mr_ta/translate/figs-gendernotations/01.md

11 KiB

बायबलमध्ये, काहीवेळा "पुरुष", "बंधू" आणि "मुले" हे शब्द केवळ पुरुषांनाच संदर्भित असतात. ज्या ठिकाणी लेखकाचा अर्थ पुरुष आणि स्त्रिया या दोघांचाही आहे तेथे तुम्ही (भाषांतरकार) अशा मार्गाने भाषांतर करणे आवश्यक आहे जे पुरुषांना दिलेला अर्थ मर्यादित करत नाही.

वर्णन

काही भाषांमध्ये सामान्यत: पुरुषांना संदर्भित करणारा शब्द पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही संदर्भित करण्यासाठी सामान्यपणे वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, बायबलमध्ये काही वेळा “बंधू” असे म्हटले जाते, तेव्हा ते बंधू व बहिण या दोहोंना संदर्भित असते.

तसेच काही भाषांमध्ये, “तो” आणि “त्याला” या पुरुषार्थी सर्वनामांचा उपयोग कोणत्याही व्यक्तीसाठी जर ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हे महत्वाचे नसेल तर सामान्यपणे केला जाऊ शकतो. खालील उदाहरणात, सर्वनाम “त्याचे” असा आहे, परंतु ते पुरुषांपुरते मर्यादित नाही.

शहाणा पुत्र त्याच्या बापाला सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो. (नीतिसूत्रे १०:१ युएलटी)

कारण हा भाषांतरातील समस्या आहे

  • काही संस्कृतींमध्ये “पुरुष,” “बंधू” आणि “पुत्र” यासारख्या शब्दांचा उपयोग फक्त पुरुषांना संदर्भित करण्यासाठी केला जाऊ शकतो. जर हे शब्द भाषांतरात अधिक सामान्य मार्गाने वापरले गेले, तर लोक विचार करतील की जे बोलले जात आहे ते महिलांना लागू होत नाही.
  • काही संस्कृतींमध्ये, “तो” आणि “त्याला” हे पुरुषार्थी सर्वनाम फक्त पुरुषांनाच संदर्भित करतात. जर एक पुरुषार्थी सर्वनामाचा वापर केला जातो तर लोक विचार करतील की जो काही बोलले गेले आहे ते महिलांना लागू होत नाही.

भाषांतर तत्त्वे

जेव्हा एखादे विधान पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही लागू होते, तेव्हा त्याचे भाषांतर अशा प्रकारे करा की लोकांना ते समजेल की ते दोघांनाही लागू आहे.

बायबलमधील उदाहरणे

आणि आता, बंधूनो,देवाची कृपा जी मासेदोनियाच्या मंडळ्यांना देण्यात आली आहे. हे तुम्ही जाणून घ्यावे असे आम्हांला वाटते. (२ करिंथ. ८:१ युएलटी)

हे वचन करिंथमधील विश्वासणाऱ्यांना संबोधित केले जात आहे, केवळ पुरुषांना नव्हे, तर पुरुष व स्त्रीयांना देखील.

मग येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वत:ला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे." (मत्तय १६:२४-२६ युएलटी)

येशू फक्त पुरुषांनाच बोलत नव्हता, तर पुरुष व स्त्रिया यांना देखील बोलत होता.

सावधान: कधीकधी पुरुषांना संदर्भित करण्यासाठी विशेषतः पुरुषार्थी शब्द वापरले जातात. असे शब्द वापरू नका ज्यामुळे लोकांना असे वाटेल की त्यामध्ये स्त्रीयांचा समावेश आहे. खालील शब्द विशेषतः पुरुषांबद्दल आहेत.

मोशेने म्हटले, जर एखादा मुले नसताना मेला, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करावा आणि त्याच्या भावासाठी मुले होऊ द्यावी (मत्तय २२:२४ युएलटी)

भाषांतर रणनीती

जर लोकांना हे समजेल की “पुरुष,” “बंधू” आणि “तो” यासारख्या पुरुषार्थी शब्दांमध्ये स्त्रीयांचा असु शकतो तर त्यांचा वापर करण्याचा विचार करा. अन्यथा, जेव्हा ते स्त्रीयांचा समावेश करतात, तेव्हा या शब्दांसाठी भाषांतर करण्याचे काही मार्ग येथे आहेत.

(१) पुरुष आणि स्त्रियांसाठी वापरता येणाऱ्या नामाचा उपयोग करा.

(२) पुरुषांना संदर्भित करणाऱ्या शब्दाचा व स्त्रीयांना संदर्भित करणाऱ्या शब्दाचा उपयोग करा.

(३) पुरुष आणि स्त्री या दोहोंसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांचा उपयोग करा.

भाषांतर पद्धतींच्या उदाहरणाचे लागूकरण

(१) पुरुष आणि स्त्रियांसाठी वापरता येणाऱ्या नामाचा उपयोग करा.

मुर्ख मरतो त्याप्रमाणेच ज्ञानी पुरुष मरतो. (उपदेशक २:१६ब युएलटी)

"मुर्ख मरतो त्याप्रमाणेच “ज्ञानी व्यक्ती मरतो." "मुर्ख लोक मरतात त्याप्रमाणेच “ज्ञानी लोक मरताता”

(२) पुरुषांना संदर्भित करणाऱ्या शब्दाचा व स्त्रीयांना संदर्भित करणाऱ्या शब्दाचा उपयोग करा.

बंधूंनो, आशियामध्ये आमच्यावर जी संकटे आली त्याविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. (२ करिंथ १:८) - पौल हे पत्र पुरुष व स्त्रीया या दोहोंना लिहित होता.

बंधू व बहीणींनो आशियामध्ये आमच्यावर जी संकटे आली त्याविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. (2 करींथ १:८)

(३) पुरुष आणि स्त्री या दोहोंसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांचा उपयोग करा.

"जर कोणी माझा मागे येऊ इच्छित असेल, तर त्याने स्वत: ला नाकारावे, आपला वधस्तंभ उचलावा, आणि माझ्यामागे यावे. (मत्तय १६:२४ युएलटी)

इंग्रजी भाषिक, केवळ पुरुषांनाच नव्हे तर ते सर्व लोकांना लागू होतात हे दर्शविण्यासाठी “तो,” “तो स्वतः” आणि “त्याचे” हे पुरुषार्थी एकवचनी सर्वनाम "ते," "ते स्वत:," व "त्यांचे" या अनेकवचनी सर्वनाम जे लिंगास चिन्हांकित करत नाहीत यामध्ये बदल करू शकता.

“जर लोक माझ्या मागे येऊ इच्छितात तर, त्यांनी त्यांच्या स्वत:चा, नकार करावा, त्यांंचा वधस्तंभ उचलावा, व माझ्या मागे यावे.”