mr_ta/translate/figs-merism/01.md

6.9 KiB

व्याख्या

अयवय आवृत्ती हा अलंकार आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती दोन अंतिम भागांबद्दल बोलून काहीतरी संदर्भित करते. अंतिम भागांचा संदर्भ देऊन, वक्ता त्या भागातील प्रत्येक गोष्ट समाविष्ट करण्याचा विचार करतो.

प्रभु देव म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा, आहे. मी सर्वसमर्थ, जो आहे, जो होतो आणि जो येत आहे.” (प्रकटीकरण १:८ युएलटी )

“मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. (प्रकटीकरण २२:१३, युएलटी)

अल्फा व ओमेगा ग्रीक वर्णमालेतील पहिली व शेवटची अक्षरे आहेत. हे एक अवयव आवृत्ती आहे ज्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वकाही समाविष्ट केलेले आहे. याचा अर्थ सार्वकालिक असा आहे.

… हे स्वर्ग व पृथ्वीच्या प्रभु, मी तुझी स्तुती करतो…. (मत्तय ११:२५ युएलटी)

स्वर्ग व पृथ्वी एक अवयव आवृत्ती आहे ज्यामध्ये अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट समाविष्ट आहे.

कारण ही भाषांतरील समस्या आहे

काही भाषा अवयव आवृत्तीचा वापर करत नाहीत. त्या भाषांतील वाचकांना असे वाटते की वाक्यांश फक्त उल्लेख केलेल्या गोष्टींना लागू होतो. त्यांच्या कदाचित हे लक्षात येणार नाही की त्या दोन गोष्टी आणि त्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टींना ते संदर्भित करते.

बायबलमधील उदाहरणे

सुर्याच्या उगवतीपासून ते मावळतीपर्यंत परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. (स्तोत्र ११३:३ युएलटी)

हा अधोरेखित केलेला वाक्यांश एक अवयव आवृत्ती आहे कारण तो पूर्व व पश्चिम आणि त्यामध्ये असलेल्या सर्वत्राबद्दल बोलतो. याचा अर्थ "सर्वत्र".

जे त्याचा आदर करतात त्यांना तो आशीर्वाद देईल, तरुण आणि वृद्ध या दोहोंना . (स्तोत्र ११५: १३)

हा अधोरेखित केलेला वाक्यांश एक अवयव आवृत्ती आहे कारण तो वृध्द लोकांबद्दल व तरुण लोकांबद्दल व त्यांच्यामध्ये असलेल्या प्रत्येकजनाबद्दल बोलतो. याचा अर्थ "प्रत्येकजण."

भाषांतर रणनीती

जर अवयव आवृत्ती नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ प्रदान करत असेल तर त्यास वापरण्याचा विचार करा. नसल्यास, येथे इतर पर्याय आहेतः

(१) भागांचा उल्लेख न करता अवयव आवृत्ती काय संदर्भित करते त्यास ओळखा.

(२) अवयव आवृत्ती कशाला संदर्भित करते यास ओळखा व भागांचा समावेश करा.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

(१) भागांचा उल्लेख न करता अवयव आवृत्ती काय संदर्भित करते त्यास ओळखा.

हे स्वर्ग व पृथ्वीच्या प्रभु, मी तुझी स्तुती करतो . (मत्तय ११:२५ब युएलटी)

हे सर्व गोष्टींच्या प्रभू, मी तुझी स्तुती करतो.

सुर्याच्या उगवतीपासून ते मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. (स्तोत्र ११३:३ युएलटी)

सर्व ठिकाणांमध्ये लोकांनी परमेश्वराच्या नावाची स्तीती करावी .

(२) अवयव आवृत्ती कशाला संदर्भित करते यास ओळखा व भागांचा समावेश करा.

हे पित्या, स्वर्ग व पृथ्वीच्या प्रभु, मी तुझी स्तुती करतो . (मत्तय ११:२५ब युएलटी)

हे पित्या, स्वर्गात व पृथ्वीवर जे काही आहे त्यांचा समावेश करून, सर्व गोष्टींच्या प्रभु, मी तुझी स्तुती करतो.

जे त्याचा आदर करतात त्यांना तो आशीर्वाद देईल, तरुण आणि वृद्ध या दोहोंना. (स्तोत्र ११५: १३ युएलटी)

जे त्याचा आदर करतात ज्या सर्वांना, मग ते तरूण किंवा वृध्द असो याची पर्वा न करता तो त्यांना आशीर्वाद देईल.