mr_ta/translate/figs-irony/01.md

16 KiB

व्याख्या

विडंबन हा एक अलंकार आहे ज्यामध्ये वक्त्याचा संवाद करण्याचा हेतू खरतर शब्दाच्या शब्दश:हा अर्थाच्या विरुध्द असतो. कधीकधी एखादी व्यक्ती दुसर्‍याचे शब्द वापरुन असे करते, परंतु तो त्याच्याशी सहमत नसल्याप्रमाणे संवाद करतो. एखादी गोष्ट जी असली पाहिजे तिच्यापेक्षा ती वेगळी कशी आहे किंवा एखाद्याचा एखाद्या गोष्टीवरील विश्वास कसा चुकीचा किंवा मूर्खपणाचा आहे यावर जोर देण्यासाठी लोक असे करतात. हे बर्‍याचदा विनोदी असते.

येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे. मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे." (लूक ५:३१-३२ युएलटी)

जेव्हा येशू "धार्मिक लोक" यांच्याबद्दल बोलला, तेव्हा तो खरोखर धार्मिक लोकांबद्दल बोलत नव्हता, परंतु जे लोक अयोग्यपणे असे मानत होते की ते धार्मिक आहेत त्यांना बोलत होतो. विडंबनाचा उपयोग करूण, येशू म्हणाला कि की ते इतरांपेक्षा चांगले आहेत आणि त्यांना पश्चात्ताप करण्याची आवश्यकता नाही असा विचार करणे चुकीचे आहे.

कारण ही भाषांतरातील समस्या

जर एखाद्याला हे समजत नाही की वक्ता विडंबनाचा उपयोग करत आहे, तर तो विचार करेल की वक्ता आपल्या बोलण्यावर खरोखर विश्वास ठेवतो. उताऱ्याच्या अर्थाचा हेतू काय आहे याच्या विरुध्द असलेला अर्थ तो समजून घेईल.

बायबलमधील उदाहरणे

“आपल्या स्वत:च्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही किती पटाईत आहात. (मार्क ७:९ युएलटी)

येथे येशू स्पष्टपणे चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल परूश्यांचे कौतुक करतो. विडंबनेद्वारे, तो प्रशंसेच्या उलट बोलतो: तो बोलतो की आज्ञा पाळण्यात फार अभिमान बाळगणारे परुशी देवापासून इतके दूर आहेत की त्यांच्या परंपरा देवाच्या आज्ञा मोडत आहेत हे त्यांना कळत देखील नाही. विडंबनाचा वापर केल्यामुळे परुश्यांचे पाप अधिक स्पष्ट व भयावह होतात.

परमेश्वर म्हणतो; “आपला वाद सादर करा" याकोबाचा राजा म्हणतो "आपल्या मूर्तींसाठी आपले सर्वोत्तम युक्तिवाद सादर करा. " त्यांनी आपले वाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे व काय घडेल ते आम्हास विदित करावे, जेणेकरूण या गोष्टी आम्हाला चांगल्याप्रकारे कळतील. “त्यांनी मागील पूर्वानुमानात्मक घोषणांबद्दल सांगावे, जेणेकरून आम्ही त्यांच्यावर विचार करू आणि ते कसे पूर्ण झाले हे समजून घेऊ." (यशया ४१:२१-२२ युएलटी)

लोकांनी मूर्तीची पूजा केली जणू काय त्यांच्या मूर्तींना ज्ञान किंवा सामर्थ्य आहे, आणि असे केल्यामुळे परमेश्वर त्यांच्यावर क्रोधीष्ट होता. म्हणून त्याने विडंबनेचा उपयोग केला आणि भविष्यात काय होईल हे सांगण्यासाठी त्यांच्या मूर्तींना आव्हान दिले. मूर्ती हे करू शकत नाहीत हे त्याला ठाऊक होते, परंतु ते करू शकतात असे बोलण्याद्वारे, त्याने मूर्तींची थट्टा केली, आणि त्यांची अक्षमता अधिक स्पष्ट केली, आणि लोकांनी त्यांची उपासना केल्याबद्दल त्यांना दटावले.

तुला प्रकाश व अंधाकाराला त्याच्या कार्यस्थळी नेता येईल काय? त्यांच्यासाठी त्यांच्या घरी परत जाणारा रस्ता तुला सापडेल काय? निसंशय तुला ठाऊक असेल, कारण त्यावेळी तू जन्माला असावास;तुझ्या आयुष्याची संख्या मोठी आहेे!” (ईयोब ३८:२०,२१ युएलटी)

ईयोबला वाटले की तो शहाणा आहे. ईयोब इतका शहाणा नव्हता हे दाखवण्यासाठी परमेश्वराने विडंबनेचा उपयोग केला. वरील दोन अधोरेखित विडंबन आहेत. ते जे बोलतात याच्या विरुध्द असलेल्या गोष्टीवर ते जोर देतात, कारण ते इतके स्पष्टपणे खोट आहेत. त्यांते यावर जोर देतात की ईयोब शक्यतो प्रकाशाची निर्मिती केल्याबद्दल देवाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही कारण बऱ्यात वर्षापर्यंत ईयोबाचा जन्म झाला नव्हता.

