ते नामाप्रमाणे कार्य करते. उदाहरणार्थ, "श्रीमंत" हा शब्द एक विशेषण आहे. येथे दोन वाक्ये आहेत जी दर्शवतात की "श्रीमंत" एक विशेषण आहे.

श्रीमंत मनुष्याकडे मोठ्या संख्येत मेंढरे व गुरेढोर होती. (२ शमुवेल १२:२ IRV)

"श्रीमंत"हे विशेषण "मनुष्य" या शब्दाच्या आधी येते आणि "मनुष्य" याबद्दल सांगते.

तो श्रीमंत होणार नाही; त्याची संपत्ती टिकणार नाही. (ईयोब १५:२९अ ULT)

"श्रीमंत" हे विशेषण "असणे" या क्रियापदानंतर येते व "तो" या शब्दाचे वर्णन करते.

येथे एक वाक्य आहे जे दर्शवितो की "श्रीमंत" देखील एक नाम म्हणून कार्य करू शकते.

श्रीमंताने अर्ध्या शेकेलपेक्षा जास्त देऊ नये, आणि गरीबाने कमी देऊ नये . (निर्गम ३०:१५ब ULT)

निर्गम ३०:१५ मध्ये, "श्रीमंत" हा शब्द "श्रीमंत" या वाक्यांशामध्ये संज्ञाम्हणून कार्य करतो आणि तो श्रीमंता लोकांसाठी संदर्भित करतो. "गरीब" हा शब्द देखील एक संज्ञा म्हणून कार्य करतो आणि गरीब लोकांना संदर्भित आहे.

कारण हा भाषांतरातील मुद्दा आहे

  • बाबायबलमध्ये पुष्कळदा विशेषणे लोकांच्या गटाचे वर्णन करण्यासाठी संज्ञा म्हणून वापरले जातात.
  • काही भाषा अशा प्रकारे विशेषणे वापरत नाहीत.
  • या भाषांचे वाचक कदाचित असे वाटत असेल की मजकूर एका विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत आहे जेव्हा ते खऱ्या अर्थाने लोकांच्या समूहाबद्दल बोलत असतात ज्यांचे विशेषण वर्णन करते.

बायबलमधील उदाहरणे

दुर्जनाचा राजदंड नीतिमानाच्या वतनात चालणार नाही. (स्तोत्र १२५:३ IRV)

येथे "नीतिमान" येेथे लोक आहेत जे धार्मिक आहेत, एक विशिष्ट नीतिमान व्यक्ती नाही. जे सौम्य ते धन्य (मत्तय 5: 5 IRV)

जे सोम्य ते धन्य. (मत्तय ५:५अ ULT)

"सौम्य" येथे सर्व लोक जे सौम्य आहेत, एक विशिष्ट सौम्य व्यक्ती नाही.

भाषांतर रणनीती

जर तुमची भाषा लोकांच्या वर्गाला संदर्भित करण्यासाठी विशेषणाला संज्ञा म्हणून वापरत असतील तर अशा प्रकारे विशेषणांचा वापर करण्याचा विचार करा. जर ती विचित्र वाटत असेल किंवा जर अर्थ अस्पष्ट किंवा चुकीचा असेल तर येथे दुसरा पर्याय आहे:

(१) विशेषणाने वर्णन केलेल्या संज्ञाच्या अनेकवचनी स्वरूपासह विशेषण वापरा.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

(१) विशेषणाने वर्णन केलेल्या संज्ञाच्या अनेकवचनी स्वरूपासह विशेषण वापरा.

दुर्जनाचा राजदंड नीतिमानाच्या वतनावर चालणारच नाही (स्तोत्र १२५: ३ IRV)

दुर्जनाचा राजदंड नीतीमान लोकांच्या वतनांवर चालणारच नाही.

सौम्य ते धन्य आहेत. (मत्तय ५:५ IRV)

जे लोक सौम्य आहेत ते धन्य.