mr_ta/translate/figs-infostructure/01.md

12 KiB

वर्णन

वेगवेगळ्या भाषा वाक्याच्या भागांची वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापण करतात. इंग्रजीमध्ये, एक वाक्यात सहसा प्रथम कर्ता, नंतर क्रियापद, नंतर कर्म, नंतर इतर वाक्यांश असतात, याप्रमाणे: पीटरने काल त्याच्या घराला रंग लावला.

इतर अनेक भाषा सहसा या गोष्टी एका वेगळ्या क्रमाने लावतात, जसे की: रंग लावला पिटरने काल त्याच्या घराला.

जरी सर्व भाषांमध्ये वाक्यांच्या काही भागासाठी एक सामान्य क्रम असला तरी  वक्ता किंवा लेखक  कोणती माहिती सर्वात महत्वाची ठरवतात त्यानुसार हा क्रम बदलू शकतो.

समजा की कोणीतरी प्रश्नाचे उत्तर देत आहे, "पेत्राने काल काय रंगवले?" प्रश्न विचारणारी व्यक्ती आधीपासूनच कर्म "त्याचे घर" वगळता वरील आपल्या वाक्यातील सर्व माहिती जाणून आहे:  म्हणून, ते माहितीचा सर्वात महत्वाचा भाग बनते आणि इंग्रजीमध्ये उत्तर देणारी व्यक्ती असे म्हणेल "(काल) त्याचे घर पीटरन रंगविले होते:

हे सर्वात महत्वाची माहिती प्रथम ठेवते, जी इंग्रजीसाठी सामान्य आहे. बऱ्याच इतर भाषांमध्ये सहसा सर्वात महत्त्वाची माहिती शेवटी ठेवली जाते. मजकूराच्या प्रवाहामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची माहिती सहसा वाचकांसाठी लेखकाने ठरविलेली नविन माहीती असते. काही भाषांमध्ये नवीन माहिती प्रथम येते आणि इतरांमध्ये ती शेवटी असते.

कारण हा भाषांतराचा मुद्दा आहे

  • विविध भाषा वेगवेगळ्या प्रकारे वाक्याच्या भागांची व्यवस्थापना करतात. जर आपण (अनुवादक) स्त्रोतांकडून वाक्याच्या भागाची क्रमवारी नकल करता, तर कदाचित आपल्या भाषेत अर्थ प्राप्त होणार नाही..
  • वेगवेगळ्या भाषां वाक्यात वेगवेगळ्या ठिकाणी महत्वपूर्ण किंवा नवीन माहिती देतात. आपण भाषेच्या स्त्रोतामध्ये असलेली महत्वाची किंवा नवीन माहिती त्याच ठिकाणी ठेवली तर, ती कदाचित गोंधळात पाडील किंवा तुमच्या भाषेत चुकीचे संदेश देईल.

बायबलमधील उदाहरणे

मग ते सर्व जेवून तृप्त झाले. (मार्क ६:४२ IRV)

मूळ ग्रीक स्त्रोताच्या भाषेमध्ये  या वाक्यांचा भाग वेगळ्या क्रमामध्ये होता. ते या प्रकारे होता: त्यांनी सर्व खाल्ले आणि ते तृप्त झाले.

इंग्रजीमध्ये, याच्या अर्थ असा आहे की लोकांनी सर्वकाही खाल्ले, परंतू पुढील वचन असे सांगते की त्यांनी उरलेल्या भाकरीच्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या घेतल्या. हे इतके गोंधळलेले असु नये   यासाठी, यूएलटीच्या अनुवादकांनी वाक्याचे भाग इंग्रजीसाठी योग्य क्रमामध्ये ठेवले आहे.