तुम्ही अगोदरच समाधानी झाला आहात! तुम्ही आधीच श्रीमंत झाला आहात! आम्हाला सोडून तुम्ही राज्य करायला सुरुवात केली, तुम्ही खरोखर राज्य करावे अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून आम्ही देखील तुमच्या बरोबर राज्य केले असते (१ करिंथ. ४:८ युएलटी)

करिंथ येथील लोक स्वतःला फार शहाणे, स्वयंपूर्ण, आणि प्रेषित पौलाच्या कोणत्याही सूचनेची गरज नसलेले समजत असे. ते किती अभिमानाने वागत आहेत व शहाणे असण्यापासून ते खरोखर किती दूर आहेत हे दाखविण्यासाठी, जणू काय पौलाने त्यांच्याशी सहमत आहे असे बोलून, विडंबनेचा उपयोग केला.

भाषांतर पध्दती

जर आपल्या भाषेमध्ये विडंबना योग्य प्रकारे समजली जात असेल तर ती नमुद केली आहे त्याप्रमाणेच भाषांतरीत करा. जर नाही, येथे इतर काही पध्दती आहेत.

(१). एखादा ज्यावर विश्वास ठेवतो त्याविषयी वक्ता बोलत आहे असे दर्शविणाऱ्या पध्दतीने त्याचे भाषांतर करा.

(२) लेखकाच्या शब्दश: बोललेल्या शब्दांमध्ये विडंबना आढळत नाही, परंतूपरंतु त्याऐवजी वास्तविक अर्थ वक्त्याच्या शब्दांच्या शब्दश: अर्थाच्या उलट सापडतो.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

(१). एखादा ज्यावर विश्वास ठेवतो त्याविषयी वक्ता बोलत आहे असे दर्शविणाऱ्या पध्दतीने त्याचे भाषांतर करा.

“आपल्या स्वत:च्या रूढी राखण्यासाठी देवाच्या आज्ञेचा नकार तुम्ही किती पटाईत करता. (मार्क ७:९ युएलटी)

तुम्ही जेव्हा देवाच्या आज्ञा नाकारता तेव्हा तुम्हाला वाटते की आपण चांगले करत आहोत जेणेकरून तुम्ही आपल्या रूढी राखाव्यात! आपल्या रूढी राखण्यासाठी देवाच्या आज्ञा नाकारणे चांगले आहे असे तुम्ही वागता!

मी धार्मिकास नाही, तर पाप्यास पश्चाताप करण्यासाठी बोलाविण्यास आलो. (लुक ५:३२ युएलटी)

मी जे लोक आपण धार्मिक आहोत असा विचार करतात त्यांना नाही, तर पाप्यास पश्चाताप करण्यासाठी बोलाविण्यास आलो.

(२) विडंबनाच्या विधानाचा वास्तविक, हेतूपूर्ण अर्थ भाषांतरीत करा.

“आपल्या स्वत:च्या रूढी राखण्यासाठी देवाच्या आज्ञेचा नकार तुम्ही किती पटाईत करता. (मार्क ७:९अ युएलटी)

आपल्या रुढी राखण्यासाठी जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा नाकारता तेव्हा तुम्ही भयानक गोष्टी करता!

परमेश्वर म्हणतो; “आपला वाद सादर करा" याकोबाचा राजा म्हणतो "आपल्या मूर्तींसाठी आपले सर्वोत्तम युक्तिवाद सादर करा. " त्यांनी आपले वाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे व काय घडेल ते आम्हास विदित करावे, जेणेकरूण या गोष्टी आम्हाला चांगल्याप्रकारे कळतील. “त्यांनी मागील पूर्वानुमानात्मक घोषणांबद्दल सांगावे, जेणेकरून आम्ही त्यांच्यावर विचार करू आणि ते कसे पूर्ण झाले हे समजून घेऊ." (यशया ४१:२१-२२ युएलटी)

परमेश्वर म्हणतो; “आपला वाद सादर करा" याकोबाचा राजा म्हणतो "आपल्या मूर्तींसाठी आपले सर्वोत्तम युक्तिवाद सादर करा.आम्हाला या गोष्टी चांगल्याप्रकारे कळाव्यात म्हणून तुमच्यामूर्ती आपले स्वत:चे वाद घेऊन आमच्याकडे येऊ शकत नाही किंवा काय घडेल हे जाहीर करण्यासाठी पुढे येऊ शकत नाही. आम्ही त्यांचे ऐकू शकत नाही कारण त्यांनी मागील पूर्वानुमानात्मक घोषणांबद्दल सांगण्यास त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांच्या विचार आम्ही करू शकरत नाही व ते कसे पुर्ण झाले हे समजून घेऊ शकत नाही

तुला प्रकाश व अंधाकाराला त्याच्या कार्यस्थळी नेता येईल काय? त्यांच्यासाठी त्यांच्या घरी परत जाणारा रस्ता तुला सापडेल काय? निसंशय तुला ठाऊक असेल, कारण त्यावेळी तू जन्माला असावास; तुझ्या आयुष्याची संख्या मोठी आहेे! (ईयोब ३८:२०,२१ युएलटी)

तुला प्रकाश व अंधाकाराला त्याच्या कार्यस्थळी नेता येईल काय? त्यांच्यासाठी त्यांच्या घरी परत जाणारा रस्ता तुला सापडेल काय? प्रकाश व अंधकाराची निर्मीती कशी झाली हे तुला माहीत असल्यासारखे तू वागतोस, जसे तू त्याठिकाणी होतास; जसे तू निर्मीतीएवढा जूना आहेस, पण तू नाहीस!