दिवस संपण्यास सुरुवात झाली, आणि ते बारा त्याच्याकडे आले व म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या म्हणजे, भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन, ते उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.” (लुक ९:१२ ULT)

या वचनात, शिष्य येशूला काय म्हणतात ते सर्व प्रथम महत्वाची माहिती ठेवतात - कि त्याने लोकांना जाऊ दिले पाहीजे. ज्या भाषांमध्ये महत्वाची माहिती शेवटी ठेवली जाते, त्या लोकांना हे समजले पाहिजे की रानातील ठिकाणी असण्याचे त्यांनी  दिलेले कारण, येशुला दिलेल्या संदेशाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. ते कदाचित असा विचार करत असतील की त्या ठिकाणाच्या आत्म्यांना शिष्य घाबरले असावेत, आणि लोकांना अन्न विकत घेण्यास पाठविणे एका प्रकारे त्यांना आत्म्यांपासून वाचविणे आहे. हा चुकीचा संदेश आहे..

“जेव्हा सर्व पुरुष तुम्हाला चांगले बोलतील, तेव्हा तुमची केवढी दुर्दशा, कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच करत असत. (लूक ६:२६ IRV)

या वचनात, माहितीचा सर्वात महत्वाचा भाग प्रथम आहे - ते काय करीत आहेत त्याबद्दल लोकांची "दुर्दशा" होणार आहे. जे लोक महत्वाची माहिती शेवटी यावी अशी अपेक्षा करतात अशा लोकांसाठी हे गोंधळात टाकणारे असू शकते.

भाषांतर रणनीती

(१) तुमची भाषा वाक्याचे काही भाग कसे व्यवस्थापित करते आणि आपल्या भाषांतरामध्ये तो क्रम कसा वापरते याचा अभ्यास करा.

(२) आपली भाषा नवीन किंवा महत्वाची माहिती कोठे ठेवते याचा अभ्यास करा, आणि माहितीचा क्रम व्यवस्थित करा जेणेकरून ती तुमच्या भाषेत केली गेली त्याप्रमाणे असेल.

भाषांतराच्या रणनीतीचे लागूकरण

(१) आपली भाषा वाक्याच्या भागांचे व्यवस्थापम कशी करते याचा अभ्यास करा, आणि त्या क्रमाचा आपल्या भाषांतरामध्ये उपयोग करा.

मुळ ग्रीक क्रमातील हे वचन आहे:

आणि तो तेथून निघाला आणि त्याच्या मुळ गावात आला, आणि त्याचे शिष्य त्याच्या पाठीमागे आले. (मार्क ६:१)

युएलटीने यास इंग्रजीसाठी साधारण क्रमामध्ये ठेवले आहे

आता येशु तेथून गेला आणि त्याच्या मुळ गावी आला, आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. (मार्क ६:१ IRV)

(२) आपली भाषा नवीन किंवा महत्वाची माहिती कोठे ठेवते याचा अभ्यास करा, आणि माहितीचा क्रम व्यवस्थित करा जेणेकरून ती तुमच्या भाषेत केली गेली त्याप्रमाणे असेल.

दिवस संपण्यास सुरुवात झाली, आणि ते बाराजन त्याच्याकडे आले व म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या म्हणजे, भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन, ते उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.”(लूक ६:२६ IRV)

जर तुमची भाषा महत्वाची माहिती शेवटी ठेवत असेल तर, तुम्ही वचनाचा क्रम बदलू शकता:

आता दिवसाचा संप होत आला आहे ,आणि बाराजन त्याच्याकडे आले व म्हणाले, “आपण येथे रानातील ठिकाणी असल्यामुळे, समुदायाला जाऊ द्या जेणेकरुण ते भोवतालच्या गावात व शेतमळ्यात जाऊन ते उतरतील व खाण्याची सोय करतील.”

धिक्कार असो, जेव्हा सर्व लोक तुमच्याविषयी चांगले बोलतील कारण त्यांच्या पूर्वजांनी खोट्या संदेष्ट्यांना तसेच केले . (लूक ६:२६ यूएलटी)

जर तुमची भाषा महत्वाची माहिती शेवटी ठेवत असेल तर, तुम्ही वचनाचा क्रम बदलू शकता:

जेव्हा सर्व लोक तुम्हाला चांगले बोलतील, जे लोकांच्या पूर्वजांनी खोट्या संदेष्ट्यांशी वागले तसेच आहे, तर तुमचे वाईट होईल!